ते त्यांच्या कामाबद्दल किती गांभीर्याने पाहतात हे आपल्याला परवाच एका विद्यार्थिनीने बसथांब्यासाठी केलेल्या पत्रावरून दिसून आले. त्या पत्रातील जो प्रश्न होता बसथांब्याचा तो तर सोडविलाच सोबत त्या विद्यार्थिनीला अतिशय प्रांजळ भाषेत पत्र लिहून सांगितले की बस थांबली नाही तर मला फोन करून सांग..... लोकप्रिनिधींची जनते प्रती असलेली ही कर्तव्याची, जबाबदारीची भावनाच जनतेला त्या लोकप्रिनिधींला पंचावन्न वर्ष विधानसभेत पाठवते... लहान असो किंवा वयस्कर असो त्यांनी मांडलेला प्रश्न तडीस लावणे, ते सोडविणे हेच आजपर्यंत आबासाहेबानी कटाक्षाने पाहिले त्यामुळेच आबासाहेब आज सांगोला मतदारसंघाचं प्रतिनिधित्व सल्लग 55 वर्ष करत आहेत. मतदारसंघातील एखादा माणूस आज एखाद्या लोकप्रतनिधींकडे त्याच्या कामासाठी किंवा सामाजिक समस्या घेऊन गेला तर तो लोकप्रतिनिधी उद्या करू, परवा करू, आठवड्यात करू पुढच्या महिन्यात करू अशी उडवाउडवी ची उत्तरे देऊन निव्वळ आश्वासने देण्याचे काम करत असतात... पण आबासाहेब या सर्वाहून वेगळे ठरतात ते अश्या प्रकारच्या उदाहरणावरून.......
प्रथमतः आपले या ब्लॉगवर मनापासून सहर्ष स्वागत आहे.. आपल्याला मिळालेले दररोजचे सुंदर जीवन जगत असताना चांगल्या समाजासाठी माझ्या मनातून उमटलेले हुंकार या ब्लॉग सारख्या सोशल मीडियाच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहचवण्यास मला नक्कीच आनंद वाटतो आहे. इतिहासातील आपल्या पूर्वजांच्या शौर्याचा स्वाभिमान आणि वर्तमानातील विविध क्षेत्रातील काही घटनांवर निर्भीड आणि निपक्षपातीपणे व्यक्त केलेले माझे मत तुमच्यापर्यंत या ब्लॉगच्या माध्यमातून पोहचवण्याचा माझा छोटासा प्रयत्न...
विवेक विचार
रविवार, २१ जानेवारी, २०१८
मंगळवार, १६ जानेवारी, २०१८
गोरगरिबांचा कैवारी, सर्वसामान्य लोकांचा संरक्षक, दानवांचा गुंडाचा सर्वनाश करणारा, कृष्णाकाठचा ढाण्या वाघ म्हणजेच आदरणीय बापु बिरू वाटेगावकर (आप्पा)*
आज अचानक दुपारी एकच्या सुमारास सोशल मिडिया वरुन एक बातमी येऊन धडकली. बापु बिरू वाटेगावकर यांचे निधन ... बातमी आली आणि बातमी सोशल मीडियावरिल असल्याने सर्वप्रथम चौकशी केली.. बातमी खरी आहे असे समजताच थोडा वेळ स्तब्ध झालो.. आणि बापू बिरू वाटेगावकर यांच्या विषयी असंख्य आठवणी मनात येऊन गेल्या.. बापू बिरू वाटेगावकर म्हटले की आमच्या समोर चित्र उभा राहतं ते म्हणजे धिप्पाड शरीर यष्टीचा माणूस, सांगली कोल्हापूर च्या तांबड्या मातीतील रांगडा गडी, पिवळा फेटा , धोतर ! शर्ट आणि पायात कोल्हापुरी पायताण असा पेहराव असणारा माणूस ....
ज्यावेळी बोरगाव आणि आजबाजुच्या गावात रंगा शिंदे आणि त्यांच्या गुंडांनी दिवसा ढवळ्या थैमान घातलं होतं , आया बहिणीवर अन्याय अत्याचार बलात्कार करून अब्रू लुटुन मारून टाकलं जायचं, गोरगरीबांच्या घरांवर दरोडे टाकून त्यांना लुटलं जायचं, त्यांच्या विरोधात ब्र जरी कोणी काढला तरी त्याला ठार मारलं जायचं, त्यावेळी अश्या अन्यायग्रस्थाच्या, गोरगरीबांच्या, पीडितांच्या, दीनदुबळ्यांच्या पाठीमागे ठामपणे भाऊ बाप म्हणून उभा राहिला तो म्हणजे बापु बिरू वाटेगावकर अर्थात आदरणीय आप्पा ....
आप्पांनी दारूमुळे, हुंड्यामुळे , सासरच्या त्रासामुळे उद्वस्त झालेले अनेक संसार रुळांवर आणले. खरंतर आप्पा गावात कोणतंही वैर असू नये, भावभावकीत कोणतेही वाद नसावेत गावात बंधुत्वाचे मित्रत्वाचे संबंध असावे याच मतांचे होते. परंतु वासनेने आणि मस्तीने बरबटलेल्या रंगा शिंदे आणि त्यांने पोसलेल्या गुंडांना गावावर दहशत गाजवायची होती. वासना भागवायचा होत्या त्यासाठी गावांतील मुलींच्यावर अन्याय केले जायचे... आप्पांनी अनेकवेळा सांगून समजाऊन पाहिले पण काय ऐकले नाही म्हणून शेवटी त्याचा कोथळा बाहेर काडला... त्यांच्यानंतर गावांतील हे वैर चालू झाले तरीही आप्पांनी हे मिटविण्याचे वारंवार प्रयत्न करूनही तो अयशस्वी झाला... सहयाद्रीच्या खोऱ्यात बापू बिरू वाटेगावकर कित्तेक वर्ष राहत होते. पोलिसांचे जे ब्रीदवाक्य आहे ते म्हणजे 'सदरक्षणाय खलनिग्रहनाय' (सज्जनांच रक्षण दुर्जनांचा नाश ) मला वाटत हे तत्व आप्पा अखंड आयुष्य जगले असे म्हटले तरी काय वावगे ठरणार नाही.
आप्पा नेहमी म्हणायचे,
"कल्पव्रुक्षाखाली बसुन झोळीला गाठी मारायच्या नसतात... तुम्हाला बापू कळला न्हाय, तुम्हांलाच न्हाय, कित्येकाना कळला न्हाय...
विचारा या झाडांना, पानांना, फुलांना, पाखरांना... विचारा त्या वाऱ्याला... बापू बिरू वाटेगावकर कोण होता ?
मेंढरं हाकायची घुंगराची काठी सोडूं त्यानं बंदूक हातात का घेतली?"
या प्रश्नांची उत्तरं मिळविण्याचा प्रयत्न जो कोणी सुशिक्षीत सुजान युवक करेल त्याला बापू बिरू वाटेगावकर ही व्यक्ती आणि शक्ती समजल्याशिवाय राहणार नाही.
न्यायालयाने सुनावलेली जन्मठेपेची शिक्षा भोगून आल्यानंतर त्यांनी
महाराष्ट्रातील तमाम युवकांना व्यसनापासून दूर राहण्यास सांगतिले आणि त्याबद्द्ल वेळोवेळी खेड्यापाड्यांत जाऊन प्रवचन देणारे आप्पा आपल्याला मार्गदर्शक म्हणून ठिकठिकाणी दिसले.
शेवटी आज आपल्यातीलच एका असामान्य पर्वाचा अंत झाला असला तरी आप्पांनी दिलेले विचार तुमच्या माझ्या सारख्या नवतरुणाच्या मनाला सदैव प्रेरणा देत राहतील यामधे माझ्या मनात तरी कोणतीच शंका नाही. आज आप्पा शरीराने आपल्यामध्ये नाही आहेत पण त्यांनी ज्यासाठी ज्या प्रव्रुत्तीविरोधात संघर्ष केला त्या प्रव्रुत्ती आज ही समाजात आहेत ... फक्त आहेतच असं नाही तर त्या वाढत आहेत..ते आपल्याला दररोजच्या वर्तमानपत्रातून दिसतेच आहे. शेवटी त्या प्रव्रुत्ती कमी होण्याच्या द्रुष्टीने पावलं उचलणं आणि त्याविरोधात जनजागृती करून नवयुवक यांच्यामधे जाग्रुती निर्माण करणं हीच खऱ्या अर्थाने आदरणीय आप्पांना श्रधांजली ठरेल असे मला वाटतं. शेवटी पुन्हा एकदा आप्पांच्या विनम्र स्म्रुतीस भावपूर्ण श्रधांजली....💐💐💐
✒ प्रतिक यमगर
बाळेवाडी, ता. - आटपाडी,
जि.- सांगली.
७७०९९३५३७४
Pratikyamgar.wordpress.com
Popatgyamgar.blogspot.com
रविवार, ३१ डिसेंबर, २०१७
2017 वर्षातील जमाखर्चाचा ताळेबंद
2017 या वर्षाचा आज शेवटचा दिवस......
उद्याच्या नविन वर्षाची सुरवातीची ओढ आपल्या प्रत्येकाला लागली आहे. त्या 2018 या नविन वर्षामध्ये नवचैतन्याने प्रवेश करायचाच आहे. तत्पूर्वी 2017 या वर्षातील काही बऱ्या वाईट आठवणी माझ्या दृष्टिकोनातून मांडण्यासाठी. हा छोटासा लेखप्रपंच... 2017 या वर्षातून बरेच काही शिकलो. नवनविन विचारांचे प्रवाह अनुभवता आले. चौफेर वाचनाबरोबरच चौफेर विचार करून लेखन करण्याची समग्र अशी लेखणी होती तिलाच अधिक प्रगल्भतेकडे नेण्याचा प्रयत्न काही प्रमाणात यशस्वी झाला. बऱ्याच वर्तमानपत्रांकडून काही लेखांची दखल घेतली गेली. त्याचबरोबर अनेक नामवंत अश्या सन्माननीय व्यक्तीकडून प्रेरणा मार्गदर्शन आणि शुभेच्छा हि मिळाल्या... हे माझ्या दृष्टीने आनंदाचे क्षण आहेत. २०१७ या वर्षांतील माझा जो संकल्प होता तो म्हणजे इंग्रजी भाषा लिहिता बोलता आली पाहिजे... तो संकल्प पूर्ण करण्यात मी बऱ्याच प्रमाणात यशस्वी झालो आहे. मी माझ्या मनातील बरेच ठरवलेले संकल्प काही प्रमाणात पुर्ण करण्यात यश मिळाले आहे. परंतु जे पुर्ण होऊ शकले नाहीत ते येणाऱ्या वर्षात पुर्ण करण्याचा माझा मानस असेल.....
वर्षभर तुमच्या सारख्या मित्रांच्या साथीने काम करत असताना खेळीमेळी च्या वातावरणात २०१७ हे वर्ष कसे संपले हे सुद्धा समजले नाही.
राष्ट्रीय भावना मनात ठेऊन राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, तसेच विविध क्षेत्रातील वास्तविक समस्यांवर मांडलेले सणसणीत विचार आपल्यापर्यंत या सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहचविण्याचा. छोटासा प्रयत्न करतो आहे. याच बरोबर आपल्याला वर्तमानकाळात काम करत असताना आपली स्फूर्ती आणि प्रेरणा कायम प्रफुल्लित राहण्यासाठी आपला उज्वल आणि गौरवशाली इतिहास माहित असणे गरजेचे आहे... यासाठी कधी कधी त्यावरती छोटे मोठे लेख लिहून मनाला ऊर्जा देण्याचे एक छोटसं कार्य करण्याचा प्रयत्न करतो आहे.
खरंतर मला हरण्याची भीती कधीच वाटत नाही कारण मी जे काही निर्माण करण्याचा प्रयत्न करतोय ते शून्यातून करतोय.... पाठीशी आईवडिलांचे आशीर्वाद आहेत. डोक्यात स्वामी विवेकानंदजी , छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले , राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचे विचार आहेत आणि तुमच्या सारख्या मित्रांची साथ आहे की जिथे हरण्याची कल्पनाच करवत नाही.
सरत्या वर्षात चांगले वाईट खूप अनुभव आले. काही गमावलं असेल तर खुप जवळची चांगल्या विचारांच्या माणसाना गमावलं... Dreams group मधुन काही कारणास्तव बाहेर पडावं लागलं... अगदी ह्रदयाजवळची काही माणसेही दूर झाली, पण तितकीची जवळही आली... जीवनामध्ये संकटे अडचणी ह्या येतच राहतात फक्त त्या अडचणींना सामोरे सकारात्मक दृषटिकोनातून कसे जायचे हेही शिकलो. गेल्या वर्षभरात केलेल्या संघर्षातून जीवन कसं जगायच हे ही जीवनातील अनुभवाच्या शाळेतुन शिकलो .... २०१७ मध्ये माझ्या दृष्टीने सकारात्मक जर कोणता अनुभव असेल तर तो म्हणजे आदरणीय तुकाराम मुंडे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करायला भेटणे...
त्यांच्याकडून एक तत्व मात्र मी शिकलो ते म्हणजे 'कोणतंही काम करत असताना ते काम समाज हिताचे असेल (public interest) आणि नियम व कायदा (rules and law) याच्या चौकटीत बसणारे असेल तर कोणाचाही विरोध असला तरी ते काम अवश्य करा... तो विरोध वैयक्तीक स्वार्थासाठी (self interest )असेल पण तुमच्या कामामुळे देशाचे हित असणार आहे.
वर्षाच्या शेवटी नम्रपणे एक सांगु इच्छितो की, माझ्या काही लेखाच्या मुळे चुकून काही मित्र मैत्रीनींचे, बंधू भगिनीचे, राजकीय कार्यकर्त्यांचे मन दुखावलं असेल तर मोठ्या मनाने माफ करा .. माझ्या मनामधे सामाजिक जनजागृतीचा आणि चांगले विचार आपल्यापर्यंत पोहचविण्याचा हेतु हा शुद्धच आहे त्यामुळे काही वेळा आपल्याच चुकलेल्या माणसांच्या वरती प्रहार करावे लागतात. वास्तववादी परिस्थिती समजावून घेऊन त्यावरती परखडपणे मत व्यक्त करणे कोणत्याही सर्वांगीण विचार करणाऱ्या लेखकाचे आद्य कर्तव्य असते तेच कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडण्याचा प्रयत्न करतोय......
तुम्हा सर्वांनीं माझ्या लेखाला दिलेला प्रतिसाद नक्कीच आत्मविश्वास वाढविणारा असाच आहे . नक्कीच येथून पुढे अजून चौफेर कश्या पद्धतीने लेखन होईल यासाठी मी सदैव प्रयत्नशील राहील असा विश्वास तुम्हाला देतो.. माझ्या मनात खूप साऱ्या आशा, अपेक्षा, स्वप्न मनात आहेत. त्या येणाऱ्या वर्षात पूर्ण करण्याचा 100% प्रयत्न असणार आहे.
येणारे २०१८ हे नवीन वर्ष आपल्या सर्वांना सुखाचे, समृद्धीचे,भरभराठीचे जाओ.... हीच ईश्वर चरणी प्रार्थना।
सर्व बंधू, भगिनी , मित्र, मैत्रिणी, या सर्वांना नवीन वर्षाच्या कोटी कोटी शुभेच्छा ।।
धन्यवाद....
श्री. प्रतिक यमगर
बाळेवाडी, आटपाडी, सांगली.
७७०९९३५३७४
शनिवार, ३० डिसेंबर, २०१७
नवीन वर्षा बद्दलच्या समज गैरसमजाबाबत
नमस्कार मित्रांनो,
नवीन वर्षा बद्दल अनेक मेसेज आपल्या वाचनात येत आहेत. काहींचे मत असे आहे की आपले नववर्ष गुढीपाडव्याला असते त्यामुळे आम्ही गुढीपाडव्याला च शुभेच्छा देणार.... नववर्ष गुढीपाडव्याला असते या मताशी मी सहमत आहे परंतु सध्याच्या विज्ञान आणि तंत्रद्यानाच्या युगात जागतिक स्थरावर ज्या दिनदर्शिकेचा वापर जास्त केला जातो तसेच ज्या दिनदर्शिके चा वापर आपण आपल्या दररोजच्या जीवनात करत असतो त्या नववर्षानिमित्त शुभेच्छा दिल्या किंवा स्विकारल्या तरी काही हरकत नाही. कारण आपल्या मराठी महिन्या प्रमाणे फार कमी व्यवहार चालतात सगळीकडे याच तारखा, वेळ, कॅलेंडर प्रमाणे व्यवहार होत आहेत. खरंतर हे कॅलेंडर आपल्या दररोजच्या जगण्याशी सबंधित झाले आहे... मराठी महिने ही जास्तीत लोकांना माहीत नसतात अर्थात त्यांची काहीच चुकी नाही कारण आपल्या दररोजच्या जगण्यात याचा संबंधच कुठे नसतो... अगदी पौर्णिमा अमावस्या सुद्धा जरी मराठी महिन्या नुसार वाटत असल्या तरी याच कॅलेंडर मध्ये आपण पाहतो. त्यामुळे नवीन स्वागत आपण सर्वांनी आनंदाने केलं पाहिजे...
फक्त ते करत असताना आपली संस्कृती काय आहे याचेही आत्मभान आपण ठेवणे गरजेचं आहे. जीवनामध्ये एन्जॉय असावा याबद्दल माझ्या मनात तरी नक्कीच दुमत नाही परंतु तो एन्जॉय करत असताना इतर समाजाला काही त्रास होणार नाही तसेच आपल्या संस्कती ला कोणताही तडा जाणार नाही याचा विचार आपण केला पाहिजे. खरंतर यामुळे आपले शरीर आणि मनही निरोगी राहण्यास मदत होते. अर्थात हल्ली एन्जॉय, मनोरंजनाच्या संकल्पना बदलल्या आहेत.. पण माझ्या मते व्यसन म्हणजे एन्जॉय नाही.... आपण ते समजण्या इतपत प्रगल्भ नक्कीच आहोत....
काल कमला मिल कंपाऊंड या अनधिकृत इमारतीत आग लागून झालेल्या दुर्घटनेसंदर्भात...
काल कमला मिल कंपाऊंड या अनधिकृत इमारतीत आग लागून झालेल्या दुर्घटनेमुळे अनधिकृत बांधकामाचा मुद्दा चर्चेत आला आहे. आदरणीय मुंढे साहेब नवी मुंबईचे आयुक्त असताना अनेक अनधिकृत बांधकामे कोणत्याही नेत्यांची भीडभाड न ठेवता जमीनदोस्त केली होती त्यावेळी सर्व राजकीय पक्षातील सर्व नगरसेवक आणि पदाधिकारी मुंढे साहेबांच्या अनधिकृत बांधकामाबाबतच्या मोहिमे विरोधात एकत्र आले होते. अगदी महापालिकेत ठराव ही पास केला होता. परंतु आदरणीय मुंढे साहेबांनी कोणत्याही राजकीय विरोधाला न डगमगता प्रामाणिक आणि कार्यक्षम पणे भ्रष्ट व्यवस्थेविरोधात काम हाती घेतले होते. अखेर राजकारणी, बिल्डर आणि अधिकारी या लॉबीने मुंढे साहेबांच्या सारख्या प्रामाणिक अधिकाऱ्याची बदली घडवून आणली...
फक्त सांगण्याचा मुद्दा इतकाच होता की आपण एखादी घटना घडल्यानंतर त्या गोष्टीकडे जास्त लक्ष देतो. मग पुन्हा त्या घटनेस जबाबदार असणाऱ्या ना काढून टाकले जाते. पण जीव जातो तो सर्वसामान्य माणसांचा..... गेलेले जीव काय कितीही कारवाई केली तर पुन्हा येऊ शकत नाहीत. एखादी दुर्घटना घडूच नये यासाठी आपण आपत्ती पूर्व व्यवस्थापन किती करतो... आणि आपत्तीपूर्व व्यवस्थापन करतो त्याला आपण किती साथ देतो?? हा खरा प्रश्न आहे.
त्या कमला मिल कंपाऊंड चे अगोदरच अनधिकृत बांधकाम होऊ दिले नसते तर आज इतक्या जनाचा जीव गेलाच नसता...
अनेक राजकीय नेते एखादी दुर्घटना घडली की जनतेची सहानुभूती मिळावी यासाठी त्या दुर्घटना स्थळाला भेट देतात,(अगदी त्या घटना स्थळाला स्पिकनिक स्पॉट चे स्वरूप आणतात) काही प्रमुख पदाधिकारी माध्यमांना भावनिक प्रतिक्रिया देतात परंतु आधीच जर अशा गैरव्यवहाराना साथ दिलीच नसती तर ती दुर्घटनाच घडली नसती... ही खरी वस्तस्थिती आहे...
बाळेवाडी, ता. - आटपाडी,
जि.- सांगली.
७७०९९३५३७४
शुक्रवार, १७ नोव्हेंबर, २०१७
आदरणीय बाळासाहेबांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन.💐💐💐
आदरणीय बाळासाहेब ठाकरे हे नाव जरी ऐकले तर मनात सर्वप्रथम प्रचंड आदर निर्माण होतो. राजकारणातील एक दमदार कडक स्वभावाचा नेता... ज्यांनी महाराष्ट्रातील मराठी माणसाला ताठ मानेन जगायला शिकवलं... ज्यांनी महाराष्ट्रातील मराठी माणसाला स्वतःच्या अन्यायाविरोधात लढायला शिकवलं... ज्यांचे नाव जरी ऐकले तरी अनेकांचे धाबे दणाणतात..... राजकारणात बिनधास्त बोलणारा माणुस.... विरोधकांच्यावर प्रहार करताना कोणाचीही भीड न बाळगणारा माणूस म्हणजे आदरणीय बाळासाहेब ठाकरे...
ज्यांच्यामुळे आज असंख्य मराठी पोरं नगरसेवक, आमदार, खासदार, मुख्यमंत्री झाली... हो त्यांच्यामुळेच आज मुंबई मध्ये मराठी माणूस ताठ मानेने राहू शकतो.. साठ सत्तरीच्या दशकात मराठी माणसांच्या लढ्यात बळ देणारा नेता , साथीदार.......
ज्या ज्या वेळी मराठी आणि हिंदू सामाजाच्या संस्कृतीवर घाला घालण्याचा प्रयत्न केला गेला तेव्हा सर्वप्रथम त्याविरोधात बाळासाहेबांचे सणसणीत प्रहार तिथे उमटले गेले........
बाळासाहेब एवढ्या जहरी भाषेत प्रहार करायचे की पुढच्या विरोधकाला काय बोलायचे हेच समजत नसे.... बाळासाहेबानी तो स्वाभिमान शेवटपर्यंत जपला... त्यामूळेच आज सर्वच पक्षाच्या सर्वच नेत्यांना आदरणीय बाळासाहेब यांच्याविषयी प्रचंड आदर आहे... आज बाळासाहेब आपल्यात नाहीत ही खंत आहे पण जरी नसले तरीही त्यांचे सणसणीत विचार, त्यांचा स्वाभिमान प्रत्येक मराठी माणसाच्या समवेत आहेत. आज दररोज सोशल मीडियामध्ये आम्ही स्वतःला व्यक्त करत असताना कोणाचीही भीती आणि तमा न बाळगता निर्भीड आणि निपक्षपातीपणे व्यक्त होतो याचे सर्वात महत्त्वाचे प्रथम कारण म्हणजे संविधानातील मूलभूत अधिकार तर दुसरे महत्वाचे कारण म्हणजे बाळासाहेबांनी चुकीच्या घटनांवर बिनधास्त व्यक्त व्हायला... प्रहार करायला शिकवलं, हो त्यांनीच आमच्या सारख्या सर्वसामान्य नवतरुणांना सांगितले 'सत्य बोलायला कोणाच्या बापाला ही घाबरायचे नाही.' अश्या शिकवलेल्या स्वाभिमानामुळेच आज असंख्य मराठी बांधव स्वतःला चांगल्या पद्धतीने व्यक्त करत आहेत... ही समग्र लोकशाहीच्या दृष्टीने आनंदाची गोष्ट आहे पुनश्च एकदा आदरणीय बाळासाहेबांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन.💐💐💐
✍🏻प्रतीक यमगर
रविवार, १२ नोव्हेंबर, २०१७
पोलिसांची वर्दी दर्दी होत चालली आहे का?*
महाराष्ट्राच्या इतिहासात सांगली जिल्हा हा राजकारण्यांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. सांगली जिल्ह्यांनं महाराष्ट्राला वसंतदादा पाटील, आर आर (आबा) पंतगरव कदम, जयंत पाटील यांच्यासारखी मोठी नेतृत्व दिली. महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात अर्धा डझन मंत्री हे सांगली जिल्ह्याचे असायचे. पण आज त्याच सांगली जिल्ह्याचं राजकीय आणि सामाजिक महत्व कमी झालं आहे. आम्हाला सांगली म्हटलं की एवढया मोठ्या नेतृत्वाचा जिल्हा म्हणून आठवतो पण मित्रांनो आज त्याच सांगली जिल्ह्याचं नाव गेल्या पाच दिवसापासून संपूर्ण महाराष्ट्रात पोलीस अधिकारी आणि काही पोलिसांनी अनिकेत कोथळे नावाच्या तरुणाला थर्ड डिग्रीचा वापर करून तसेच त्याला मारून आंबोली घाटात जाळून टाकल्याप्रकरणी महाराष्ट्रात मीडियावर, वर्तमानपत्रात आणि सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर गाजत आहे. खरंतर या प्रकरणांमुळे पोलिसांच्या प्रतिमेला तडा गेला आहे त्याबरोबरच जनतेतील त्यांच्या विश्वासार्हतेला हे धोका निर्माण झाला आहे. 'सदरक्षणाय खलनिग्रहणाय ' असे ब्रीद वाक्य घेऊन काम करणाऱ्या पोलीस दलाला आज मात्र आपण नेमकं कोणाचे रक्षण आणि कोणाचे भक्षण करतोय हे प्रश्न विचारण्याची वेळ येऊन ठेपली आहे. सांगली जिल्ह्यानं आर आर पाटील (आबा) यांच्यासारखा कर्तव्यदक्ष आणि प्रामाणिक गृहमंत्री या महाराष्ट्राला दिला आज त्याच आबांच्या जिल्ह्यात आणि त्याच पोलीस खात्यात अश्या पद्धतीचे नीच प्रकरण घडत आहे हे दुर्दैव आहे याची खंत सांगलीला जिल्ह्याला नक्की वाटते आहे. आज सांगली जिल्ह्यात चोरीचें, दरोड्यांची प्रकरणे मोठ्या प्रमाणात घडत आहेत. गुंडगिरीचे प्रमाण ही वाढले आहे. काही दिवसांपूर्वी 9 कोटी हडप केल्याचे प्रकरण ही ताजे आहे. गुंडाकडून हप्ते घेण्याचे धंदे ही राजरोसपणे चालू आहेत. काही पोलीस अधिकारी तर त्यांच्या भ्रष्ट कारभाराची बातमी पेपरमध्ये छापली म्हणून संपादकाला धमकी देत आहेत. पांढऱ्या कपड्यातील गुंडगिरी करणारे नेते आणि भ्रष्ट पोलीस अधिकारी यांचं साटलोट जोरात चालु आहे.
खरंतर पोलीस हे जनतेच्या रक्षणासाठी असतात पण एखादा सर्वसामान्य माणूस पोलिस ठाण्यात एखादी तक्रार किंवा गुन्हा दाखल करण्यासाठी गेला असता त्याची तक्रार ऐकून घेण्याऐवजी त्यालाच उद्धट पद्धतीने बोललं जातं. त्याचं म्हणणं ऐकून घेण्याऐवजी त्यालाच गुन्हेगारासारखी वागणूक दिली जाते. साधे त्याच्याशी सभ्यतेने बोलत नाहीत, ही अनेक पोलीस ठाण्यातील वस्तुस्थिती आहे.
काही ठिकाणी तर भ्रष्ट आणि लाचार पोलीस अधिकारी आणि त्या भागातील नेते (खरंतर हेच गुंड असतात) यांच्या संगनमताने अनेक बेकायदेशीर व्यवहार चालतात. एखाद्या गुन्हयात त्या नेत्यांच्या कार्यकर्त्याला अटक केली तर लगेच तो गुंडप्रवृत्तीचा नेता फोनवरून पोलिसांना 'तो माझा कार्यकर्ता आहे , त्याला सोडा' असे सांगीतल्याबरोबर तो पोलीस अधिकारी त्याला सोडतो, अश्या घटना घडत आहेत ही नक्कीच लाजिरवाणी गोष्ट आहे.
त्यामुळे हे भ्रष्ट पोलीस अधिकारी आणि गुंड प्रवृत्तीचें नेते यांच्यामुळे पोलीस खात्याची प्रतिमा मलिन होत आहे. महाराष्ट्रासारख्या मोठ्या राज्याला स्वतंत्र गृहमंत्री असणं गरजेचं आहे, परंतु मुख्यमंत्री महोदय स्वतःकडे गृहखाते ठेवून काय साध्य करू इच्छितात हे समजणे कठीण आहे. मला वाटतं, महाराष्ट्रातील संवेदनशील अश्या गृह खात्याला स्वतंत्र गृहमंत्री मिळाला पाहिजे. आणि जी पोलीस दलात बेबंदशाही चालु आहे तिला कुठेतरी रोखणे शांततामय आणि समृद्ध महाराष्ट्राच्या दृष्टीने महत्वाचे आहे. पानिपतच्या युद्धात जसा विश्वास राहिला नाही असे म्हटले जाते तसेच सामान्य जनतेचा पोलीस खात्यावरचा विश्वास या प्रकरणामुळे काही प्रमाणात गमावला आहे असेच म्हणावे लागेल. कोथळे मृत्यू प्रकरणात समावेश असलेल्या पोलीस अधीकारी आणि पोलीस यांना शिक्षा झालीच पाहिजे त्याचबरोबर सांगली जिल्ह्यातील पोलीस खात्यात मोठया ऑपरेशनची गरज आहे, नाहीतर गुंड प्रवृत्तीचे नेते आणि भ्रष्ट पोलीस यांच्यामुळे पोलीसांची वर्दी दर्दी झाल्याशिवाय राहणार नाही.
✍🏻प्रतीक गणपत यमगर
बाळेवाडी,
ता. आटपाडी, जि. सांगली
7709935374
📝Popatgyamgar.blogspot.com
📝https://pratikyamgar.wordpress.com
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)




