काल कमला मिल कंपाऊंड या अनधिकृत इमारतीत आग लागून झालेल्या दुर्घटनेमुळे अनधिकृत बांधकामाचा मुद्दा चर्चेत आला आहे. आदरणीय मुंढे साहेब नवी मुंबईचे आयुक्त असताना अनेक अनधिकृत बांधकामे कोणत्याही नेत्यांची भीडभाड न ठेवता जमीनदोस्त केली होती त्यावेळी सर्व राजकीय पक्षातील सर्व नगरसेवक आणि पदाधिकारी मुंढे साहेबांच्या अनधिकृत बांधकामाबाबतच्या मोहिमे विरोधात एकत्र आले होते. अगदी महापालिकेत ठराव ही पास केला होता. परंतु आदरणीय मुंढे साहेबांनी कोणत्याही राजकीय विरोधाला न डगमगता प्रामाणिक आणि कार्यक्षम पणे भ्रष्ट व्यवस्थेविरोधात काम हाती घेतले होते. अखेर राजकारणी, बिल्डर आणि अधिकारी या लॉबीने मुंढे साहेबांच्या सारख्या प्रामाणिक अधिकाऱ्याची बदली घडवून आणली...
फक्त सांगण्याचा मुद्दा इतकाच होता की आपण एखादी घटना घडल्यानंतर त्या गोष्टीकडे जास्त लक्ष देतो. मग पुन्हा त्या घटनेस जबाबदार असणाऱ्या ना काढून टाकले जाते. पण जीव जातो तो सर्वसामान्य माणसांचा..... गेलेले जीव काय कितीही कारवाई केली तर पुन्हा येऊ शकत नाहीत. एखादी दुर्घटना घडूच नये यासाठी आपण आपत्ती पूर्व व्यवस्थापन किती करतो... आणि आपत्तीपूर्व व्यवस्थापन करतो त्याला आपण किती साथ देतो?? हा खरा प्रश्न आहे.
त्या कमला मिल कंपाऊंड चे अगोदरच अनधिकृत बांधकाम होऊ दिले नसते तर आज इतक्या जनाचा जीव गेलाच नसता...
अनेक राजकीय नेते एखादी दुर्घटना घडली की जनतेची सहानुभूती मिळावी यासाठी त्या दुर्घटना स्थळाला भेट देतात,(अगदी त्या घटना स्थळाला स्पिकनिक स्पॉट चे स्वरूप आणतात) काही प्रमुख पदाधिकारी माध्यमांना भावनिक प्रतिक्रिया देतात परंतु आधीच जर अशा गैरव्यवहाराना साथ दिलीच नसती तर ती दुर्घटनाच घडली नसती... ही खरी वस्तस्थिती आहे...
बाळेवाडी, ता. - आटपाडी,
जि.- सांगली.
७७०९९३५३७४
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा