महाराष्ट्रासह देशातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांविषयी संपूर्ण शरीरातील ताकदीने निस्वार्थीपणे लढणारा तमाम शेतकऱ्यांचा खऱ्या अर्थाने स्वाभिमानी असणारा स्वाभिमानी नेता खासदार आदरणीय राजू शेट्टी साहेबांचा गेल्या तीस वर्षातील संघर्षमय प्रवास आपल्या सर्वाना माहीतच आहे. *शिवार ते संसद* हे त्यांचे आत्मचरित्र प्रत्येक शेतकरी सुपुत्राने वाचावे असेच आहे. मी ही ते चरित्र वाचत असताना बेभान झालो . राजू शेट्टी या माणसावर स्वतःच्या सुख दुःखाची, घरादाराची परवा न करता तन, मन, धनासह इतका जीव ओवाळून टाकतात हे खरंतर फार कमी नेत्यांच्या वाट्याला येतं.
*30, 35 वर्षानंतरही त्यांचा लढाऊ बाणा, शेतकऱ्याविषयीची तळमळ कधीच कमी झालेली दिसून येत नाही.* आजच्या परिस्थितीत काही नेते सुरवातीला प्रस्थापिताविरुद्ध टीका करतात आणि पुन्हा त्याच प्रस्थापितांशी, सत्ताधाऱ्याशी तडजोड करून पाच दहा वर्षाच्या तत्वनिष्ठ राजकारणाला तिलांजली वाहतात. पण याला अपवाद म्हणजे आदरणीय राजू शेट्टी साहेब आणि आमदार बचु कडू साहेब... ही चळवळीतुन पुढे आलेली तुमच्या माझ्या सारख्या सर्वसामान्य बहुजन, वंचित कुटुंबातून पुढे आलेली नेतृत्व आहेत. त्यांची बांधीलकी ही नेहमी शेतकरी आणि वंचित घटक आणि विस्थापित समाज यांच्याशी असते. राजू शेट्टी साहेब काय आज राजकारण, समाजकारण करत नाहीत. गेली 30- 40 वर्ष राजकारण आणि समाजकारण करत आहेत. पंचायत समिती सदस्यापासून सुरू झालेला प्रवास आज देशाच्या संसदेचा सदस्य होण्यापर्यत मारलेली मजल नक्कीच प्रेरणादायी अशीच आहे.... त्यामुळे भाजपच्या नेत्यानी त्यांना संपवण्याचा प्रयत्नही करू नये तो उलट तुमच्यावरच उलटेल यामध्ये माझ्या मनात तरी शंका नाही. पाठीमागचे काँग्रेस, राष्ट्रवादीचे सरकार शेतकऱ्यांविषयी उदासीन धोरणे राबवत असल्यामुळे राजू शेट्टी साहेब यांनी बहुजनहृद्यसाम्राट गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या मध्यस्तीवरून शेतकऱ्यांच्या काही मागण्यासह भाजपच्या राष्ट्रीय लोकशाही आघाडी ला पाठिंबा दिला. त्यापैकी प्रमुख मागण्या म्हणजे *स्वामिनाथन आयोगाच्या शिफारसी केंद्र सरकारने स्वीकारव्यात(शेतमालास दीडपट हमी भाव) आणि शेतकऱ्याचा सात बारा कोरा करावा या होत्या. मोदीजींनी या मागण्या सत्ता आल्यानंतर पूर्ण करतो हे आश्वासन दिले होते. मोदी सरकारला तीन वर्ष पूर्ण झाली पण शेतकऱ्याची आश्वासने काय पूर्ण केली नाहीत. महाराष्ट्रात भाजपची सत्ता येण्यामध्ये राजू शेट्टींचा मोठा वाटा आहे सत्ताधार्यांना कधीच विसरून चालणार नाही. सत्ताधार्यांनी ही आश्वासने पूर्ण करण्याऐवजी शेतकर्याना शिव्या देऊन शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम सरकार करते आहे ही शेतकऱ्यांची सर्वात मोठी शोकांतिका आहे.
* शेतकऱ्यांची कर्जमुक्ती आणि स्वामिनाथन आयोगाच्या शिफारसी पूर्ण करण्यास सरकारने दुर्लक्ष केल्यामुळे आदरणीय राजू शेट्टी यांनी पुण्याच्या महात्मा फुले वाड्या पासून ते महाराष्ट्र राज्यपालांचे मुंबईतील निवास म्हणजेच राजभवन पर्यंत पायी आत्मक्लेश यात्रा काढण्याचा निर्णय घेतला . 22 मार्च पासून सुरू झालेली ही यात्रा आज अंतिम टप्यात आली आहे. राजू शेट्टी आणि त्यांच्यासोबत असलेल्या शेतकऱ्यांचा त्याग ह्या महाराष्ट्रातील निरडावलेल्या सरकारने राजकारण सत्ताकारण बाजूला ठेऊन खुल्या मनाने समजावून घेणे गरजेचे आहे. उसदरासाठी, स्वाभिमानीची आंदोलने कशी असतात हे महाराष्ट्रासह देशाला माहीत आहे. त्यामुळे स्वाभिमानी कार्यकर्ता आणि शेतकरी बांधव तळमळीने, त्यागाने मुंबईकडे चालला आहे म्हणजे तो शांत आणि अहिंसात्मक आहे असे सत्ताधार्यांनी समजू नये. त्यांच्या संतापाचा स्फोट झाल्यावरती मंत्रालयातील अनेक मंत्र्यांनाही घाम फुटेल. राजू शेट्टींच्या आत्मक्लेश यात्रेला माध्यमे सॉफ्ट कॉर्नर देत असल्याचे दिसून येते... ज्या दाखवतात त्या फक्त शेतकर्यांमध्ये फूट निर्माण व्हावी ह्याचपद्धतीने दाखवत आहेत. माध्यमांनी सत्ताधाऱ्यांची भटगिरी करण्यापेक्षा शेतकरी, वंचित सर्वसामान्य जनता यांच्यासारख्या वंचित घटकांच्य बाजूने ठामपणे उभे राहून सत्ताधार्यांना सडेतोड प्रश्न विचारले गेले पाहिजेत. त्यामुळे माध्यमे सुद्धा निपक्षपातीपणे व्यक्त होत नाहीत ही वस्तुस्थिती आहे .
आदरणीय राजू शेट्टींची स्वाभिमानी आत्मक्लेश यात्रा जस जशी मुंबईकडे पुढे वाटचाल करत राहील तस तसे सत्ताधाऱ्यांचे धाबे दणाणले जाणार आहेत. त्यामुळे ज्यां शेतकऱ्यांना शक्य आहे त्या सर्वांनी राहिलेल्या दोन तीन दिवसांमध्ये आत्मक्लेश पदयात्रेत सहभागी होऊन शेतकऱ्यांची ताकद या निर्दावलेल्या सरकारला दाखवून दिली गेली पाहिजे आणि आपण सर्व स्वाभिमानी शेतकरी एकजुटीने एकत्र येऊन आपली ताकद या मस्तवाल सरकारला दाखवून नक्की द्याल ही आशा आहे.
धन्यवाद...
✍पोपटराव यमगर
बाळेवाडी, ता. आटपाडी,
जि. - सांगली.
7709935374

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा