महाराष्ट्र राज्याच्या भूपटलावर आटपाडी तालुका म्हटले की आम्हाला आमच्या डोळ्यासमोर एक चित्र उभे राहते ते म्हणजे पिढ्यानपिढ्या दुष्काळ ग्रस्त असलेला तालुका... शेकडो एकर जमीन असतानाही पिण्याच्या पाण्यासाठी आणि पोटाची खळगी भागविण्यासाठी रानोवनी भटकणारे मेंढपाळ बांधव आणि सांगली जिल्ह्याच्या सदन भागात ऊसतोड करणारे मजूर यांचा हा तालुका... याच पिढ्यानपिढ्याच्या दुष्काळामुळे स्वतःच्या उदरनिर्वाहासाठी तालुक्यातील बहुसंख्य युवक हे पुणे, मुंबई , दिल्ली यासारख्या मोठ्या शहरामध्ये जाऊन सोन्या चांदीसारख्या गलाई व्यवसायामध्ये काम करत आहेत. अनेक अश्या युवकांनी या व्यवसायामध्ये स्वतःची अशी एक छाप पाडली आहे. यामधीलच एक व्यक्तीमत्व म्हणजे आदरणीय तानाजी शेठ यमगर... आटपाडी तालुक्यातील बाळेवाडी सारख्या छोट्याश्या खेडेगावामध्ये एका तुमच्या माझ्या सारख्या सर्वसामान्य कुटुंबातुन संघर्षाचे घाव झेलत, परिवर्तन वादी विचारांची बीजे पेरत पुढे वाटचाल केली आहे, करत आहेत. स्वतःच्या व्यवसायामध्ये कर्तबगारी आणि चातुर्याने त्यांनी चांगला जम बसवला आहे. तो जम बसवत असतानाच गावातील आणि तालुक्यातील अनेक तरुणांनाही सोने चांदी किंवा इतर व्यवसायामध्ये त्यांच्या पायावर उभे करण्यात शेठचा वाटा महत्वाचा आहे. बेरोजगारी सारखा राष्ट्रीय प्रश्न असतानाही ते रडगाणे न गाता आपल्या कर्तृत्वाच्या माध्यमातून तालुक्यातील अनेक तरुण मुले शेठच्या मार्गदर्शनाखाली स्वतःच्या व्यवसायामध्ये उत्तम प्रगती करत असताना आपल्याला दिसून येत आहेत. व्यावसायिक क्षेत्रात उत्तम प्रगती करत असताना आपण आपल्या गावातील, तालुक्यातील समाजालाही आपल्या सोबत पुढे घेऊन गेले पाहिजे, आणले पाहिजे या समाज हिताच्या विचाराने प्रेरीत होऊन शेठनी समाजकारणासाठी तालुक्याच्या राजकारणात उतरण्याचा निर्णय घेतला. खरंतर सात वर्षांपूर्वी तालुक्याच्या राजकारणात, सत्ताकारणात आम्हीच असले पाहिजे अश्या विचारांचे तसेच राजकारणाला धंदा मानून 'सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता ' अशासाठी वापर करणारे प्रबळ आणि धनाढ्य विरोधक समोर होते. त्यामुळे त्यांचा राजकीय प्रवास किती काटेरी वाटेवरून झाला आहे हे आपल्या लक्षात येईलच. त्यावेळेस सांगली जिल्ह्याच्या राजकारणात स्वतःचे एक वेगळं वलय निर्माण केलेले आणि आपल्या वक्तृत्व शैलीच्या आधारावर मोठ मोठ्या प्रस्थपिताना विचारातून घायाळ करणारे आदरणीय गोपीचंद पडळकर साहेबांच्या नेतृत्वाखाली एकनिष्ठ राहून राजकारण आणि समाजकारण करण्याचा निर्णय तानाजी शेठनी घेतला. पडळकर साहेबांनीं तालुक्यासह जिल्ह्यात केलेल्या विविध आंदोलनात , मोर्चात, रास्ता रोको मध्ये आदरणीय शेठचा सक्रिय सहभाग होता. हे सर्व करत असतानाच 2012 मध्ये जिल्हा परिषद आणिआटपाडी तालुक्याच्या राजकारणातील एक प्रामाणिक आणि कार्यक्षम नेतृत्व : मा. तानाजी शेठ यमगर पंचायत समिती च्या निवडणुका तालुक्यामध्ये पडळकर साहेबांच्या नेतृत्वाखाली मोठ्या ताकदीने लढवल्या गेल्या . त्यामध्ये अनेक उमेदवारांनी तालुक्यातून दुसऱ्या क्रमांकाची मते घेतली होती. घरनिकी पंचायत समिती गटातून तानाजी शेठ यमगर विजयी मिळवीत आटपाडी पंचायत समिती मध्ये एकमेव विरोधी गटाचे सदस्य म्हणून प्रवेश केला होता. तालुक्यात मागील पाच वर्षांच्या कार्यकाळात झालेल्या अनेक पंचायत समितीच्या सभांमध्ये तानाजी शेठनी विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी सक्षमपणे पार पाडली. तालुक्यातील वर्षानुवर्षाचा प्रश्न म्हणजे पाणी आणि चांगले रस्ते... या दोन्हीही प्रश्नावर कोणतीही न तडजोड करता ते सोडविण्यासाठी पडळकरसाहेबांच्या मार्गदर्शनाने अगदी जिल्हाधिकारी ते विविध खात्याचे मंत्री, मुख्यमंत्र्यापर्यत पाठपुरावा केला.
पंचायत समितीमध्ये फक्त एका घरनिकी गटाचे पंचायत समिती सदस्य असूनही संपूर्ण आटपाडी तालुक्यातील सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांचा पाठपुरावा पंचायत समिती च्या सर्व सभांमध्ये केला. बाळेवाडी बनपुरीसह अनेक गावातील पिढ्यानपिढ्या असलेला पाण्याचा प्रश्न मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून सोडवण्यात यश मिळवले आहे. घरनिकी पंचायत समिती गटातील झरे, पारेकरवाडी, विभूतवाडी, पिंपरी, घरनिकी, घानंद, कामथ येथे रस्ते, सभामंडप यासह अनेक छोटी मोठी कामे शेठनी त्यांच्या पाच वर्षांच्या कार्यकाळात केली आहेत. केंद्र आणि राज्य सरकारच्या शेतकऱ्यासंबधीच्या, गोरगरीब जनतेच्या कल्याणासंबधीच्या विविध योजनाची माहिती शेठनी वेळोवेळी विविध माध्यमातून देण्याचा प्रयत्न केला आहे. पंचायत समिती मध्ये शेतकरी बांधवांसाठी येणाऱ्या वस्तू या गरजू पर्यंत कश्या पोहचतील यासाठी त्यांनी नेहमीच प्रयत्न केल्याचे आपणास दिसून येतात. तालुक्यातील विरोधकांचीही कामे कोणताही मतभेद मनात न ठेवता मार्गी लावली आहेत. एखाद्या जिल्हा परिषद सदस्याला हि पाच वर्षाच्या कार्यकाळात जितकी कामे झाली नसतील त्याच्यापेक्षाही किंबहुना जास्तच कामे तानाजी शेठ नि मार्गी लावली आहेत. तालुक्यातील गुणवंत आणि यशवंत मुलांच्या नेहमीच पाठीशी राहत त्यांना त्यांच्या भविष्यातील प्रगती साठी कायमच साथ आणि प्रोत्साहन दिले आहे.
राजकारण म्हणजे भ्रष्टाचार , 'पैशातून सत्ता आणि सत्तेतून पैसा' कमावण्याचा उद्योग, अनेक नेत्यांची पोकळ आश्वासने अशी सर्वसामान्य लोकांच्या मनातील राजकारण्याविषयीची भावना झाली आहे परंतु मला ठामपणे सांगायला आवडेल ते म्हणजे या सर्वाना अपवाद व कोणत्याही वाद विवादात न पडता सर्वांशी मिळून मिसळून सर्वांशी आदराचे असे संबंध निर्माण करणारे, आटपाडी तालुक्याच्या राजकारणातील एक स्वच्छ, प्रामाणिक आणि कार्यक्षम नेतृत्व म्हटले की मा. तानाजी शेठ यमगर यांचे नाव नक्कीच सर्वांच्या मनामध्ये येईल यामध्ये मनात तरी कोणतीच शंका नाही. इतर मुरब्बी राजकारण्यासारखे डावपेच आखून फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी राजकारण न करता सर्व समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वाना सोबत पुढे घेऊन जाण्याच्या विचारातून ते काम करत आहेत. स्वतःच्या कुटुंबाकडे प्रसंगी स्वतःच्या उद्योगाकडेही कमी वेळ देत सर्वसामान्यांच्या प्रगतीसाठी स्वतःला संपूर्णपणे झोकून देऊन समाजकारणातून राजकारण करत आहेत. अनेकजण म्हणतात की राजकारण हे प्रामाणिक माणसाचे क्षेत्र नाही आहे, पण मला त्यांना सांगायला आवडेल ते म्हणजे प्रामाणिकपणाने आणि तत्वनिष्ठेने केलेलं राजकारण हे प्रदीर्घ कालावधी पर्यंत टिकते. तात्पुरत्या क्षणिक स्वार्थासाठी केलेलं मुरब्बी राजकारण हे जास्त काळ टिकू शकत नाही, हे आपण सद्य परिस्थितील राजकीय निकालावरून पाहत आहोत.
तालुक्यामध्ये सन्माननिय पडळकर साहेबांच्या काटेरी वाटेवरील संघर्षाच्या प्रवासामध्ये त्यांच्यासोबत वाटचाल करण्यात आणि समर्थपणे साथ देण्यात आदरणीय तानाजी शेठचा सहभाग हा महत्वपूर्ण होता. पडळकर साहेबांनीही तानाजी शेठना कायमच आदरात्मक संबोधले आहे. तानाजी शेठनी नेहमीच तालुक्यातील कार्यक्रमांना पडळकर साहेबांच्या साथीने उपस्थित राहत तळागाळातील जनमाणसापर्यंत आपला जनसंपर्क वाढवला. करगणी जिल्हा परिषद गटातील सर्वसामान्य जनतेला वाटत होते कि तानाजी शेठनी जिल्हा परिषद निवडणूक लढवावी परंतु जिल्हा परिषद गटात पडलेलं महिला आरक्षण आणि त्यांचे सन्माननीय मित्र हरिशेठ गायकवाड यांच्या सोबत असलेला दिलदार मैत्रीचा वसा पेलण्यासाठी एक पाऊल मागे घेऊन जिल्हा परिषद गटातून सौ. वंदना गायकवाड यांना मोठ्या मनाने संधी दिली आणि त्यांनी करगणी पंचायत समिती गटातून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला. भाजपने आणि पडळकर साहेबानी त्यांच्या आजवरच्या प्रामाणिकपणाच्या राजकारणाला साथ देत पक्षाचे तिकीट दिले. त्यांच्या समोरील विरोधक उमेदवार हा तालुक्याच्या राजकारणातील मुरब्बी आणि 60 वर्षाहून जास्त राजकीय अनुभव असलेले आण्णासाहेब पत्की होते. तरीही शेठनी पाच वर्षातील विकासकामाच्या आणि प्रामाणिक राजकारणाच्या जोरावर निवडणूक लढवून ती यशस्वीपणे जिंकली यांचा आनंद तुमच्या माझ्या सह तालुक्यातील सर्वसामान्य जनतेच्या मनात निकालादिवशी दिसून येत होता.
सध्या तालुक्याच्या पंचायत समिती आणि जिल्ह्याच्या जिल्हा परिषदेमध्ये भाजपची सत्ता आली आहे. अश्या रीतीने तालुक्यापासून ते केंद्रापर्यंत भाजप सत्तेत आहे, त्यामुळे खऱ्या अर्थाने आता तालुक्यात विकासपर्वाची सुरवात होत आहे असे म्हटले तरी काय वावगे ठरणार नाही.
'Let us grow together' अशी राजकीय भूमिका मनात ठेवून वाटचाल करणाऱ्या आदरणीय तानाजी शेठना तालुक्याच्या विकास कार्यासाठी आणि राजकारणातील पुढील प्रगती साठी माझ्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा...💐
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा