आदरणीय बाळासाहेब ठाकरे हे नाव जरी ऐकले तर मनात सर्वप्रथम प्रचंड आदर निर्माण होतो. राजकारणातील एक दमदार कडक स्वभावाचा नेता... ज्यांनी महाराष्ट्रातील मराठी माणसाला ताठ मानेन जगायला शिकवलं... ज्यांनी महाराष्ट्रातील मराठी माणसाला स्वतःच्या अन्यायाविरोधात लढायला शिकवलं... ज्यांचे नाव जरी ऐकले तरी अनेकांचे धाबे दणाणतात..... राजकारणात बिनधास्त बोलणारा माणुस.... विरोधकांच्यावर प्रहार करताना कोणाचीही भीड न बाळगणारा माणूस म्हणजे आदरणीय बाळासाहेब ठाकरे...
ज्यांच्यामुळे आज असंख्य मराठी पोरं नगरसेवक, आमदार, खासदार, मुख्यमंत्री झाली... हो त्यांच्यामुळेच आज मुंबई मध्ये मराठी माणूस ताठ मानेने राहू शकतो.. साठ सत्तरीच्या दशकात मराठी माणसांच्या लढ्यात बळ देणारा नेता , साथीदार.......
ज्या ज्या वेळी मराठी आणि हिंदू सामाजाच्या संस्कृतीवर घाला घालण्याचा प्रयत्न केला गेला तेव्हा सर्वप्रथम त्याविरोधात बाळासाहेबांचे सणसणीत प्रहार तिथे उमटले गेले........
बाळासाहेब एवढ्या जहरी भाषेत प्रहार करायचे की पुढच्या विरोधकाला काय बोलायचे हेच समजत नसे.... बाळासाहेबानी तो स्वाभिमान शेवटपर्यंत जपला... त्यामूळेच आज सर्वच पक्षाच्या सर्वच नेत्यांना आदरणीय बाळासाहेब यांच्याविषयी प्रचंड आदर आहे... आज बाळासाहेब आपल्यात नाहीत ही खंत आहे पण जरी नसले तरीही त्यांचे सणसणीत विचार, त्यांचा स्वाभिमान प्रत्येक मराठी माणसाच्या समवेत आहेत. आज दररोज सोशल मीडियामध्ये आम्ही स्वतःला व्यक्त करत असताना कोणाचीही भीती आणि तमा न बाळगता निर्भीड आणि निपक्षपातीपणे व्यक्त होतो याचे सर्वात महत्त्वाचे प्रथम कारण म्हणजे संविधानातील मूलभूत अधिकार तर दुसरे महत्वाचे कारण म्हणजे बाळासाहेबांनी चुकीच्या घटनांवर बिनधास्त व्यक्त व्हायला... प्रहार करायला शिकवलं, हो त्यांनीच आमच्या सारख्या सर्वसामान्य नवतरुणांना सांगितले 'सत्य बोलायला कोणाच्या बापाला ही घाबरायचे नाही.' अश्या शिकवलेल्या स्वाभिमानामुळेच आज असंख्य मराठी बांधव स्वतःला चांगल्या पद्धतीने व्यक्त करत आहेत... ही समग्र लोकशाहीच्या दृष्टीने आनंदाची गोष्ट आहे पुनश्च एकदा आदरणीय बाळासाहेबांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन.💐💐💐
✍🏻प्रतीक यमगर
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा