राजकारण म्हणजे भ्रष्टाचार, 'पैशातून सत्ता आणि
सत्तेतून पैसा' कमावण्याचा उद्योग, अनेक नेत्यांची पोकळ
आश्वासने अशी सर्वसामान्य लोकांच्या मनातील राजकारण्याविषयीची भावना झाली आहे
परंतु मला ठामपणे सांगायला आवडेल ते म्हणजे या सर्वाना अपवाद व कोणत्याही वाद
विवादात न पडता सर्वांशी मिळून मिसळून सर्वांशी आदराचे असे संबंध निर्माण करणारे देशातील आदर्श नेता कसा असावा याचे उत्तम उदाहरण ज्यांनी जगण्यातून
दाखवून दिले असे ऋषितुल्य व्यक्तिमत्व आदरणीय आमदार गणपतराव (आबासाहेब)
देशमुख साहेब यांचा आज वाढदिवस... त्यांच्या वाढदिवसानिमित्त सर्वप्रथम त्यांना
सदा सर्वकाळ कोटी कोटी शुभेच्छा... आपणास उदंड आयुष्य लाभावे
हीच आपल्या वाढदिनी मनस्वी सदिच्छा...
सध्याचा काळच असा आहे की, राजकारणात सगळीकडे दलदल
माजली आहे, जनतेचा नेत्यांवर काडीचा भरोसा वाटत नाही.
पांढऱ्या खादीतल्या कोणालाही हात लावा. भ्रष्टाचाराचं काळं हाताला लागल्याशिवाय
राहत नाही. पण आपल्या राज्यात असा एक नेता आहे, ज्याच्यावर राखलेल्या
तळ्याचं पाणी चाखल्याचे आरोप करायला कुणी धजावत नाही. या बिनडागी नेत्याचं नाव मा. गणपतराव देशमुख म्हणजेच आदरणीय सन्माननीय
आबासाहेब. त्यांच्या वयाला 91 वर्षे पूर्ण होत आहेत. …हा 91 वर्षांचा तरुण माणूस गेली 11 निवडणुका सतत आमदार
म्हणून निवडून येतोय. राज्याच्या विधानसभेत कष्टकरी, शेतकरी, कामगार, वंचित घटकांचे नेतृत्व करत आहेत. त्यांनी राजकारणातले कित्येक
उन्हाळे पावसाळे पाहिलेत. ते बोलायला उभे राहिले की विधानसभा स्तब्ध होते.
मुख्यमंत्र्यांपासून ते पहिल्यांदाच सभागृहात आलेल्या तरुण आमदारापर्यंत
प्रत्येकजण त्यांचं बोलणं लक्षपूर्वक ऐकतो. ते आहेत, सोलापुरातल्या
सांगोल्याचे आमदार गणपतराव देशमुख. आबासाहेबांच्या राजकीय वाटचालीत गेल्या 55 वर्षांचा महाराष्ट्राचा
सामाजिक आणि राजकीय इतिहास सापडतो.
राज्यातील इतर राजकीय आणि
सहकार सम्राटांचा बडेजाव, त्यांचं वैभव, त्यांची खोटी आश्वासने एका बाजूला आणि आबासाहेबांचे साध राहणीमान, कोणताही बडेजाव नाही, सर्वसामान्य माणसामध्ये
मिसळून त्यांची तळमळीने विचारपूस करणारे असे सन्माननीय आबासाहेब एका बाजूला आहेत
म्हणूनच महाराष्ट्रातील तुमच्या माझ्या सारख्याच्या मनात आबासाहेबांची स्वच्छ
प्रतिमा मनात घर केल्याशिवाय राहत नाही. त्यांच्यावर तळं राखलं पण पाणी चाखल्याचे
आरोप कुणी करायला धजणार नाही. सध्या सर्वत्र भ्रष्टाचार बोकाळलाय. अशा काळात
आबासाहेबासारखासारखा बिनडागाचा नेता आपलं काम नेकीनं पुढे नेतोय. आज त्यांच्या
वाढदिवसानिमित त्यांच्या असामान्य कर्तुत्वास मनापासून सलाम... खरंतर
त्यांच्याविषयी किती जरी लिहिले, बोलले तरी मला मनातून ते कमीच वाटत आहे. शेवटी पुनश्च एकदा
त्यांच्या वाढदिवसानिमित कोटी कोटी मनस्वी अश्या शुभेच्छा... आमच्या सारख्या
आपल्या हितचिंतकाचे आयुष्य पाच दहा वर्ष कमी मिळावे आणि ते आपल्या सारख्या
ऋषितुल्य व्यक्तिमत्वास उदंड असं दीर्घायुष्य लाभावे हीच मनस्वी सदिच्छा आहे.
श्री. प्रतिक यमगर
आटपाडी, सांगली
७७०९९३५३७४
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा