आज प्रेम दिवस जगभरामध्ये साजरा करण्यात येत आहे. त्या प्रेमदिवसाच्या आपणा सर्वांना अगदी मनापासून प्रेमळ शुभेच्छा...
कवी मंगेश पाडगावकर एका सुंदर अश्या कवितेतून आपल्याला सांगतात की,
"या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे" दररोज चे जीवन जगत असताना मानवतेच्या नात्याने सर्वांशी प्रेमानं वागणे आणि बोलणे गरजेचे आहे. आपले साने गुरुजी हि सांगून गेलेत कि "खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे" एखादी व्यक्ती रागावली असल्यास प्रेमाने चार शब्द बोलल्यास त्याच्याही मनातील कटुता दूर होऊन जाते. म्हणूनच म्हणतात ना प्रेमाने जग जिंकता येते. प्रेम म्हटले की आपुलकी, माया, जिव्हाळा असे बरेच काही असताना आज काही जणांनी मात्र हल्ली प्रेमाचा अर्थ फारच संकुचित करून ठेवला आहे. फक्त प्रियकर आणि प्रेयसी यांच्यामधीलच प्रेम आपल्या सर्वांना दिसते. तेही प्रेम असतेच, नक्कीच असले पाहिजे यामध्ये माझ्या मनात तर नक्कीच दुमत नाही पण त्याच्या पलीकडेही जाऊन प्रेम नावाची संकल्पना समग्र बुद्धीने आम्ही कधी समजावून घेणार कि नाही?? ती समजावून घेणे गरजेचे आहे. आजच्या युगामध्ये समोर दिसणाऱ्या घटना पहिल्या कि प्रेम म्हणजे फक्त शारीरिक आकर्षण अशीच व्याख्या आजच्या मजनू आणि लैला यांनी करून ठेवली आहे. यासाठी कोणतेही समाजभान, संस्कृतीभान न ठेवता गार्डन्स किंवा सार्वजनिक ठिकाणी चालणारे प्रकार तुमच्या माझ्या देशात लोकसंख्येने सर्वाधिक असलेल्या तरुण पिढीला (अर्थात देशाचा कणा) नक्कीच विचार करावयास लावणारेच आहेत. आज देशात लव्ह जिहाद (अनेक मुलींना प्रेमाच्या नावाने फसवून धर्मांतर करावयास लावणे) सारखीही प्रकरणे मोठ्या प्रमाणात घडत आहेत. ती फक्त घडतच नाहीत तर दररोज वाढत आहेत हे आपल्या सारख्या छत्रपतीच्या राज्यात राहणार्या मावळ्यांनी समजावून घेतले पाहिजे. शारीरिक आकर्षण आणि उपभोगासाठी केलेले प्रेम हे खरे प्रेम नसते तर ते ढोंगी प्रेम स्वतःच्या स्वार्थासाठी तात्पुरत्या कार्यकाळासाठी केलेले असते. एखाद्या आपल्याला आवडणाऱ्या व्यक्तीवर, वस्तुवर, देशावर, निसर्गावर, ह्रद्यापासुन मनातुन निस्वार्थी भावनेने केलेले प्रेम हे खरे प्रेम असते. अशा निस्वार्थी भावनेने प्रेम हि संकल्पना जपणाऱ्या तुम्हा सर्व मित्रांना माझ्या पुन्हा एकदा प्रेम दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा...
धन्यवाद...
✍पोपटराव यमगर
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा