एकदा सुर्यास्ताच्या वेळेला सुर्याने सर्व
दिव्यांची सभा बोलावली, आणि विचारले की, "मी तर अस्ताला चाललो, उद्या उगवून
येईपर्यंत जगाला प्रकाश देण्याचे काम कोण करेल??" सगळ्या दिव्यांची छाती
दडपली, हा साक्षात सुर्यनारायण त्याची एवढी ताकद आणि हा म्हणतो माझ्या
अनुपस्थितीमधे जगाला प्रकाश देण्याचे काम कोण करेल?? सगळे गप्प बसले. एक
छोटी टिमटिमती पणती होती. ती घाबरत घाबरत पुढे सरकली. सुर्याला वंदन करुन
म्हणाली, "सुर्यनारायणा जगाला प्रकाश देण्याचे मला माहित नाही, माझ्यापरीने
जळत राहण्याचं काम मी करीन." यावर सुर्य म्हणाला,"अस्ताला जायला मी मोकळा
झालो."
वरील गुरुदेव टागोर यांच्या एका अप्रतिम कवितेचा पु.ल. नी मराठीत
भाषांतर केलेला सारांश… या कवितेच्या सारांशमधुन जितके आपण चिंतन करू तितकं
कमी आहे, उलट यामधून मिळणारा अर्थ उत्रोत्तर वाढतच जाईल यामध्ये माझ्या
मनामध्ये तरी कोणतीच शंका नाही. आपण दररोज एकतो, पाहतो, वाचतो कि सध्याच्या
वर्तमान युगामध्ये सगळीकडे अंधाधुंदी चालू आहे. माझे जवळचे अनेक मित्र मी
लिहित असलेल्या छोट्या छोट्या लेखावर प्रतिक्रिया देताना म्हणतात कि
तुझ्या या लेखनामुळे समाजावर काय फरक पडणार आहे. यामुळे माझ्या मनामध्येही
नकारात्मक विचार येतात पण वरील सरांशमधील पणतीने दिलेल्या उत्तरातून खूप
काही शिकण्यासारखे आहे असे मला वाटते. आम्ही म्हणतो हे सर्व बदलेल
केव्हा???? तेव्हा सगळे बदलेल केव्हा हे मला माहित नाही, माझ्या परीने
त्या छोट्यास्या पणतीप्रमाणे जळत राहण्याचे कार्य मी करेन असं जेव्हा आपण
म्हणायला लागू तेव्हा नक्कीच परिवर्तन झाल्याचे आपल्याला पाहायला मिळेल…
धन्यवाद……
(✍✍✍✍✍✍ मनाच्या गाभार्यातून .................. )
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा