आज देशात अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर मोठ्या प्रमाणात चर्चा केली जात आहे. वर्तमानपत्रात, मिडीयावर, सभांच्यामध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्य विषयांवर अनेकवेळा बोलले जात आहे. तुमच्या माझ्या दररोजच्या जगण्याशी सबंधित असलेला विषय म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्य होय. अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे काय याचा कधी शोधही न घेता केवळ मुक्तपणा तोही सोयीस्कर उधळत बेधुंद होत आजूबाजूच्या कोणाचाही कशाचाही विचार न करता त्या जगण्याला आपण आपले अभिव्यक्ती स्वातंत्र्य समजत असतो. काहींना तर सैराट होण, कसही सैरभैर होऊन मोकाट सुटलेल्या घोड्यासारख उधळणं हेच अभिव्यक्ती स्वातंत्र्य वाटतं. कुटुंबाचा, समाजाचा, आजूबाजूच्या नागरिकांचा देशाचा कोणताही, कसलाही विचार न करता फक्त मी आणि मला वाटेल तसं वागणं, बोलणं याला अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणता येणार नाही हे अभिव्यक्ती स्वातंत्र्य नसून त्याच्या नावाखाली चालवला गेलेला स्वैराचार आहे.
मग आपल्या मनात हा प्रश्न उभा राहू शकतो तो म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे नेमके काय?? देशाचे सार्वभौमत्व, राष्ट्रीय एकात्मता, राष्ट्रीय सुरक्षा , सार्वजनिक कायदा आणि सभ्यता, नैतिकता यांपैकी एखाद्याही गोष्टीचा भंग न करता आपले मत योग्य त्या माध्यमातून (व्यंगचित्र, लेखन, वक्तृत्व, सभा संमेलने,) मांडणे म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्य होय. आपल्या राज्यघटनेतील कलम क्र. १९ मध्ये प्रत्येक भारतीय नागरिकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मुलभूत हक्क दिला आहे. योगायोग असा की, जागतिक मानव अधिकाराच्या घोषणापत्रात ही १९ व्या क्रमांकाच्या कलमात अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा उल्लेख आहे. तसेच कलम क्र. १९ च्या उपकलमामध्ये काही निर्बंध आणि बंधनाचा स्पष्ट उल्लेख केलेला आपल्याला दिसून येतो. याचाच अर्थ आपल्या सर्वाना अभिव्यक्ती स्वातंत्र्य घटनेने बहाल जरी केले गेले असले तरी ते अनियंत्रित आणि मुक्त नाही हे आपण लक्षात घेतले पाहिजे. आपल्या वर्तनामुळे अथवा आचरणामुळे इतरांच्या स्वातंत्र्याला अडथळा येत नाही ना?? हे पाहणे प्रत्येक सजग नागरिकाचे कर्तव्य आहे. एका सुशिक्षित, सुसंस्कृत समाजात वावरत असताना येथील त्या समाजाच्या श्रद्धावर टीका टिपण्या करणे, शिवीगाळ करणे हे वैयक्तिक स्वातंत्र्याच्या नावाखाली अतिरेक होत नाही का?? ज्यांना श्रद्धाचे पालन करावायचे नसेल तर त्यांनी अवश्य करू नये, त्यांना त्यांचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. परंतु आपणही पालन करावयाचे नाही आणि जे नियम पालन करतात त्यांच्यावर टीका करायच्या हे अभिव्यक्ती स्वातंत्र्य नाही तर इतरांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर केलेला हल्ला आहे.
सध्याच्या सोशल मिडियासारख्या गंगाजळात अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली सर्व मनांचा, मतांचा आणि भावनांचा बाजार मांडला गेला आहे. कोणत्याही वैचारिक विचारांचा, महापुरुषांचा सन्मान न ठेवता कोणीही कशाही अफवा पसरवण्याचे काम करताहेत... कोणाही विरुद्ध काहीही बरळले जात आहे. एखाद्या बातमीची सत्यता न पाहता ती बातमी पसरविली जात आहे त्यामुळे अनेक सामाजिक अशांततेचे प्रश्न निर्माण झाल्याचे आपणास सध्याच्या परिस्थितीवरून पहायला मिळते. आजकाल नियम न पाळणे म्हणजे भूषणावह, कोणीतरी व्हीआयपी असण्याचा परवाना अशाप्रकारची मानसिकता समाजात रुजत चालली आहे.
अभिव्यक्ती स्वातंत्र्य हा लोकशाही व्यवस्थेचा आत्मा आहे यामुळेच भारतात विविध वैचारिक मतप्रवाह, वेगवेगळ्या विचारधारा, यांच्यात वैचारिक खंडन मंडन चालू असते. लोकशाहीत प्रत्येक मनाला व्यक्त होण्याचा अधिकार आहे पण व्यक्त होत असताना सारासार विवेकनिष्ठ विचार करून व्यक्त होणं हे खूप महत्वाचे आहे. म्हणूनच मला वाटतं कि अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे तर अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे स्वयंशिस्त ...! ती स्वयंशिस्त जपत आपल्या आवडत्या क्षेत्रातील आपली निर्भीड आणि निपक्षपातीपणे मांडलेली गेलेली मते चांगल्या समाजासाठी अत्यंत आवश्यक आहेत... एवढेच नाहीतर ती स्वतच्या आणि राष्ट्राच्या प्रगतीसाठी गरजेची आहेत.
धन्यवाद...
श्री. प्रतिक यमगर
बाळेवाडी, ता. आटपाडी,
जि. सांगली.
७७०९९३५३७४
Popatgyamgar.blogspot.com
Pratikyamgar.wordpress.com

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा