विवेक विचार

विवेक विचार

बुधवार, १९ ऑगस्ट, २०१५

विवेक प्रहार

                महाराष्ट्र भूषण पुरस्कार दिल्यानंतर यावर्षी खुप स्वार्थी राजकारण झाले. प्रथम पाठिंबा द्यायचा नंतर विरोध(आतुन एक बाहेरुन पत्रकारांना एक) असे सोईस्कर निर्णय स्वतःस जाणते राजे म्हणवून घेणारयांनी घेतले. इतकी वर्षे सत्तेत होता आता जनतेनं सत्तेतून बाहेर हाकलले म्हणून महाराष्ट्रातल्या युवकांची माथी जातीय विष पाजून भडकावयाचे उद्योग आपण चालू केलेत. जनता काय एवढी दुधखुळी आहे का तुमचं हे षढयंत्र न समजायला???? महाराष्ट्रातील सूज्ञ जनतेला (खासकरुन युवकांना) तुमचे स्वार्थी राजकारण समजले आहे.   राजकीय भाषणात फक्त शाहु फुले आंबेडकरांचे नाव घ्यायचं पण  त्यांच्या विचाराप्रमाणे  वागायचं नाही.
               या सर्व पुरस्काराच्या विरोधातील गोंधळामुळे शाळेतील, विद्यालयातील,  महाविद्यालयातील, विद्यार्थ्यांनी कोणता संदेश घ्यायचा ???  तमच्या स्वार्थी राजकारणासाठी महाराष्ट्रातील या भावी पिढीवरती किती गंभीर परिणाम होत आहेत याची जनाची नाही किमान मनाची तरी लाज ठेवा.
               21 व्या शतकांत अजूनही आम्ही जाती पातीवरच भांडत बसतो हे खरंच महाराष्ट्रात 19 व्या व 20 शतकांत समाजसुधारणेचं कार्य करणारया समाजसुधारकांचं दुर्दैव म्हणाव लागेल...  छत्रपती शाहू महारज , महात्मा फुले , डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांना जातिनिर्मुलन करुन समता प्रस्थापित करायची होती त्यांना काय नवा जातियवाद निर्माण करायचा होता का??   सध्याच्या काळात जाती पातीवरुन होणारी फाटाफूट वाढवण्यापेक्षा कमी करणं गरजेचं आहे ते काम आपणासारखे  राष्ट्रीय चारित्र्याचे युवकच करु शकतात.

श्री. पोपट यमगर
(बाळेवाडी ता. आटपाडी, जि. सांगली)
7709935374

शुक्रवार, १४ ऑगस्ट, २०१५

🌷विवेक प्रहार🌷

आज भारताला स्वांतत्र्य मिळून 68 वर्ष झाली. भारताच्या स्वांतत्र्यासाठी अनेक स्वांतत्र्ययोद्धे झटले, झगडले, स्वतःच्या संसाराची राखरांगोळी करुन देशातील देशाच्या संसाराचा गाडा हाकला, भावी पिढयांचे आयुष्य सुखाचे समाधानाचे आनंदाचे व्हावे यासाठी इंग्रजांशी संघर्ष केला, कित्येक क्रांतीकारकांनी भारतमातेसाठी बलिदान दिले या सर्व भारतमातेच्या थोर सुपुत्रांना माझ्याकडुन स्वांतत्रदिनानिमीत्त प्रथमतः विनम्र अभिवादन।
       भारताला स्वांतत्र्य मिळाल्यानंतर पहिल्या पंधरा वर्षात भारताचे पंतप्रधान मा. पंडीत जवाहरलाल नेहरु यांनी आधुनिक भारताचा पाया शेती, उद्योग, व्यापार ,सेवा, परराष्ट्रीय संबध या सर्व क्षेत्रात भक्कम केला. पुढे त्यावरती देशाची इमारत बांधण्याचं काम पंतप्रधान लालबहादुर शास्त्री, पंतप्रधान  इंदिराजी गांधी, पंतप्रधान राजीवजी गांधी , पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी , पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी केले. आणि आता पंतप्रधान नरेंद्र मोदीजी भारताला प्रगतीच्या दिशेने घेऊन जाण्याचं कार्य करत आहेत. भारत अन्नधान्याच्या बाबतीत जगातील एक स्वयंपूर्ण देश आहे. 21 व्या माहिती आणि तंत्रज्ञानाच्या शतकात भारत जगाचं नेतृत्व करत आहे. हे चारच दिवसापूर्वी गुगलच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर निवड झालेल्या सुंदर पिचई यांच्या उदाहरणावरुन पुन्हा एकदा सिद्ध झाले. आपण उद्योग , क्रीडा, शिक्षण, विज्ञान या क्षेत्रातही गरुडभरारी घेत आहोत.  स्त्रीयांनीही त्यांना मिळणारया दुय्यम वागणूकीला व
फक्त चुल आणि मुल या मुलभुत चौकटीला बगल देऊन  अनेक क्षेत्रात केलेली प्रगती ही निश्चीतच उल्लेखनीय आहे. (उदा. पंतप्रधान इंदिरा गांधी, राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील,  माजी सनदी अधिकारी किरण बेदीजी, पेप्सीको कंपनीच्या सीईओ इंद्रा नुई, स्टेट बॅकेच्या मुख्य अरुधंती भट्टाचार्य इ.) याचाच अर्थ आपण विजयाच्या  (दिवंगत डाॅ. कलाम साहेबांनी पाहिलेल्या जागतिक महासत्तेच्या) दिशेने वाटचाल करत आहोत.)
        आपल्या भारताच्या समोर  अजुनही  काही समस्या आणि आव्हाने आ वासून पुढे आहेत. उदा. लोकसंख्या वाढ, दारिद्र्य, बेकारी, दहशतवाद, नक्षलवाद, दुष्काळ, भ्रष्टाचार, स्त्रियांवरचे अत्याचार इ. याबरोबर आपल्यातीलच काही अंतर्गत जातीय शक्ती तरुणांची माथी भडकावून जातींच्या भिंतीत अडकावून भारतात नवा जातीयवाद निर्माण करण्याचं कार्य करत आहेत. या सर्वच समस्या, आव्हानावरती उपाय काढण्याचं कार्य केंद्रामधे सकारात्मक दुरदृष्टीकोन असलेलं सरकार अखंड अविरतपणे करत आहे.   
आपणासही 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी या दोनच  दिवशी देशाची आठवण येऊ न देता दररोज अखंडपणे  एक भारतीय नागरिकाचं कर्तव्य आणि जबाबदारी म्हणुन छोट्या छोट्या गोष्टीमधून देशकार्य केलं पाहिजे. म्हणून भारतमातेच्या उज्वल भवितव्यासाठी आपण आपापल्या क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करावं हीच 69 व्या स्वातंत्र्य दिनी सदिच्छा। 
शेवटी एवढेच म्हणेन, 
"हेचि दान देगा देवा। भारतीयत्वाचा विसर न व्हावा॥"
 
श्री. पोपट यमगर 
(बाळेवाडी, ता. आटपाडी, जि. सांगली)
7709935374
जगाला उदाहरण घालुन देण्याचे जे आपले ध्येय आहे त्याच्या सिद्धीसाठी जे भगीरथ प्रयत्न आपणास करावे लागणार आहेत त्यासाठी तयार रहा..