विवेक विचार

विवेक विचार

शुक्रवार, २५ मार्च, २०१६

लोकशाहीचा विजय

दिल्ली विधानसभा निवडणुक निकालानंतर बिहार विधानसभा निवडणुक निकालांनी पुन्हा एकदा देशातील लोकशाही ही सदृढ आहे हे दाखवुन दिले. निकाल पाहत असतानाच माझ्या मनात आले की या विषयावर आपण काय तरी विचार मांडले पाहिजेत म्हणुनच हे प्रहार तुमच्यापर्यंत पोहचवतोय. लोकसभा निवडणुकीच्या यशाने हवेत असलेल्या भाजपने दिल्लीतील दारुण पराभवाने काही धडा घेतला नाही असे दिसते. बिहार मधील निवडणुकांमधे नरेंद्र मोदी अमित शहा आणि त्यांच्या टीमने आपली पुर्ण प्रतिष्ठा पणाला लावली होती पण नितीशकुमार आणि त्यांच्या महाआघाडीने ती स्पेशल धुळीस मिळविली. जनतेला गृहीत धरुन जे पक्ष राजकारण करतात. त्यांना जनतेने मतदानाच्या माध्यमातुन असंच प्रत्युत्तर दिलं गेलं पाहिजे असं मला वाटतं, आणि जनता ते देतेय याचा मला आनंद वाटतो. 2014 च्या निवडणुकीमध्ये
काॅग्रेसने जनतेला गृहीत धरले होते त्याचे प्रत्युत्तर जनतेने त्यांना दिले. जनता ही लोकशाही मधे श्रेष्ठ असते. याचं हे एक उत्तम उदाहरण। मी शीर्षक असं दिलं आहे की लोकशाहीचा विजय तर याचे कारण म्हणजे जनता ही स्वतःचं व्यक्तीस्वातंत्र्य वापरत असते. त्यांना योग्य अयोग्य सर्व समजत असते.
      लोकप्रतिनिधीनी असं कधीच समजु नये की मी निवडुन आलो पदाधिकारी झालो मी काहीही केले तरी चालतंय किंवा छुपे अजेंडे राबविले तरी काय फरक पडतोय पण त्यांनी हे लक्षात घ्यावं की जनता ही झोपलेली नसते ,जनता तुमची कारस्थाने उघड्या डोळ्यांनी पाहत असते, आणि त्याचं प्रत्युत्तर लोकशाहीच्या माध्यमातुन देत असते. दिल्ली बिहारसारख्या उदाहरणांनी ते अधिक अधोरेखीत
होत आहे असं म्हणावं लागेल. 2014 च्या निवडणुकीपुर्वी जी आश्वासने भाजपकडुन दिली गेली होती ती आश्वासने
पाळण्याऐवजी वादग्रस्त विधाने करणे , हिदुंनी चार मुलं जन्माला घालणं, संसदेतील निरंजन जोतीचं वक्तव्य, दलीत कुटुंबाची कुत्र्याशी तुलना, सरसंघचालकांचे आरक्षणासंदर्भातील वादग्रस्त वक्तव्य, गोमांस खाल्याच्या खोट्या अफवेतुन अखलाखची हत्या, राज्यघटनेच्या सरनाम्यातुन धर्मनिरपेक्ष आणि समाजवादी हे शब्द काढणे, हिंदुत्वाचा छुपा अजेंडा पुढं करणे यासारख्या गोष्टीवरती जास्त लक्ष दिलं गेलं
आणि जनतेनं जो मोदीजींच्या वरती प्रचंड विश्वास दाखवला , भरभरुन मतदान केले ते काय या हिंदुत्वाच्या छुप्या अजेंड्यासाठी नाही तर काॅग्रेसचा 10 वर्षातील नाकर्तेपणा, प्रचंड भ्रष्टाचार , घोटाळे तसेच त्यांच्या विरोधातील सामाजिक कार्यकर्त्यांची आंदोलने यामुळे काॅग्रेस च्या विरोधात जनमाणसामधे निर्माण झालेली प्रचंड चीड ही लोकसभेला भाजपला निवडुण देण्याची महत्वाची कारणे होती. तसेच गुजरातचे विकासाचे माॅडेल पाहुन असेल किंवा एक सक्षम नेतृत्वामुळे मतदान केले. मोदीजींनी दिलेल्या आश्वासनावरती मतदान केले. पण दिलेल्या आश्वासनाकडे गांभीर्याने पाहिलंच नाही त्यापैकीच एक उदाहरण म्हणजे धनगर आरक्षण ।
         महाराष्ट्र निवडणुकीवेळी प्रचारसभामध्ये मोठमोठ्या भाषणात भाजपचे नेते सांगत होते की एका महिन्यात आरक्षण देऊ , महाराष्ट्रात
सत्ता येऊन एक वर्ष झाले तरी धनगर समाजाच्या आरक्षणाकडे जाणीवपुर्वक दुर्लक्ष तर केलेच पण भाजप मधल्या काही नेत्यांची विधाने
आरक्षणविरोधी आहेत. भाजपने आरक्षण देण्याऐवजी धनगर समाजाच्या नेत्यांना छोटी- मोठी पदं देणे चालु केले आहे, म्हणजे
मागच्या दहा वर्षामधे काॅग्रेस राष्ट्रवादीने जे केलं तेच आता भाजप करतंय. समाजाचे नेते पदासाठी लाचार झाले असतील पण समाज मात्र कधीच नाही. तुम्ही ज्यांना पदाचे गाजर दाखवलंय ते जरी पदाच्या लालसेने शांत बसले असले तरी जागरुक तरुण छावे शांत कधीच बसणार नाहीत. पदांच्या लालसेने प्रत्येक ग्रामपंचायतीपासुन महानगरपालिका, विधानसभा निवडणुकामधे समाजाचे स्वाभिमानी नेते म्हणुन जोरजोरात ओरडुन भाजपचा प्रचार करत आहेत. एका महिन्यात आरक्षण देऊ असं म्हणणार्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे दौरे आयोजित करत आहेत पण मुख्यमंत्र्यांना जाहीर भाषणात आरक्षणाबद्दल जाब विचारण्याची हिम्मत त्यांनी दाखविली नाही ही लाजीरवाणी गोष्ट आहे. काँग्रेस व राष्ट्रवादी वाल्यानी 60 वर्षे फसविले हे 100 % खरं आहे त्यात दुमत असण्याचे नक्कीच कारण नाही पण भाजपही आता त्यांच्याच पावलावर पाऊल टाकत असल्याचं दिसून येतंय. आघाडी सरकारने गेली 60 वर्ष फसवले म्हणुन तर तुम्हाला आम्ही सत्तेवर आणले आहे. तुम्ही सारखेच घोकणपट्टी करत आहात की त्यांनी 60 वर्षात केलं नाही मग आम्ही एका वर्षात कसं काय करायचे? तसेच न्यायालयात मराठा आरक्षणासारखे धनगर आरक्षणाचे होऊ नये त्यासाठी आम्ही अभ्यास करुन आरक्षण देऊ असं जे सध्या सत्ताधारयाकडुन बोललं जातंय ही समाजाची निव्वळ शुद्ध फसवणूक आहे याचे कारण म्हणजे मराठा आरक्षण टिकले नाही कारण मराठा समाजाला नव्याने आरक्षण चालु केले होते पण धनगर समाजाला राज्यघटनेमध्येच अनुसुचित जमाती मधे समाविष्ट केले आहे. परंतु धनगर व धनगड या र आणि ड च्या चुकीमुळे ते गेली
60 वर्ष धनगर समाजाला ते लागू झाले नाही त्यासाठी धनगर व धनगड या जाती वेगळ्या नसून त्या एकच आहेत अशी फक्त शिफारस राज्य
सरकारने केंद्र सरकारला पाठवायची आहे. त्यामुळे आम्ही मराठा समाजासारखे नव्याने आरक्षण मागत नसून जे आम्हाला पुर्वी घटनेमधे
दिलंय तेच लागु करा याची आम्ही मागणी करतोय.
           महाराष्ट्रात भाजप सत्तेवर येऊन जवळजवळ एक वर्ष होत आले तरी अजूनही सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणत आहेत की आम्ही अभ्यास करतोय? मग माझ्या सारख्या तरुणाला हा प्रश्न पडतो की आरक्षण या प्रश्नावर सन्माननीय देवेंद्रजी Phd करत आहेत की काय? शरद पवार साहेबांनी गेली 60 वर्ष अभ्यास केला देवेंद्रजी तुम्ही किती वर्ष समाजाचा अभ्यास करणार आहात? सन्माननीय देवेंद्रजी तुम्हाला तर फक्त केंद्राला शिफारस पत्र पाठवायचे आहे. एक वर्ष होऊन गेले तरी तुम्ही अजून त्यादृष्टीने पावलेही उचलल्याचं दिसून येत नाही. 4 जानेवारी च्या आरक्षणाच्या मेळाव्यामधे आदरणीय देवेंद्रजी तुम्ही म्हणाला होता 15 दिवसाच्या आत निर्णय घेऊ, आज एक वर्ष होत आले तरी तुम्ही अजुन निर्णय घेतला नाही तुम्हाला वाटलं असेल की समाजाला टोलवाटोलवीची उत्तरे दिली तरी चालतील पण आज धनगर समाज अशिक्षीत राहिलेला नाही, समाजातील अनेक सुशिक्षीत तरुण छावे विविध माध्यमातुन जनजागृतीचे काम करत आहेत. या जनजागृतीच्या माध्यमातुन समाज तुम्हाला टोलवायला कमी पडणार नाहीच नाही तर जसं दिल्लीत बिहारमधे लाथ मारुन ठेसललं गेलं तसंच महाराष्ट्रातही ठेसलुन काढतील. त्यामुळे विचार करुन लवकरात लवकर निर्णय घ्यावा हीच नम्रतीची विनंती ।
श्री. पोपट यमगर
बाळेवाडी ता. आटपाडी,
जि. सांगली
🌷विवेक प्रहार🌷
आज लातुरच्या मोहिनी चे पत्र वाचुन काळजात धस्स्स झाल. आज 21व्या शतकातही हुंड्यासारख्या सनातनी रुढीवरुन छत्रपतीं शिवाजी महाराज , शाहु, फुले , आंबेडकर यांच्या सुधारणावादी विचारांच्या महाराष्ट्रात हत्या आत्महत्या होत आहेत ही मनाला थक्क करणारी गोष्ट आहे. आज एकटी मोहीनीच अशी मुलगी नाहीये मित्रांनो ।।। मोहिनीसारख्या अशा हजारो मुलींचे जीवन उध्वस्थ होत आहे. आज सांगायलाही लाज वाटते की अशिक्षीत व्यक्तींच्या पेक्षा शिक्षीत आणि श्रीमंत व्यक्तीच जास्त हुंडा घेत आहेत कारण काय तर म्हणे हुंडा जास्त घेतल्याने आमच्या कुटुंबाची समाजात जास्त प्रतिष्ठा, मान सन्मान वाढतो.
जर जास्त हुंडा घेतल्याने तुमची प्रतिष्ठा वाढत असेल तर गोरगरीब सर्वसामान्य मुलींच्या (मोहिनीसारखींच्या) प्रतिष्ठेचे त्यांच्या मान सन्मानाचे काय???
त्यांचे जीवन तुम्ही परत मिळवुन देऊ शकता का???
मग तुम्ही शिक्षणातुन कोणते विचार घेतले??? अशा प्रश्नांची उत्तरे आपण आपल्या मनातुन मिळविणे खुप गरजेचे आहे.
मी यापुर्वीही बीडच्या सातभाई कुंटुबातील वडिलांने आत्महत्या केली तेव्हा सांगितले होते की जर तुमचा होणारा जावई हा हुंड्याच्या स्वरुपात भीक मागत असेल तर अशा भिकारी जावयाला कदापी तुमची मुलगी देऊ नका।(फक्त गोरगरीब आणि सर्वसामान्य पालकासाठी) आज समाजात मुलींचे प्रमाण खुप कमी आहे मुलगी अविवाहीत राहील याची कोणतीही काळजी करु नका।।
माझ्या सर्व तरुण सुशिक्षीत सुसंस्कृत अविवाहीत मित्रांना आणि मैत्रीणीना नम्रतीची विनंती आहे की आपण सर्वानी अशी शप्पथ घेतली पाहिजे की मी हुंडा घेणार नाही आणि कोणाला देणारही नाही, तरच येणार्या काळात बदल घडुन येईल.
आज मी परमेश्वराला साक्षी मानून वचन देतो की,
मी माझे लग्न जमवताना हुंडा मागणार नाही .
उलट त्या मुलीच्या आई वडिलांना वचन देणार की
तुमच्या काळजाच्या तुकड्याला मी प्राणपनाने जपेल.
मित्रानो फ़क्त हळहळ करू नका...
परिवर्तन करा ...सुरवात अत्ता लगेच स्वतःपासुन करुया
मी तर केलीच आहे.
जे मेले तरी आपली वचन पाळतात त्यांनी आज
वचन दया ग्रुप वर
दयाल ना वचन...?
(माझ्या साठी नव्हे..तुमचे मन सांगत आसेल तर दया...)
श्री. पोपटराव यमगर
रा.-: बाळेवाडी ता.-: आटपाडी जि.-: सांगली
7709935374
🌷विवेक प्रहार🌷
आरपार प्रामाणिकता अन निरागसता …
महात्मा गांधींवर सगळ्यात जास्त विनोद आपल्या देशात होतात . मजबुरी का नाम महात्मा गांधी हा त्यातला लोकप्रिय विनोद . वास्तविक गांधींचे जीवन पहिले तर या माणसाला कोणतीच मजबुरी नव्हती पण तरीही मजबुरीचे नाव आपल्या देशात गांधी ठेवले जाते . या देशातले आंबेडकरवादी [कट्टर ] गांधींना आपला शत्रू मानतात बामसेफ , मूलनिवासी संघ वगैरे गांधी कसे खलनायक होते याचीच मांडणी करीत आले आहेत . गांधी हा असा माणूस आहे जो एकाच वेळी पुरोगामी अन प्रतिगामी यांचा शत्रू ठरला आहे .
लोक… नेते … वाटेल तेव्हा गांधीला वापरतात अन वाटेल तेव्हा फेकून देतात पण गांधीवर त्याचा तसूभरही परिणाम होत नाही . कधी पाकिस्तान निर्मिती तर कधी ५५ कोटीचे आरोप तर कधी मुस्लिम अनुनयाचे बालंट सहन करीत गांधी या आरोपांचे प्राणवायू मध्ये रुपांतर करून अमरत्वाकडे सरकत आहे . कोणे एकेकाळी अस्थिपंजर म्हाताऱ्याला नथुराम गोडसे नावाच्या तरुणाने मारले पण त्यानंतर सतत गांधीला मारण्यासाठी जोतो टपलेला असतो तरीही गांधी मरत नाही . गांधी मरत का नाही ? या प्रश्नाने आपल्या देशात काही जणांना वेड लागण्याची पाळी आली आहे तर काही लोक ठार वेडे झालेले आहेत . गांधी या सगळ्यांकडे पाहून निष्पाप बालकाचे निरागस हास्य फेकतो .
गांधींवर खूप आरोप झाले पण त्याने कशाचीही तमा न बाळगता आपले सत्याचे प्रयोग अव्याहत सुरु ठेवले . जीवनात जे जे केले ते मोठ्या मानाने काबुल पण करून टाकले . हो हो … व्यसने … सेक्स … सगळे काही . या आरपार प्रामाणिक पणाला अन निरागसतेला सलाम .
श्री. पोपट यमगर
आटपाडी जि. : सांगली
7709935374
🌷💥विवेक प्रहार💥🌷
आजच्या आधुनिक युगामधेही आपण इतके अंधश्रद्धाळु कसे राहतो याची अनेक उदाहरणे समोर दिसत असतात. आपल्या ज्ञानेश्वर माऊलींच्या पासुन संत तुकाराम महाराज संत गाडगे महाराज आणि संत तुकडोजी महाराज यांच्यापर्यंत सर्वांनी खरी आणि शुद्ध भक्ती म्हणजे काय ते सांगुन ठेवले आहे.कपाळाला तिळा लावणं म्हणजे भक्ती नाही, फक्त पोथी वाचणं म्हणजे भक्ती नाही, मोठमोठी कोट्यावधीची मंदिर बांधणं म्हणजे भक्ती नाही , फक्त काशी मथुरेला(तीर्थक्षेत्री) जाणं म्हणजे भक्ती नाही. खरी भक्ती म्हणजे काय ते संत तुकाराम महाराजांनी खुप प्रखर शब्दात सांगितले आहे ,
जे का रंजले गांजले ।
त्यासी म्हणे जो आपुले ॥१॥
तोचि साधु ओळखावा ।
देव तेथेंचि जाणावा ॥२॥
संत सावता महाराजानींही सांगुन ठेवलंय,
कांदा-मुळा-भाजी ।
अवघीं विठाबाई माझी ॥१॥
लसुण-मिरची-कोथिंबिरी ।
अवघा झाला माझा हरीं ॥२॥
ऊस-गाजर-रातळू ।
अवघा झालासें गोपाळू ॥३॥
मोट-नाडा-विहींर-दोरी ।
अवघीं व्यापिली पंढरी ॥४॥
सावता ह्मणें केला मळा ।
विठ्ठल पायीं गोविंला गळा ॥५॥
तरीही आम्ही फक्त कर्मकांड करण्यातच अडकुन पडतो.
कोट्यावधी रुपयांची मंदिरे बांधुनही जर गोरगरीब आणि सर्वसामान्य लोकांना त्या मंदिरासमोर पोटासाठी तडफडुन मरावं लागत असेल तर एवढा पैसा खर्च करुन त्या मंदिर बांधण्यात काय अर्थ आहे??
आणि एक म्हणजे देवावर भक्ती करण्यासाठी कोणत्याही दलालाची मध्यस्थाची गरज नाही, ईश्वर आणि माणूस या दोघामधे असलेला परस्पर एकरुप संवाद म्हणजेच भक्ती होय.
खरं म्हणजे दररोजच्या जीवनात चारित्र्यशील आणि नितीमत्ता संपन्न राहणं तसेच दररोजचे काम कार्यक्षम आणि प्रामाणिकपणे करणं हीच आजच्या काळातील खरी भक्ती आहे...
श्री. पोपटराव यमगर
बाळेवाडी ता.- आटपाडी,
जि.- सांगली।
7709935374
🌷💥विवेक प्रहार💥🌷

मित्रांनो आज प्रेमाचा दिवस आहे. प्रथमतः प्रेम दिवसाच्या आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा। खरंतर प्रेम हे आयुष्यभर करायचे असते. फक्त एकाच दिवशी नाही. प्रेम करणं ही खाजगी वैयक्तीक गोष्ट आहे. त्यांना प्रेम करण्याचा संवैधानिक अधिकार आहे, ज्यांना प्रेम करायचे आहे त्यांनी खुशाल प्रेम करावं. त्याबद्दल दुमत असण्याचे कारण नाही
प्रेमाच्या बद्दल बोलत असताना प्रेम या शब्दाची व्याख्या संकुचित अर्थाने मी करणार नाही. अलीकडे प्रेम या शब्दाची व्याख्या ही फार संकुचित अर्थाने वापरली जाते. एका मुलाने एका मुलीवर किंवा एका मुलीने एका मुलावर प्रेम केलं म्हणजे यालाच समाज, आपण प्रेम म्हणु लागला आहे. असंही प्रेम आहे असु शकतं यात नक्कीच दुमत नाही अशाप्रकारची काही चांगली उदाहरणे ही समाजात घडुन गेली आहेत. पण आजकाल प्रेमाच्या नावाखाली गार्डन व इतर ठिकाणी जे अश्लील प्रकार समाजासमोर चालतात त्यामुळे मनात मात्र चीड येते.
यासाठीच सरकारने गार्डनस निर्माण केली आहेत का???
प्रेम करत असताना समाजभान कुटुंबभान राखणं गरजेचे आहे. प्रेम करत असताना आईवडिलांना ही विश्वासात घेतले पाहिजे. 20 वर्ष सांभाळणार्या आई वडिलांच्या समोर तुम्ही चुटकी वाजवुन सांगता की लग्न केलं तर त्याच्यासोबतच किंवा तिच्यासोबतच करीन, तेव्हा जो आई वडिलांचा समाजासमोर अपमान होतो तो कधीच भरुन निघण्यासारखा नाही. अशी अनेक उदाहरणे समाजासमोर घडत आहेत. प्रेमाच्या नावाखाली लग्न करायचे आणि पुन्हा त्या मुलीला धर्मांतर करायचे पुन्हा दुसरया मुलीवर प्रेम करायचे आणि तिलाही धर्मांतर करायचे अशी लव्ह जिहादसारखी प्रकरणे वाचुन मस्तक सुन्न होते. आज भारतामधे लव्ह जिहादची प्रकरणे ही हजारोमधे लाखामधे घडत आहेत. आणि दररोज वाढत आहेत.
मित्रांनो प्रेमाची व्याख्या विस्तृतपणे आपण सर्वानी लक्षात घेतली पाहिजे. एखाद्या व्यक्तीवर, वस्तुवर, देशावर, निसर्गावर, ह्रद्यापासुन मनातुन केलेले प्रेम हे खरे प्रेम असते.
शारीरिक आकर्षण आणि उपभोगासाठी केलेले प्रेम हे खरे प्रेम नसते तर ते ढोंगी प्रेम असते.
आणि एक खरी गोष्ट सांगितली पाहिजे की
भगतसिंग सुखदेव राजगुरु यांना फाशी 14 फेब्रुवारीला नव्हे तर 23 मार्च 1931 या दिवशी देण्यात आली होती...! त्यामुळे त्यांच्या नावाने प्रेमदिवसाला विरोध करणं हेही चुकीचंच आहे. पण
पुढे जाऊन आपण या थोर वीरांच्या कडुन हेही आत्मसात केले पाहिजे की एखादी प्रेयसी प्रियकर सोडुन गेला/ गेली म्हणुन आत्महत्या करायची नाही तर देशासाठी समाजासाठी आनंदाने जगत रहायचं.

क्यु मरते हो यारो बेवफा के लिए।
न देगी दुफटा कफन के लिए।
मरना है तो मरो वतन के लिए।
तिरंगा तो मिलेगा कफन के लिए।।

जाता-जाता एवढचं सांगेन...आपण महापुरुषांचे विचारही समजाऊन घेऊन सामाजिक भान आणि राष्ट्रीय चारित्र्य असलेला युवक म्हणुन पुढील काळात वाटचाल करुया..

श्री. पोपटराव यमगर
मु. बाळेवाडी ता.- आटपाडी
जि.- सांगली
7709935374
आज जागतिक महिला दिन।
जागतिक महिला दिनानिमीत्त सर्वप्रथम सर्व माता भगिंनीना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा।। त्या फक्त आजच्या दिवसापुरत्याच नाहीत तर सदासर्वकाळ आहेत. संपुर्ण जगाच्या पाठीवर ईश्वराची सुद्धा स्त्रीरुपामधे पुजा करणारे बहुधा आपली एकमेव संस्कृती आहे. एवढेच नाहीतर आपण आपल्या देशाला भारतमाता म्हणतो. आपल्यासाठी ही मायभुमी आहे मातृभुमी आहे.
एका बाजुला विचारात, बोलण्यात, संस्कृतीमधे हे सगळे पण दुसर्या बाजुला दररोज वर्तमापत्रात टी व्ही वरच्या बातम्या ऐकुन मन सुन्न होते. आजच्या तंत्रज्ञानाच्या युगातही हुंडाबळी, स्त्री भ्रुण हत्या, घरगुती छळाला कंटाळुन विवाहितेची आत्महत्या, जातपंचायतीकडुन अमानुष मारहाण, रस्त्यावरुन चालत असताना होणारी छेडछाड , बलात्कार यासारख्या घटना ऐकल्या वाचल्या पाहिल्या की मान शरमेने खाली जाते आणि मग मनामधे विचारांचं वादळ निर्माण होतं, आणि विचारी मनाला काही प्रश्न पडतात ते म्हणजे हीच आपली संस्कृती आहे का ??? मग कविवर्य कुसुमाग्रजांनी स्वांतत्र्यदेवतेची विनवणी या फटका काव्यप्रकारातुन परखड केलेले प्रहार आठवतात,
" समान मानव माना स्त्रीला
तिची अस्मिता खुडु नका।
दासी म्हणुनी पिटु नका वा
देवी म्हणुनी भजू नका॥"

देवघरात तीची पुजा करायची आणि तिला चार भिंतीच्या आतच चुल आणि मुल यातच बंदिस्त करायचं ह्या अनिष्ट प्रथा आता आपण बंद केल्या पाहिजेत. आपण प्रत्येक स्त्रीला हे समान माणुस म्हणुन मानले पाहिजे. त्यांना त्यांचे अधिकार दिले पाहिजेत. अधिकार त्यांचे हक्क दिले तरच त्या त्यांच्याकडे असलेले गुण ते समाजाला दाखवु शकतील.
आपल्या राजाने छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा स्त्रीला आपल्या भगिनीचाच दर्जा कायम दिला असल्याचं आपणास दिसुन येतं. स्वामी विवेकानंदजीनी सुद्धा 11 सप्टेबंर 1893 रोजी शिखागो येथील धर्मपरिषदेत भाषणाची सुरवात 'अमेरिकेतील भगिनी आणि बंधुनो ' अशीच केली होती आणि तिथुनच पुढे भारतीय संस्कृतीचा प्रसार केला.

स्वतःच्या कतृत्वावर मोठ्या झालेल्या अनेक स्त्रिया आज आपल्याला प्रत्येक क्षेत्रात दिसुन येत आहेत. आदर्श राजमाता जिजाऊ, लोकमाता उत्तम प्रशासक महाराणी अहिल्यादेवी होळकर, सावित्रीमाई फुले यांच्या पासुन आजच्या इंदिराजी गांधी, प्रतिभाताई पाटील, किरण बेदीजी, पेप्सीको कंपनीच्या सीईओ इंद्रा नुई, स्टेट बंकेच्या मुख्य अरुंधती भट्टाचार्य, मीरा बोरवणकर यासारख्या अनेक स्त्रियांनी आपापल्या क्षेत्रात उतमोत्तम काम केले आहे. आजच्या काळात प्रत्येक क्षेत्रात स्त्री ही पुरुषांच्या खांद्याला खांदा लावुन चांगल्याप्रकारे काम करत आहे हे तीने दाखवुन दिले आहे. आज 10 वी 12 वी किंवा स्पर्धा परीक्षांचे निकाल जाहीर झाले की टाॅप लिस्टमधे मुलीच असल्याचे आपणास पहायला मिळतात. 1948 साली महात्मा फुले आणि सावित्रीमाई फुले यांनी चालु केलेल्या स्त्री शिक्षण चळवळीची ही गोड फळे आहेत असं मानायला काय हरकत नाही. एक पुरुष शिकला की एक व्यक्ती साक्षर होते आणि एक स्त्री शिकली की पुर्ण कुटुंब साक्षर होते आणि ती स्त्री सावित्रीमाईंच्या सारखी असेल तर पुर्ण समाज साक्षर करते.
राजकारणामधे सुधा महिला आरक्षणामुळे महिला मोठ्या प्रमाणात राजकारणात येत आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थामधे 50 % महिला आरक्षणामुळे अनेक ठिकाणी महिला ग्रा. पं., पंचायत समिती, जिल्हा परिषद सदस्य, नगरसेवक, सरपंच , सभापती, जि. प. अध्यक्ष, महापौर झाल्याचे दिसुन येतात. पण येथे मला राजकारणातील स्त्रियांची एक कमतरता स्पष्टपणे नमुद केली पाहिजे ती म्हणजे स्त्रिया या मोठमोठ्या राजकीय पदावरती पोहचल्या पण त्या खुर्चीवर बसण्यापुरत्याच नाममात्र पदाधिकारी झाल्या आहेत की काय असा प्रश्न पडतो कारण ग्रामीण भागात अनेक ठिकाणी त्या ज्या पदावरती आहेत त्या पदाचा कारभार हा त्या पाहत नसुन त्यांचा पती किंवा नातेवाईक पाहत असल्याचे आपल्याला आढळुन येते.त्या सरपंच किंवा सभापती या नावापुरत्याच असतात. तर या व्यवस्थेमधेही आपण परिवर्तन केले पाहिजे. ही जी राजकीय पदं मिळतात त्यापदामधील अधिकारामधुन महिलांचे विविध प्रश्न, उपेक्षीत वंचीत दलीत समाजाचे काही प्रश्न, शेतकर्यांचे प्रश्न, समस्या अडचणी सोडवण्यात येतात. काही प्रमाणात चांगल्या योजना राबवुन सामाजिक विकास करता येतो. स्वतः सर्व आढावा बैठकांना उपस्थित राहुन वेळोवेळी अधिकार्यांच्या कडुन कामाची माहिती घेतली पाहिजे. शहरातील अनेक ठिकाणी महिलांनी कृतीतुन सिद्धही केले आहे, तळागाळातील ग्रामीण भागातील महिलांनी स्वतः पुढे येऊन ही कमतरता भरुन काढली पाहिजे.
लेखाच्या शेवटी माझ्या वाचनात आलेली आणि मला आवडलेली एक अप्रतिम स्त्रीविषयीची कविता मला आपणाशी शेअर करायला आवडेल,
" ती जीव लावते, जीव टाकते, जीव गुंतवते,
तुम्ही जीव घेता, ती सुद्धा जीव घेते पण तिनीच मरावं का?? अशा पद्धतीने जीव घेते.
तुमचंच जगताना, ती स्वताःला विसरते,
तुम्ही तिलाच विसरता।
ती सर्व सांभाळते, तुम्ही तिचं मनसुद्धा सांभाळत नाही.
तुमच्या यशात ती आनंद घेते, तुम्ही आनंदाच्या भरात तिचा उल्लेख सुद्धा विसरता।।
तिचं अस्तित्वच सुंदर आहे,
पण तुम्हाला तिच्या शरीरापलीकडे काही दिसत नाही.
ती जीवन सुंदर करते तिच्या वाट्याला कायम विटंबनाच येते .
तिचं रक्षण काय करणार? ,,
अरे तिचं रक्षण काय करणार?
तीच तुमची तटबंदी आहे तिलाच बंदिस्त करुन तुम्ही आत्मपात करुन घेताय.
घरात ती लक्ष्मी बनुन येते, तुम्ही तिचं पोत्यारं करता.
ती धनधन्याचं माफ घरात येताना ओलांडते, तुम्ही तिच्या आईबापाकडुन तिचं मातेरं करता.
ती माणूस आहे, आई आहे, बहीण आहे, मैत्रीण, बायको, प्रेयसी इत्यादी इत्यादी आहे
तमच्या लेकी ती फक्त मानी आहे.
ती लक्ष्मी, ती सरस्वती, ती दुर्गा, गौरी आहे,
निपात केलेल्या दुष्टांच्या कप्यांची माळ गळ्यात घालुन रक्तांनी वितळणारं राक्षसाचं मुंडकं हातात धरुन लाल भडक जीभ बाहेर काढत ती अष्टपुजा आहे, ती चंडीका आहे,
तुम्ही शिवशंकर व्हावं। तुम्ही शिवशंकर व्हावं। "
धन्यवाद।

श्री. पोपटराव यमगर
बाळेवाडी, ता.:- आटपाडी, जि.:- सांगली
7709935374