'शेतकरी' हा केंद्रीभूत घटक मानूनच देशाच्या सर्वांगीण विकासाला चालना दिली गेली पाहिजे. याचे कारण म्हणजे देशाच्या संपूर्ण अर्थव्यवस्थेचा डोलारा हा शेतीतील शेतकऱ्याच्या प्रगतीवर अवलंबून आहे. तात्पुरती कर्जमाफी करून अकार्यक्षम सोसायट्या आणि सहकारी बँकांचे उथळ पांढरे करण्यापेक्षा शेतकऱ्यांना मूलभूत सुविधा उपलब्ध करुन देऊन कायमची कर्जमुक्ती करणे केव्हाही चांगलेच... पण सध्याच्या परिस्थितीत शेतकऱ्याची बिकट अवस्था पाहता त्यांना थेट मदत म्हणून शेतकऱ्यांच्या जनधन खात्यावर काही प्रमाणात पैसे जमा करणे महत्वाचे आहे.. यातून दोन उद्दिष्टे साध्य होतील एक म्हणजे शेतकऱ्यांना प्रत्यक्ष पणे मदत होऊन अकार्यक्षम सोसायट्या सहकार सम्राटाच्या पतसंस्था आणि सहकारी बँकां घोटाळा करून शेतकऱ्याच्या नावाने झालेल्या कर्जमाफीवर डल्ले मारणार नाहीत आणि दुसरे म्हणजे जरवर्षी प्रामाणिकपणे कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांनाही त्याचा फायदा होईल, आणि काही प्रमाणात कर्ज थकवण्याची सवयही कमी होईल....
यामुळे जर खरंच राज्य सरकारला शेतकऱ्याची कर्जमुक्ती करण्याची इच्छा असेल तर त्यांनी शेतकऱ्यांना प्राथमिक स्वरूपात थेट मदत केली पाहिजे..
धन्यवाद..
✍पोपट यमगर
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा