केंद्रामधील NDA (भाजपच्या) सरकारला आज दोन वर्षे पूर्ण होत आहेत. सकाळी वर्तमानपत्र उघडल्या उघडल्या केंद्र सरकारच्या मागील दोन वर्षामध्ये केलेल्या कामाच्या जाहिराती(अर्थात मोदिजींच्या खूप मोठ्या छबीसह… माझा देश बदलतो आहे.... पुढे जातो आहे ) पहिल्या पानावरतीच आलेल्या पाहिल्या. त्या पाहत असतानाच थोडेसे पाठीमागील दोन वर्षाच्या काळात डोकाऊन पाहिले…२०१४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये मतदारांनी भाजपला मोठ्या अपेक्षेने दिल्लीच्या सत्तेच्या सिंहासनावर बसवले होते. मागील 10 वर्षातील काॅग्रेसचा नाकर्तेपणा, प्रचंड भ्रष्टाचार , घोटाळे तसेच त्यांच्या विरोधातील सामाजिक कार्यकर्त्यांची आंदोलने यामुळे काॅग्रेस च्या विरोधात जनमाणसामधे निर्माण झालेली प्रचंड चीड ही लोकसभेला भाजपला निवडुन देण्याची महत्वाची कारणे होती. तसेच गुजरातचे विकासाचे माॅडेल पाहुन असेल किवा नरेंद्र मोदीजी यांच्या सक्षम नेतृत्वाकडे पाहून जनतेने भाजपला मतदान केले होते. समाजातील सर्व घटकांच्या ज्या काही अपेक्षा होत्या त्या पूर्ण झाल्या आहेत असे सध्या तरी म्हणता येणार नाही. अर्थात सर्वच अपेक्षा दोन वर्षाच्या काळात कोणतच सरकार पूर्ण करू शकणार नाही हे हेही त्रिवार सत्य आहे. सकारात्मक दुर्ष्टीकोनातून पहिले तर त्या अपेक्षा काही प्रमाणात तरी सरकारने पूर्ण केल्याही आहेत असं म्हणायला काही हरकत नसावी असे मला वाटते.
पंतप्रधान नरेंद्र मोदिजी यांच्या नेत्तृत्वाखाली केंद्र सरकारने अनेक महत्वाच्या योजना जाहीर केल्या आहेत. या योजनामध्ये उद्योग आणि औद्योगिक क्षेत्रातील गुंतवणूकवाढीसाठी 'मेक इन इंडिया', 'स्टार्ट अप इंडिया, स्टन्ड अप इंडिया' 'डिजीटल इंडिया' , तरुणांमध्ये कौशल्य निर्मितीसाठी 'स्कील इंडिया', शहरांच्या नवनिर्माणासाठी 'स्मार्ट सिटी, स्वच्छतेसाठी 'स्वच्छ भारत', शेतकर्यासाठी 'प्रधानमंत्री जन धन योजना' मुलीसाठी 'बेटी बचावो बेटी पढाओ' आणि 'सुकन्या समृद्धी योजना' गरिबांसाठी 'अटल पेन्शन योजना','प्रधानमंत्री जीवन ज्योती योजना' यासह सर्व क्षेत्रातील अनेक योजनांचा समावेश होतो. या योजना फक्त कागदावर न राहता प्रत्यक्षात त्याचा लाभ लाभार्थ्यापर्यंत पोहचला पाहिजे. आपल्याकडे अनेक योजना खूप चांगल्या असतात पण त्या योग्य अंमलबजावणी अभावी तशाच पडून राहतात किवा त्याची माहिती सर्वसामान्य गोरगरीब लाभार्थ्यापर्यंत पोहचत नाही. सरकार ज्या योजना आखतम त्यातील बर्याच योजना ज्यांच्या साठी आखत असते त्यांनाच त्या योजनाची माहिती मिळत नाही हि वस्तू स्थिती आहे. अर्थात अलीकडील काळामध्ये माध्यमातील वाढत्या जाहिरातीमधून हि माहिती गावातील घराघरामध्ये पोहचते हि एक सकारात्मक बाब आहे.
देशाचा आर्थिक विकासाचा दर GDP ७.५% आहे. म्हणजेच जगातील अर्थव्यवस्थेचा विचार करता भारताची अर्थव्यवस्था वेगाने बदलत पुढे जात आहे. गेल्या दोन वर्षातील मोदिजींच्या परराष्ट्रीय धोरणामुळे नक्कीच भारताची आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रतिमा चांगली होत असल्याचे आपल्याला दिसून येईल…
भारतातील सर्व काही समस्या संपल्या असेही म्हणता येणार नाही. समस्या अडचणी ह्या आहेतच. देशासमोर दुष्काळ, दहशतवाद, भ्रष्टाचार, अत्याचार, बेरोजगारी, वाढती लोकसंख्या, दारिद्र्य, जातीयवाद यासारख्या समस्या आ वासून उभ्या आहेत. यावरती सकारात्मक तोडगा काढण्याचे काम केंद्रात बसलेले सरकार करत आहे.
✍✍✍✍✍✍पोपट यमगर

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा