राज्यात काल झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका निकालामध्ये राज्यात भारतीय जनता पार्टीने प्रचंड आणि घवघवीत यश संपादन केल्याबद्दल मनपूर्वक अभिनंदन आणि महाराष्ट्राच्या उज्वल विकासपर्वासाठी आपल्या वाटचालीस खूप साऱ्या शुभेच्छा...
कालच्या विजयावरून करगणी गटासह आटपाडी, सांगली आणि राज्यातील अनेक भागामध्ये सर्वसामान्य नागरिकांच्या एका मतांची ताकद काय असू शकते हे लोकशाहीमध्ये दिसून आले. लोकशाही संपन्न असलेल्या आपल्या देशात एखादा उमेदवार विजयी करायचा कि पराभूत याचं सर्वस्व अर्थात सार्वभौमत्व जनता आहे, हे कालच्या विजयावरून स्पष्टपणे दिसून येते. यावेळेस राज्यातील मतदानाची टक्केवारी दिवसेंदिवस वाढत आहे याचा नक्कीच सकारात्मक परिणाम आपल्याला पाहायला मिळतोय. राज्याच्या राजकारणात सांगली जिल्हा हा काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानला जायचा पण याच बाल्लेकिल्ल्यात कधीही न उमळणारे कमळ मात्र या निवडणुकीत जबरदस्त उमलले. आटपाडी तालुक्यावर हि राज्याचे युवा नेते गोपीचंद पडळकर आणि माजी आमदार राजेंद्र अण्णा देशमुख यांच्यातील एकीने तालुक्यावर प्रथमच भाजपची सत्ता पाहायला मिळाली. पुढील काळात तालुक्यांत खूप काही सकारात्मक होण्याच्या दृष्टीने हा विजय भाजप साठी खूप महत्त्वाचा आहे.
राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस यांचा झंझावाती दौरा , प्रचार सभा, आणि त्यांचा प्रामाणिक, पारदर्शक चेहरा हे भाजपच्या विजयाचे कारण आहे. तसेच देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रभाई मोदींजी यांचेही भ्रष्टाचार विरोधी नोटबंदी ची मोहीम, देशातील पारदर्शकपणे चालू असलेला कारभार, देशाची जगामध्ये उंचावलेली प्रतिमा, यासह भाजप पक्षाची वाढ कशी होईल यासाठी वरिष्ठ पातळीवर चालू असलेले प्रयत्न या विजयास कारणीभूत आहेत असे मला वाटते. सद्य परिस्थितीत तालुक्यात भाजप , जिल्ह्यात भाजप, राज्यात भाजप आणि देशातही भाजप सत्तेत आहे त्यामुळे आता खऱ्या अर्थाने विकासकामे होतील अशी आशा प्रत्येक तालकावासीयांच्या मनामध्ये आहे. टेंभुच्या पाण्यासारखे विषय, रस्त्यांचे विषय मार्गी लागतील अशी आशा जनतेच्या मनात आहे. जनतेने जो लोकशाही मार्गाने मतपेटीतुन विश्वास दाखवला आहे तो विश्वास सार्थ ठरावा हीच एक छोटीशी सदिच्छा...
धन्यवाद...
श्री पोपट यमगर
बाळेवाडी, आटपाडी
सांगली.
7709935374
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा