विवेक विचार

विवेक विचार

बुधवार, १९ ऑगस्ट, २०१५

विवेक प्रहार

                महाराष्ट्र भूषण पुरस्कार दिल्यानंतर यावर्षी खुप स्वार्थी राजकारण झाले. प्रथम पाठिंबा द्यायचा नंतर विरोध(आतुन एक बाहेरुन पत्रकारांना एक) असे सोईस्कर निर्णय स्वतःस जाणते राजे म्हणवून घेणारयांनी घेतले. इतकी वर्षे सत्तेत होता आता जनतेनं सत्तेतून बाहेर हाकलले म्हणून महाराष्ट्रातल्या युवकांची माथी जातीय विष पाजून भडकावयाचे उद्योग आपण चालू केलेत. जनता काय एवढी दुधखुळी आहे का तुमचं हे षढयंत्र न समजायला???? महाराष्ट्रातील सूज्ञ जनतेला (खासकरुन युवकांना) तुमचे स्वार्थी राजकारण समजले आहे.   राजकीय भाषणात फक्त शाहु फुले आंबेडकरांचे नाव घ्यायचं पण  त्यांच्या विचाराप्रमाणे  वागायचं नाही.
               या सर्व पुरस्काराच्या विरोधातील गोंधळामुळे शाळेतील, विद्यालयातील,  महाविद्यालयातील, विद्यार्थ्यांनी कोणता संदेश घ्यायचा ???  तमच्या स्वार्थी राजकारणासाठी महाराष्ट्रातील या भावी पिढीवरती किती गंभीर परिणाम होत आहेत याची जनाची नाही किमान मनाची तरी लाज ठेवा.
               21 व्या शतकांत अजूनही आम्ही जाती पातीवरच भांडत बसतो हे खरंच महाराष्ट्रात 19 व्या व 20 शतकांत समाजसुधारणेचं कार्य करणारया समाजसुधारकांचं दुर्दैव म्हणाव लागेल...  छत्रपती शाहू महारज , महात्मा फुले , डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांना जातिनिर्मुलन करुन समता प्रस्थापित करायची होती त्यांना काय नवा जातियवाद निर्माण करायचा होता का??   सध्याच्या काळात जाती पातीवरुन होणारी फाटाफूट वाढवण्यापेक्षा कमी करणं गरजेचं आहे ते काम आपणासारखे  राष्ट्रीय चारित्र्याचे युवकच करु शकतात.

श्री. पोपट यमगर
(बाळेवाडी ता. आटपाडी, जि. सांगली)
7709935374

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: