अद्वितीय बुद्धिमत्ता, त्या आधारे स्वत: घेतलेले अतिउच्च दर्जाचे शिक्षण, जागतिक दर्जाची विद्वत्ता, बंडखोरी व क्रांतिकार्य करण्याची प्रवृत्ती, संघटन कौशल्य, शिस्तबद्धता व वक्तशीरपणा, असामान्य वक्तृत्व, इंग्रजी भाषेवरील प्रभुत्व, प्रचंड वाचन, संशोधनात्मक अभ्यास, अभ्यासपूर्ण व प्रेरणादायी लेखन... अशा अनेक गुणविशेषांनी गौरविलेले व्यक्तीमत्व, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, अर्थतज्ञ डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र स्मृतीस 125 व्या जयंतीनिमीत्त प्रथमतः विनम्र अभिवादन।
आज भारतासह पुर्ण जगभर डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहाने साजरी होत आहे. नक्कीच मनामधे आनंद आहे. सर्वानी बाबासाहेबांचे विचार त्यांचे चरित्र , त्यांचा संघर्ष जाणुन घेतला पाहीजे. लेखाचं शिर्षक देतानाच माझ्या मनात विचार आला की काय द्यावं शिर्षक??? पटकन अनेक विचार मनात आले ते म्हणजे तुम्हा आम्हाला बोलण्याचं लिहीण्याचं स्वातंत्र्य दिलं, तुमच्या माझ्या मनात वर्षानुवर्षे भिनलेल्या जातीव्यवस्था धर्मव्यवस्था(खरंतर हा मानवतेवर लागलेला कलंक आहे) यापलीकडे जाऊन आपण सर्व या विश्वाची लेकरे आहोत, असा विश्वबंधुत्वाचा, समतेचा, एकतेचा, विचार भारतीय मनामनात पेरणारे डाॅ बाबासाहेब आंबेडकर हे अखंड वाहणार्या माणुसकीच्या प्रेमाचा झरा आहेत असं मला वाटतं. म्हणुनच विचारी मनाला या अर्थबोधातुन वरील शिर्षक सुचलं. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी समता, बंधुता, लोकशाही, स्वातंत्र्य, जागतिक अर्थकारण व राजकारण यांविषयी मांडलेले विचार आजही समर्पक ठरतात. त्यांचे कार्य आजही तेवढेच परिणामकारक व स्फूर्तिदायी ठरते. भारतात असलेल्या जातीव्यवस्थेच्या वर्णवर्चस्वाच्या होणार्या अन्याय अत्याचारातुन आपल्या देशाला व समाजबांधवांना या सामाजिक विषमतेच्या विळख्यातून बाहेर काढायचे त्यांनी ठरवले. प्राथमिक शिक्षण संपवुन परदेशात उच्च शिक्षण घेण्यासाठी गेले. त्यांना कोलंबिया विद्यापीठाने पीएच.डी. ची पदवी बहाल केली. १९२५ मध्ये त्यांनी मिळवलेल्या या डॉक्टरेटचा विषय होता, ‘नॅशनल डिव्हिडंड ऑफ इंडिया - ए हिस्टॉरिकल अँड अनॅलिटिकल स्टडी'. कोलंबिया विद्यापीठात त्यांनी समाजशास्त्र, राज्यशास्त्र व अर्थशास्त्र या विषयांचे अध्ययन केले. पुढे त्यांनी लंडन येथील विद्यापीठात ‘दी प्रॉब्लेम ऑफ रूपी’ हा प्रबंध सादर केला आणि डी. एस्सी. ही पदवी मिळवली.
भारतात आल्यावर सामाजिक विषमता दूर करण्याच्या हेतूने, अस्पृश्य मानल्या गेलेल्या समाजाची कैफियत समाजासमोर मांडण्यासाठी, त्यांनी ‘मूकनायक (१९२०), ‘बहिष्कृत भारत’ (१९२७), ‘जनता’ (१९३०) आणि ‘प्रबुध्द भारत’ (१९५६) अशी वृत्तपत्रे चालवली. या काळात जी काही वृत्तपत्रे महाराष्ट्रात होती, त्यातून अस्पृश्यांचे प्रश्न मांडले जात नव्हते. त्यामुळे (तत्कालीन) अस्पृश्यांसाठी स्वतंत्र वृत्तपत्रांची गरज होतीच. सामाजिक, सांस्कृतिक व राजकीय घडामोडी तसेच नवीन समाजाची निर्मिती या अनुषगांने त्यांनी त्यातून लिखाण केले. वृत्तपत्रांचा वापर त्यांनी कधीच केवळ आपल्या पक्षाची राजकीय ध्येयधोरणे राबविण्यासाठी केला नाही. आजच्या वृत्तपत्रांनी माध्यमांनी बाजारीकरणाचे रुप घेतले आहे. स्पृश्य आणि तथाकथित अस्पृश्य अशा दोन्ही समाजांच्या लोकांना विचार करण्यास प्रवृत्त करणे हे त्यांच्या लिखाणाचे वैशिष्टय होय. केवळ वृत्तपत्रांमधूनच नाही तर त्यांनी ‘दी अनटचेबल्स,’ ‘शूद्र पूर्वीचे कोण होते?’, ‘बुध्दा अँड हिज धम्म,’ असे ग्रंथ लिहिले. याशिवाय ‘थॉटस् ऑन पाकिस्तान’ हा जागतिक राजकारणावरील ग्रंथदेखील लिहिला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर केवळ जातिव्यवस्थेच्या विरोधातच लढत होते असे नव्हे, किंवा ते केवळ विशिष्ट एका समाजाच्या विकासाचाच केवळ विचार करत होते असेही नव्हे. त्यांना भारतीय स्वातंत्र्य लढ्याचेही भान होते. शिक्षण, अंधश्रद्धा, स्त्रियांची स्थिती, अर्थकारण, राजकीय किंवा प्रशासकीय व्यवस्था या मुद्यांकडेही त्यांनी भारताचे लक्ष वेधुन घेतले होते.
शाळेत असताना १८- १८ तास अभ्यास करणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर शिक्षणाचे महत्त्व चांगल्या प्रकारे ओळखून होते. 'शिक्षण हे वाघिणीचं दुध आहे जो कोणी ते पील तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही' असं त्यांचं स्पष्ट मत होतं. "फक्त वही पेन म्हणजे शिक्षण नव्हे तर बुद्धीला सत्याकडे भावनेला माणुसकीकडे, शरीराला श्रमाकडे नेण्याचा मार्ग म्हणजे शिक्षण होय. जसे जेवल्यावर होणारे समाधान हे तात्पुरते असते, याउलट शिक्षणातुन मिळणारी ज्ञानाची शिदोरी आयुष्यभर पुरते. पोटाची भूक भागवावीच पण एक पाऊल पुढे टाकुन शिक्षण घेऊन माणसाने बुद्धीची भुकही भागवावी" असं त्यांनी अनेक भाषणातुन सांगितलं आहे. शिक्षणाचा प्रसार व्हावा यासाठी त्यांनी मुंबई येथे १९४६ मध्ये सिध्दार्थ महाविद्यालयाची, तर औरंगाबाद येथे १९५० मध्ये मिलिंद महाविद्यालयाची स्थापना केली. याशिवाय त्यांनी ‘पीपल्स एज्युकेशन सोसायटी’ आणि ‘डिप्रेस्ड क्लास एज्युकेशन सोसायटी’ या शैक्षणिक संस्थांची देखील स्थापना केली. स्वतंत्र भारताचे लोकप्रतिनिधी, मंत्री कसे असावेत याचंही उत्तम उदाहरण त्यांनी कायदामंत्री असताना स्वतः घालुन दिलं आहे.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर ६ डिसेंबर, १९५६ ला हे जग सोडून गेले. आज भारतीय लोकशाहीच्या कसोटीचा काळ सुरू आहे. स्वतंत्र भारतातील लोकशाहीविषयी चिंतन करतांना डॉ. आंबेडकर म्हणतात की, "जोपर्यंत इंग्रज सरकार होते, तोपर्यंत आपल्या देशातील चांगल्या वाईट गोष्टीची जबाबदारी आपण त्यांच्यावरच टाकत होतो. पण आता आपण स्वतंत्र झाल्यामुळे चांगल्या वाईट गोष्टीची जबाबदारी आपलीच राहणार आहे. त्यामुळे आपल्याला आता अधिक जबाबदारीने वागावे लागणार आहे." मला लिहीताना, बोलताना, समाजात वावरताना, जगताना धुमसणार्या डोक्यात सतत बाबासाहेबांचे विचार आठवत राहतात. त्यांनीच आमच्यासारख्या वंचित समाज घटकातील मुलांना सांगितलं की अन्याय, अत्याचार सहन करु नका, अन्यायाची चीड व न्यायाची चाड ठेऊन शिक्षणाच्या माध्यमातुन प्रगतीकडे वाटचाल करा. आताच्या लोकशाहीसंपन्न असलेल्या देशात घडणार्या अन्याय, अत्याचार, अंधश्रद्धा, पारंपारीक रुढी, भ्रष्टाचार, घोटाळे, कट्टरतावाद यासारख्या घटनावर प्रहार करण्यासाठी आमच्यासारख्या नवतरुणांच्या हाती दिलेलं लेखणी हे शस्त्र नक्कीच वेळोवेळी मानवतेसाठी, अहिंसेसाठी, समतेसाठी, एकतेसाठी, बंधुत्वासाठी नक्कीच उचलेन असा ठाम विश्वास माझ्या मनामधे आहे.
"मोजु तरी कशी उंची तुझ्या कर्तुत्वाची,
तु जगाला शिकवली व्याख्या माणसातल्या माणुसकीची..
घायाळ पाखरांना पंख दिले तू!
मुक्या वेदनांना शब्द दिले तू!
तुझ्याच चेतनेने जगण्यास अर्थ आला...
युगा युगाच्या शोषितांचा उद्धार तूच केला!"

तु देव नव्हतास तु देवदुतही नव्हतास...
तु मानवतेची पुजा करणारा खरा महामानव होतास...घायाळ पाखरांना पंख दिले तू!
मुक्या वेदनांना शब्द दिले तू!
तुझ्याच चेतनेने जगण्यास अर्थ आला...
युगा युगाच्या शोषितांचा उद्धार तूच केला!"
हे महामानवा पुन्हा एकदा तुज कोटी कोटी वंदन।।।
💐💐💐💐💐
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
💐💐💐💐💐
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
श्री. पोपटराव यमगर
🏡बाळेवाडी ता.- आटपाडी,
जि.- सांगली📞07709935374
🏡बाळेवाडी ता.- आटपाडी,
जि.- सांगली📞07709935374
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा