नवी मुंबईचे आयुक्त आणि अनधिकृत बांधकामाविरुद्ध जबरदस्त मोहिम राबवणारे एक प्रामाणिक आणि कार्यक्षम अधिकारी आदरणीय तुकाराम मुंढे साहेब यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. आजपर्यंत अश्या अनेक प्रामाणिक आणि कार्यक्षम अधिकाऱ्यांना यासारख्या बदल्यानां अनेक वेळा सामोरे जावे लागले आहे. एखादा अधिकारी किंवा व्यक्ती जर प्रामाणिक पणाने स्वतःचे कर्तव्य पार पाडत असेल तर त्या व्यक्तीस आजूबाजूच्या स्वार्थी मंडळींकडून अश्या प्रकारचा त्रास देऊन त्याची बदली करण्यापर्यंत मजल जाते. खरंतर हा दोष या भ्रष्ट व्यवस्थेचा आहे. हि व्यवस्था बदलू पाहणाऱ्या अधिकाऱ्यांची जर अश्या पद्धतीने बदली करून जर खच्चीकरण केले तर पुढच्या नव्या पिढीपुढे कोणता आदर्श आम्ही ठेवतोय याचाही विचार सरकारने केला पाहिजे. जर अश्याच पद्धतीने चालत राहिले तर नवीन येणाऱ्या अधिकाऱ्यांनी प्रामाणिक पणे काम करायचे कि नाही??? हा माझा सरकारला सवाल आहे. अनेक प्रामाणिक अधिकारी अश्या राजकारण्यांच्या दबावाला बळी पडून बाहेर पडतात. प्रशासन आणि सरकार यांनी सामंजस्याने काम केले तरच जनतेचे प्रश्न सुटू शकणार आहेत. पण हल्ली राजकारण्यांना मान, सन्मान, मुजरा हवा असतो. तसेच आपण म्हणेल तसेच अधिकाऱ्यांनी वागले पाहिजे, बोलले पाहिजे, सही कर म्हणेल तिथे सही केली पाहिजे, आपण जनतेचे मालक आहोत असा दृष्टीकोन त्यांचा असतो. पण खरंतर लोकप्रतिनिधी हे जनतेचे सेवक आहेत ही गोष्टच लोकप्रतिनिधी विसरून चालले आहेत. नव्हे नव्हे ते गेलेच आहेत. दिल्ली मध्ये सेना खासदाराने एका एअर इंडिया च्या व्यस्थापकाला इकॉनॉमी श्रेणीमध्ये बसवल्याच्या कारणावरून चप्पलने मारहाण केली. कायदे बनवणाऱ्या संसदेचे संसदेचे सदस्य असताना तेच कायदे बिनधास्त पणे मोडून हे लोकप्रतिनिधी काय साध्य करत आहेत? आम्ही जनतेचे सेवक आहोत कि गुंड आहोत? हा प्रश्न कायदा हातात घेणाऱ्या लोकप्रतिनिधींनी स्वतःच्या मनाला विचारला पाहिजे.
या लोकप्रतिनिधींना भ्रष्ट अधिकारी हवे असतात. वर्षानुवर्षे भ्रष्ट अधिकारी आणि भ्रष्ट नेते यांची जी युती झाली आहे त्यामुळे देशाच्या सर्वांगीण विकासाला खीळ बसली आहे.
सरकारने प्रामाणिक आणि कार्यक्षम अधिकाऱ्यांना काम करण्यास मोकळीक दिली तर ते नक्कीच चांगले काम करतील. हल्ली अश्या प्रामाणिक अधिकाऱ्यांची संख्या वाढली पाहिजे यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे.
✍पोपट यमगर
आटपाडी, सांगली
7709935374
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा