सर्वोच्च न्यायालयाच्या MBBS, BDS पुढील वर्षाच्या प्रवेषासाठी नीट परीक्षेच्या सक्तीवरून महाराष्ट्रातील शैक्षणिक सामाजिक आणि राजकीय वातावरण ढवळून निघाले आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या नीट परीक्षेच्या सक्तीविरोधात जवळ जवळ सगळेच राज्यकर्ते विद्यार्थ्याच्या हितासाठी (???????) मैदानात उतरले आहेत. लोकसत्ताच्या १५ मे च्या वर्तमान पत्रामध्ये लोकसत्ताच्या जेष्ठ पत्रकार रेश्मा शिवडेकर यांची 'नीट मुळे शिक्षण सम्राटांचे अर्थकारण कोलमडले' हि बातमी वाचल्यानंतर आपल्या राज्यकर्त्यांना विद्यार्थ्यांचे नेमके कोणते हित जोपासायचे आहे हे लक्षात येईल. MBBS, BDS पुढील वर्षाच्या प्रवेषासाठी काही आर्थिक संपन्न असलेल्या विद्यार्थ्यांनी काही शिक्षण सम्राटांच्याकडे आर्थिक लॉबिंग कसे लावले आहे हे हि या बातमीत चांगल्या पद्धतीने स्पष्ट केले आहे. आज शिक्षणासारख्या ज्ञान देणाऱ्या पवित्र क्षेत्रात लाखो रुपये घेऊन जशा बाजारात वस्तू विकल्या जातात तशा विद्यापीठात, महाविद्यालयामध्ये पदव्या विकल्या जात आहेत. त्यामुळे प्रामाणिक असणारे गरीब विद्यार्थी हुशार असुनही त्यांना योग्य संधी किंवा योग्य स्थान मिळत नाही. MBBS, BDS हे वैद्यकीय कोर्स झाल्यानंतर होणारा डॉक्टर हा तज्ञच असला पाहिजे तसेच हुशार असूनही येथील शिक्षणव्यवस्थेतील शिक्षणसम्राटांच्या वर्चस्वामुळे गोरगरीब आणि सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थी वैद्यकीय शिक्षण घेऊ शकत नाहीत. आम्ही तज्ञ आणि गुणवंत डॉक्टर घडविण्याऐवजी वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी घातलेले पैसे पुन्हा उकळणारे डॉक्टरच तयार करत आहोत कि काय?? असा प्रश्न माझ्या विचारी मनाला पडल्याशिवाय राहत नाही.
केंद्रीय पातळीवर वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी नीट हि परीक्षा घेतली जात होती. पण गेली काही दिवस सध्या ती परीक्षा बंद होती पण सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे पुन्हा त्या चालू होणार आहेत. नीटसाठी ११ वी आणि बारावी NCERT अभ्यासक्रमावर आधारित हि परीक्षा घेतली जाते. महाराष्ट्रातील CET हि परीक्षा राज्य शिक्षण मंडळाच्या १२ वी च्या अभ्यासक्रमावर आधारित घेतली जाते. सध्या नीट या परीक्षेसाठी अभ्यास साहित्य उपलब्ध नाही हि वास्तविक परिस्थिती आहे. ते अभ्यास साहित्य उपलब्ध करून देण्याएवजी आपले महाराष्ट्र सरकार नीट परीक्षा सक्ती रद्द करण्यासाठी केंद्राच्या मदतीने अध्यादेश आणण्याच्या तयारीत आहे. कदाचित तो अध्यादेश येण्याची दाट शक्यता मला वाटते आहे. तो अध्यादेश येउन नीट परीक्षा बंद होतात कि नाही ??? विद्यार्थ्यांचे ( शिक्षण सम्राटांचे) हीत जोपासले जाते कि नाही???? हे पाहणे आपणासाठी ओत्सुक्याचे ठरेल.
✍✍✍✍पोपट यमगर
आटपाडी, सांगली
popatgyamgar.blogspot.com

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा