भारत आणि चीन च्या सीमारेषेवर सध्या दोन्ही देशाकडून सध्या सैनिकांची जमवाजमव चालू आहे. चीन हा जगात विस्तारवादी विचारांचा देश म्हणून जगात ओळखला जातो याचे कारण म्हणजे चीनच्या सभोवताली जे देश आहेत त्यातील जवळजवळ 13 देशाशी चीनचा सुरवातीपासून सीमेवर वादविवाद चालू आहे. यातून चीनची प्रतिमा ही जगभरामध्ये अतिक्रमण वादी देश अशी झाली आहे. चीनला दुसऱ्या देशातील एखादा भुभाग घ्यावयाचा असेल तर चीन सर्वप्रथम त्या भूभागाच्या जवळपास पायाभूत सुविधा विकसित करतो आणि तो भाग विकसित झाल्यानंतर त्यांचे सैनिक पाठीमागून पाठवले जाते. अशी या देशाची आतापर्यंतची रणनीती असल्याचे आपणास दिसून येईल . त्यामुळे दोन्ही देश स्वातंत्र्य झाल्यापासून LOC वरून दोन्ही देशांमध्ये वाद सुरू आहेत यावरूनच 1962 मध्ये दोन्ही देशांमध्ये युद्ध झाले होते. तिथून LOC या सीमारेषेच्या आतमध्ये चीनने रस्ते, वीज यासारख्या पायाभूत सुविधा चांगल्या प्रकारे विकसीत केल्या आहेत. मग लडाख असो, सिक्किम असो किंवा अरुणाचल प्रदेश असो या सर्व भागाच्या जवळ चीनने पायाभूत सुविधा विकसित केल्या गेल्या आहेत. आताही हा भुतानमधील डोकलाम या भागात चीनने रस्ता बांधणे चालू केले आहे याला भुतानासह भारताचा विरोध आहे. डोकलाम चा मुद्दा मुद्दामहून पेटवत ठेवायचा आणि सिक्कीम भाग बळकवायचा ही चीनची रणनीती दिसते आहे. त्यामुळे आपल्या देशानेही गाफील राहून चालणार नाही. देशाचे अर्थमंत्री आदरणीय अरुण जेटली यांनी 1962 सालचा भारत तसाच राहिलेला नाही असे म्हटले आहे. हे विधान त्रिवार सत्य आहे. पण जसा आपण भारताच्या बाबतीत विचार करतो आहे तसाच विचार आपण चीनच्या बाबतीत केला पाहिजे . 1962 सालचा चीन ही तसाच राहिलेला नसून खूप बदललेला आहे. चीन साम्यवादी आर्थिक धोरणावरून 1980 च्या नंतर उदारीकरणाकडे झुकला आहे. त्यांनी सर्वच क्षेत्रांच्या बाबतीत केलेली प्रगती हे ही आपण लक्षात घेतली पाहिजे.
चीन आणि भारत या आर्थिक विकासामध्ये वेगाने वाढणाऱ्या दोन्ही देशांनाही युद्ध होणे परवडणारे नाही या मताशी मीही सहमत आहे. तसेच या दोन्ही देशांमध्ये युद्ध होणार नाही या फक्त राजकीय चर्चा असतील असे मला ही वाटते परंतु म्हणून आपण 1962 सारखे गाफील राहून चालणार नाही. जर युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालीच तर आपणही त्या साठी सज्ज असले पाहिजे याचे नियोजन करणे गरजेचे आहे आणि ती आपल्या देशाकडून केली जात आहे.
✍🏻पोपट यमगर
आटपाडी सांगली
7709935374
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा