गुरुवार, ३१ डिसेंबर, २०१५

🌷🇨🇮विवेक प्रहार🇨🇮🌷
खुप दिवसानंतर लेख लिहायला घेतल्यानंतर लेखाची सुरवात कुठुन आणि कशी करायची असा विचार करीत असतानाच अचानक कविवर्य कुसुमाग्रजांची कविता आठवली. "मध्य रात्र झाल्यावर शहरातील चौकात पाच पुतळे जमले आणि टिपं गाळु लागले. फुले म्हणाले, मी झालो फक्त माळ्यांचा। टिळक म्हणाले, मी तर चितपावन ब्राम्हणांचा। आंबेडकर म्हणाले, मी फक्त नवबौद्धांचा। शिवाजीराजे म्हणाले मी फक्त मराठ्यांचा। गांधीजी म्हणाले, तरी तुमचं बरं आहे तुमच्या पाठीशी किमान एक एक जात जमात तरी आहे माझ्या पाठीशी फक्त सरकारी कचेरीतील भिंती।।
        आपण अशा पद्धतीने राष्ट्रपुरुषांची जाती धर्मात वाटणी करुन ठेवली आहे ही एक खुप मोठी खेदजनक आणि मनाला बोचणारी शोकांतीका आहे. आज समाजामधे एखाद्या व्यक्तीला आपले म्हणायचे का?? हे त्याच्या जाती धर्मावरुन ठरवले जाते. आपण 21 शतकातील 16 व्या वर्षात पदार्पण करतोय. काळ खुप वेगाने बदलतोय तंत्रज्ञानाच्या माध्यमातुन दररोज नवनविन बदल घडुन येत आहेत. आपणही चांगले बदल स्वीकारले पाहिजेत, वाईट दुष्परिणाम ठरणारे बदल स्वीकारु नयेत. सर्व महापुरुषांनी आपणाला काळानुसार बदलले पाहिजे हे आपणाला समजाऊन सांगितले तरीही आपण फक्त जातीपाती आणि कर्मकांड, अंधश्रद्धा यामधेच अडकुन राहतो. त्या त्या महापुरुषांना त्या त्या काळामधे बदल घडवुन आणण्यासाठी कर्मठ सनातन्यांच्या विरोधाला सामोरे जाऊन मानसिक त्रास सहन करत बदल घडवुन आणले. छत्रपती शाहु महाराज , महात्मा फुले, डाॅ. बाबासाहेबांनी तर त्या काळी तथाकथित उच्चवर्णीयांनी केलेला खुप मोठा अपमान त्रास हसत हसत सहन केला आहे. स्वामी विवेकानंदजीनाही शिखागोला जाण्यापुर्वी भारतात कर्मठ सनातन्यांचा खुप मोठा विरोध झाला होता. कारण काय तर हिंदु धर्मातील व्यक्तींनी समुद्रमंथन करुन परदेशात जायचे नसते, पण स्वामीजीं तो विरोध झुडकारुन शिखागोला गेले आणि हिंदु धर्मातील महान संस्कृतीचे गुणगान गायले. आज तेच कर्मठ  लोक छत्रपती शिवाजी राजे यांच्या प्रमाणे स्वामीजींना एका कट्टरतेच्या चौकटीत बंदिस्त करत आहेत. भारतातील हे थोर विचारांचे महापुरुष काय कोणत्या एका कट्टरतेच्या चौकटीत बसणारी व्यक्तीमत्वे होती का? यांनी भारतातील प्रत्येक माणसास प्रांत,भाषा,जात,धर्म यांच्या पलीकडे जाऊन विश्वबंधुत्वापासुन माणुसकीची शिकवण दिली. आज महापुरुषांच्या नावाने आपले राजकीय नेते वेगवेगळ्या रंगाची दुकाने उघडुन स्वतःची राजकीय पोळी भाजुन घेत आहेत.पण त्या महापुरुषांचे विचार मात्र आचरणात आणाताना दिसुन येत नाहीत. उलट स्वतःच्या स्वार्थासाठी समाजामध्ये जातीयवाद जोपासण्याचा प्रयत्न करत आहेत.आज भाषणामधे महाराष्ट्राला शाहु फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणायचे पण त्यांचे जातीअंताचे विचार कधीच अंमलात आणायचे नाहीत. उलट स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी नविन जातीव्यवस्था निर्माण व्हावी यासाठी छुप्या पद्धतीने राजकारण करायचे हे न समजायला जनता काय दुधखुळी नाही. आज महाराष्ट्रातील राजकारणामधे ह्या जातीचा हा नेता, त्या जातीचा तो नेता , बहुजनांचा नेता असे जे ठरवले जाते ते लोकशाहीमधे अभिप्रेत नाही आहे. सामान्य माणसांच्या, गोरगरीब जनतेच्या, समाजाच्या नावाने राजकारण करायचे आणि एकदा की मोठ्या पदावर किंवा पातळीवर गेले की पाठीमागच्या जनतेकडे पहायचेही नाही. म्हणजे सामान्य माणसांच्या, गोरगरीब जनतेच्या, समाजाच्या नावाने राजकारण करत श्रीमंत व्हायचे पुन्हा समाजाच्या महत्वाच्या मुद्याऐवजी पदासाठी वाट पाहत बसायचे हे आजच्या नविन नेत्याचं महत्वाचे वैशिष्ट्य झाले आहे. परंतु अशा बोलघेवड्या नेत्यांनीही एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे ती म्हणजे नेता कितीही उच्चपदावर गेला तरी त्याला जमिनीवर आणण्याची ताकद गोरगरीब व सर्वसामान्य जनतेला डाॅ. बाबासाहेबांनी राज्यघटनेच्या माध्यमातुन मिळवुन दिली आहे. जनता ही नेहमी सतर्क असते हे आपण अनेकवेळा भुतकाळामधे पाहिले आहे, वर्तमानकाळामधे पाहतोय आणि भविष्यकाळामधेही आपणास दिसेल याबद्दल माझ्या मनात तरी कोणतीच शंका नाही.
जय हिंद।।
🙏🏻🙏🏻📚📚🇨🇮🇨🇮
श्री. पोपट यमगर
बाळेवाडी, ता.- आटपाडी,
जि.-सांगली .
Email-: pgyamgar@gmail.com
🇨🇮विवेक प्रहार🇨🇮🌷
मित्रांनो परवा बीडच्या सातभाई कुटुंबातील वडिलांने मुलीचं लग्न करायला पैसे नव्हते म्हणून आत्महत्या केली. महाराष्ट्रतील तमाम गोरगरीब सर्वसामान्य बंधु भगिनीना माझी हात जोडुन नम्रतीची विनंती आहे की, जर आपला जावई 21 व्या शतकातही हुंडा मागत असेल तर त्या जावयाला हुंडा देण्यासाठी तुम्ही आत्महत्या कशाला करता?? आपली मुलगी अशा भिकारी जावयाला देऊ नका!! ,, कारण भारतासह महाराष्ट्रातही मुलींचे प्रमाण (1000-940) खुप कमी आहे. त्यामुळे मुलगी अविवाहीत राहील याची काळजी क...रु नका. आणि एक आपल्या मुलाचे मुलीचे लग्न अतिशय साध्या पद्धतीने करा. उगाचंच होणारा वायफट खर्च टाळा.
राजेंनी एक ही रुपया हुंडा न घेता राजाराम महाराजांचे लग्न अतिशय साध्या पद्धतीने लावुन दिले. त्यांच्याच महाराष्ट्रातील स्वतःला राजेंचे मावळे म्हणुन घेणारे आपण आज लग्नामधे लाखो रुपयांचा चुराडा करतोय.. हे महाराष्ट्राचं पर्यायानं आपलंही दुर्दैव म्हणावं लागेल.. याबाबत समाजाने छत्रपती शिवाजी महाराजांचाच आदर्श घ्यावा ही तमाम शिवाजी महाराज यांच्या मावळ्याना माझी नम्रतीची विनंती.
श्री. पोपट यमगर
बाळेवाडी, ता.- आटपाडी , जि. सांगली
7709935374
pgyamgar@gmail.com