🌷विवेक प्रहार🌷
💥शिक्षक दिनी शिक्षकानांच दीन करण्याचं राज्य सरकारच धोरण💥
भारताचे माजी राष्ट्रपती डाॅ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमीत्त त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन। डाॅ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिन भारतामधे 'शिक्षक दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. आदरणीय सर्व शिक्षक बंधु, भगिनीं तसेच आमच्या गुरुजनवर्गास शिक्षक दिनानिमीत्त हार्दिक शुभेच्छा. शिक्षकदिनाच्या उंबरट्यावर राज्यातील शिक्षकांनाच कसे दीन ठरविले जात आहे याचा आढावा आपण या लेखात घेणार आहोत.
राज्यात सत्तेवर आलेल्या सरकारच्या शिक्षण विभागाने 28 ऑगस्ट 2015 रोजी शिक्षकांच्या संचमान्यतेचा नवा निर्णय(परिपत्रक) जाहीर केला आहे. नव्या निर्णयानुसार शाळेतील एकुण विद्यार्थ्यांच्या संख्येवर शिक्षकांची पदे मंजूर होणार आहेत. पहिली ते पाचवी 30 विद्यार्थ्यासाठी प्रत्येकी एक शिक्षक, सहावी ते आठवी 35 विद्यार्थ्यासाठी प्रत्येकी एक शिक्षक, नववी व दहावीच्या वर्गामधे दोन्ही मिळुन 40 पेक्षा जास्त विद्यार्थीसंख्या असेल तरच 3 शिक्षक असणार आहेत. त्यानंतर विद्यार्थीसंख्या 40 ने वाढल्यास एका शिक्षकाचे पद मंजुर होणार आहे. या निर्णयाचे गंभीर परिणाम शिक्षकांच्यावर होणार आहेत, याचे कारण म्हणजे राज्यात पहिलेच कित्येक अतिरिक्त शिक्षक आहेत. त्यांना सामावून घेण्याऐवजी या नव्या निर्णयाने जवळजवळ एक लाख शिक्षक अतिरिक्त होणार आहेत. एकतर गेली कित्येक वर्षे राज्यात नवी शिक्षक भरती नाही त्यामुळे हजारो डी.एड, बी एड पदवीधारक बेरोजगार आहेत त्यांना रोजगार देण्याऐवजी राज्य सरकार आहे त्यानांच अतिरिक्त करत आहे ही शिक्षक दिनी ज्ञानदानासारखे पवित्र कार्य करणारया शिक्षकांची आणि पर्यायाने समाजाचीही दुर्दैवी शोंकातिका आहे असे म्हणावे लागेल.
शाळेत कमीत कमी 90 पेक्षा जास्त विद्यार्थीसंख्या असेल तरच मुख्याध्यापक पद राहणार आहे. एकजरी विद्यार्थी कमी झाला तर शाळेस मुख्याध्यापक असणार नाही. शाळेवर नियंत्रण ठेवण्यासाठी, शाळेच्या वर्षभर कामकाजाचे नियोजन करण्यासाठी एक प्रमुख व्यक्ती असावा. विद्यार्थीसंख्या 90 पेक्षा कमी झाली म्हणून शाळेवर मुख्याध्यापक राहणार नाही असे शिक्षण विभागास कसे काय वाटू शकते??? या निर्णयामुळे शाळेच्या नियोजनात गोंधळ होणार नाही का??? तसेच माध्यमिक शाळामधे शिक्षकांची नियुक्ती ही विद्यार्थ्यांच्या संख्येवरती आधारीत असल्याने विद्यार्थ्यांना शिकविण्यास प्रत्येक विषयासाठी तज्ञ शिक्षक मिळणार नाहीत. एका शिक्षकास तीन तीन विषय शिकवावे लागणार आहेत. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण ज्ञानासाठी प्रत्येक विषयासाठी तज्ञ शिक्षक असणं गरजेचं आहे.
सरकारचे उपक्रम, कार्यक्रम यामुळे शिक्षकांचा विद्यार्थ्यांना शिकविण्यापेक्षा शाळाबाह्य कामातच जास्त वेळ जातो ही वस्तुस्थिती आहे. शिक्षणमंत्री विनोद तावडेसाहेब दररोज एक नविन घोषणा करत आहेत त्याऐवजी त्यांनी अभ्यासक्रमाचा दर्जा वाढवून विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर जास्त भर देणं गरजेचं आहे. ज्ञानार्जनासारख्या पवित्र शिक्षण क्षेत्रामधे ज्ञानदान करणारया आणि देशाची सक्षम भावी पिढी घडविणारया गरुजनांच्या आणि पर्यायाने भावी पिढीच्या (विद्यार्थ्यांच्या) भवितव्याकडे लक्ष देण्याची गरज आहे त्याकडे सरकारने लक्ष द्यावे हीच शिक्षक दिनी सदिच्छा.
श्री. पोपट यमगर
बाळेवाडी, ता.- आटपाडी,
जि. - सांगली.
7709935374
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा