आजच्या सरकारसमोर आमच्या शेतकरी बांधवाने कितीही आरडून ओरडून सांगितले तरी सरकार ऐकायला काय तयार नाही. राज्यातील सरकारला शेतकऱ्यांच्या प्रश्नापेक्षा उद्योगपतीच्या प्रश्नांची जास्त काळजी आहे. खरंतर आम्ही जी शेतकऱ्याची वस्तुस्थिती मांडण्याचा आणि ती सरकारपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न करतोय तो प्रामाणिक पणे करतोय... आम्हाला कोणत्या पक्षाची दलाली करायची नाही आहे. काही आमच्या (राजकीय पक्षाच्या) मित्रांना वाटते की आम्ही त्यांच्या पक्षाविरोधात टीकात्मक लेखन करतोय. खरंतर आम्ही सर्व शेतकऱ्यांच्या प्रश्नांचा अभ्यास करून समग्र मांडत असताना या कार्यकर्त्यांचा आमच्या लेखाकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा संकुचित स्वरूपाचाच आहे. परंतु अश्या आंधळ्या भक्तांना मला सांगायचे आहे की शेतकऱ्यांची वास्तविक परिस्थितीतील अवस्था मांडणे हे आमचे कर्तव्य आहे. ती काल मांडत होतो आज मांडतोय आणि उद्याही मांडू. मग राज्यात कोणत्याही पक्षाचे सरकार असो त्याने आमच्यावर काहीही फरक पडणार नाही. तीन वर्षांपूर्वी काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचे सरकार असतानाही आम्ही शेतकार्यासारख्या वंचित घटकांचे प्रश्न मांडलेले आहेत. त्यामुळे आंधळ्या भक्तांनी एक लक्षात ठेवले पाहिजे की आपण पहिले शेतकऱ्यांची मुले आहोत आणि मग नंतर कोणत्याही पक्षाचे कार्यकर्ते, नेते आहोत. त्यामुळे तुम्ही तुमच्या पक्षाची भूमिका अवश्य मांडा पण त्यांची वकिली आणि दलाली करण्याचा प्रयत्न करू नका . त्यामुळे या राज्यातील आम्ही शेतकऱ्यांची हजारो पोरं आज शेतकऱ्यांची वकिली आणि दलाली सोशल मीडियाच्या माध्यमातून करत आहोत. कोणाला आवडो आगर न आवडो पण आमची बांधीलकी ही शेतकऱ्यांशी आहे. कोणत्याही पक्षाशी आणि नेत्यांशी तर अजिबातच नाही. आमचे कोणत्याही राजकीय पक्षाशी मित्रत्व ही नाही आणि शत्रुत्व ही नाही. आमचा विरोध आहे तो फक्त राज्यातील सत्ताधाऱ्यांच्या शेतकऱ्यांविषयीच्या चुकीच्या धोरणाला.... आणि शेतकऱ्यांच्या कर्जमाफीकडे जाणीवपूर्वक होत असलेल्या दुर्लक्षाला...... त्यामूळे झोपेची सोंग घेतलेल्या या मस्तवाल सरकारला आम्ही आमच्या परीने जागे करण्याचा प्रयत्न करतोय .........
मला माहित नाही किती जणांना आम्ही निरपेक्ष भावनेने लिहिलेले अभ्यासात्मक सणसणीत आणि वस्तुनिष्ठ लेख आवडतात. परंतु सत्य आणि वस्तू स्थिती मांडलेली अनेकांना झोबंते. अर्थात म्हणतात ना नेत्यांना आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना सत्य हे नेहमी कटू वाटते .... काही निवडणुका मध्ये यश मिळाले म्हणून हवेत असलेल्या सत्ताधार्यांनीं शेतकऱ्यांवरील वास्तविक परिस्थितीचे भान ठेवावे आणि आत्महत्या रोखण्यासाठी कर्जमाफी सारखे निर्णय त्वरित घ्यावेत. जर या महाराष्ट्रातील शेतकऱ्याची कर्जमाफी केली नाही तर महाराष्ट्रातील शेतकरी नक्कीच उद्योग धार्जिनी सरकारला जमिनीवर आणेल यामध्ये माझ्या मनात तरी कोणतीच शंका नाही. आदरणीय मुख्यमंत्र्यांच्या कडून शेतकऱ्याची कर्जमाफी करण्यापेक्षा शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करू अशी दूरदृष्टी कोणाची भूमिका घेतली जात आहे. या भूमिकेचं अर्थात स्वागत आहे परंतु ज्याप्रमाणे एखाद्या रोगी व्यक्तीचा संपूर्ण रोग बरा होण्यासाठी तात्पुरत्या स्वरूपाच्या शस्त्रक्रिया कराव्या लागतात तेव्हाच संपूर्ण रोग भविष्यकाळात बरा होण्यास मदत होते त्याचप्रमाणे शेतकऱ्याची कर्जमुक्ती करत असतांना सरसकट कर्जमाफी न करता काही अटी आणि शर्तीच्या आधारे कर्जमाफी करणे अत्यंत गरजेचे आहे तरच शेतकरी हळू हळू कर्जमुक्त होण्यास मदत होईल. ....
राजकीय पक्ष हे नेहमीच स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी जातीच्या आणि धर्माच्या नावावर लोकांना फसवुन मतांची झोळी भरून घेतात आणि मग पाच वर्ष अश्या पद्धतीने जाणीवपूर्वक शेतकऱ्यांच्याकडे दुर्लक्ष करून भांडवलदारासाठी राज्य चालवायचे काम करतात . यामुळे आम्ही जागृत असले पाहिजे. आजपर्यंत सत्ता असताना ज्यांनी अनेक घोटाळे, भ्रष्टाचार करून स्वतःची घरे भरून घेतली तेच आज संघर्ष(कोणता???) यात्रा काढत आहेत. अर्थात यांचा दुट्टपीपणा महाराष्ट्र चांगलाच जाणून आहे त्यामुळे या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस विरोधकाकडे अजूनही आमचा शेतकरी गांभीर्याने आणि विश्वासार्हतेने पाहत नाही ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे गेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या मध्ये सत्ताधार्यांना यश मिळाले राज्यातील राज्यातील मतदारांनी दगडापेक्षा वीट मऊ मानली एवढाच काय तो फरक....
या सर्व अंदागोंदीमध्ये निवडणुकांच्या अगोदर भाषणातून प्रस्थापितांच्यावर सणसणीत टीका करणारे विस्थापितांचे कैवारी मात्र तोंड उघडायला तयार नाहीत.(आदरणीय खासदार राजू शेट्टी आणि आमदार बचू कडू यासारख्या काही नेत्यांचा अपवाद वगळता) ही आमच्या शेतकऱ्यांची सर्वात मोठी शोकांतिका आहे. अर्थात विस्थापितांचे प्रश्न मांडता मांडता तेच कधी प्रस्थापित झाले हेच आमच्या सारख्या विस्थापित कुटुंबातील मुलांच्या लक्षात आले नाही. त्यामुळे अजूनही वेळ गेलेली नाही. .......... आणि एक सर्वात महत्वाचे म्हणचे पाणी फाउंडेशन आणि नाम फाउंडेशन यांच्या माध्यमातून आणि लोकसहभागाने केलेल्या कामांचे श्रेय हे सत्ताधार्यांनी घेण्याचा प्रयत्न अजिबात करू नये.. गावकऱ्यांनी त्यांच्या कष्टाच्या आणि एकतेच्या जोरावर तसेच पाणी फाउंडेशन आणि नाम फाउंडेशन च्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण भागात चांगले काम केले आहे. ते सत्ताधार्यांनी त्यांनी तीन वर्षांच्या काळात शेतकऱ्यांचा विकास केला ते सांगू नये. ....
कालच महाराष्ट्र दिन मोठ्या उत्साहात राज्यभर आपण सर्वांनी साजरा केला. महाराष्ट्र दिनी या सत्त्ताधारी सरकारने आमच्या शेतकरी बांधवाला दीन करू नये हीच सदिच्छा.... त्यासाठी लवकरच कर्जमाफी जाहीर करावी ही आमच्या शेतकरी बांधवांच्या वतीने माफक अपेक्षा.......
.✍पोपट यमगर
बाळेवाडी, ता. आटपाडी
जि. सांगली
7709935374
popatgyamgar.blogspot.com

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा