मुंबई- पुणे द्रुतगती महामार्गावर रविवारी
पहाटे झालेल्या ताज्या अपघातात १८ जणांचे प्राण गेले. आतापर्यंतच्या अनेक
अपघातांप्रमाणे हा अपघातही भरधाव आणि काळजाला धडकी भरवणारा असाच होता.
आजकाल इतके चांगले रस्ते तयार झाले असूनही मानवी चुकामुळे अपघातांचे प्रमाण
खूप मोठ्या प्रमाणात वाढले आहे. त्याच अपघाताताबद्दल व्यवस्थेवर तसेच
वाहतुकीचे नियम न पाळणार्या नागरिकांच्यावर आजच्या लोकसत्ताच्या अग्रलेखात
सणसणीत प्रहार केले आहेत वेळ मिळाल्यास आपण हा अग्रलेख आवर्जुन वाचावा
असाच आहे.(खरेतर लोकसत्ताचे सर्वच अग्रलेख योग्य जागेवर मार्मिक बोट ठेऊन
केलेले सणसणीत आणि झणझणीत प्रहर असतात. मला तर खूप आवडतात.) आजच्या
अग्रलेखातील शेवटचा परिच्छेद आपल्या वाचनासाठी मी मुद्दामहुन देत आहे.
"वास्तविक इतकी सरकारी अनास्था ज्या समाजात असते तो आपल्या हिताविषयी अधिक
सजग हवा. परंतु येथील परिस्थिती बरोबर उलट. सरकार ढिम्म आणि नागरिक
स्वत:च्याच मस्तीत. त्यात नियम पाळणे म्हणजे कमीपणा असे मानणारा एक मोठा
वर्ग. हाती पैसा आहे म्हणून सर्व काही घ्यावयाचे, पण ते वापरावे कसे याचे
ज्ञान शून्य. उत्तम फोन आहेत, पण ते वापरण्याची संस्कृती नाही. मोटारी
आहेत, पण त्या कशा वापराव्यात हे यांना माहीत नाही आणि जाणून घ्यायची
इच्छाही नाही. अशा परिस्थितीत रविवारसारखे अपघात हे नवीन नाहीत आणि ते
जुनेही होणारे नाहीत. समाजच्या समाज जर इतका अज्ञानी आणि असंस्कृत असेल आणि
त्यास तितक्याच बेजबाबदार व्यवस्थेची साथ असेल तर हे असेच होत राहणार
आणि रस्त्यांवरची ही अशी (अपघात) कार्ये रोखायला ‘श्री’ देखील असमर्थच असणार".
धन्यवाद……
✍✍✍✍ पोपट यमगर
(संदर्भ :- लोकसत्ता वर्तमानपत्र…)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा