विवेक विचार

विवेक विचार

गुरुवार, ३१ डिसेंबर, २०१५

🌷🇨🇮विवेक प्रहार🇨🇮🌷
खुप दिवसानंतर लेख लिहायला घेतल्यानंतर लेखाची सुरवात कुठुन आणि कशी करायची असा विचार करीत असतानाच अचानक कविवर्य कुसुमाग्रजांची कविता आठवली. "मध्य रात्र झाल्यावर शहरातील चौकात पाच पुतळे जमले आणि टिपं गाळु लागले. फुले म्हणाले, मी झालो फक्त माळ्यांचा। टिळक म्हणाले, मी तर चितपावन ब्राम्हणांचा। आंबेडकर म्हणाले, मी फक्त नवबौद्धांचा। शिवाजीराजे म्हणाले मी फक्त मराठ्यांचा। गांधीजी म्हणाले, तरी तुमचं बरं आहे तुमच्या पाठीशी किमान एक एक जात जमात तरी आहे माझ्या पाठीशी फक्त सरकारी कचेरीतील भिंती।।
        आपण अशा पद्धतीने राष्ट्रपुरुषांची जाती धर्मात वाटणी करुन ठेवली आहे ही एक खुप मोठी खेदजनक आणि मनाला बोचणारी शोकांतीका आहे. आज समाजामधे एखाद्या व्यक्तीला आपले म्हणायचे का?? हे त्याच्या जाती धर्मावरुन ठरवले जाते. आपण 21 शतकातील 16 व्या वर्षात पदार्पण करतोय. काळ खुप वेगाने बदलतोय तंत्रज्ञानाच्या माध्यमातुन दररोज नवनविन बदल घडुन येत आहेत. आपणही चांगले बदल स्वीकारले पाहिजेत, वाईट दुष्परिणाम ठरणारे बदल स्वीकारु नयेत. सर्व महापुरुषांनी आपणाला काळानुसार बदलले पाहिजे हे आपणाला समजाऊन सांगितले तरीही आपण फक्त जातीपाती आणि कर्मकांड, अंधश्रद्धा यामधेच अडकुन राहतो. त्या त्या महापुरुषांना त्या त्या काळामधे बदल घडवुन आणण्यासाठी कर्मठ सनातन्यांच्या विरोधाला सामोरे जाऊन मानसिक त्रास सहन करत बदल घडवुन आणले. छत्रपती शाहु महाराज , महात्मा फुले, डाॅ. बाबासाहेबांनी तर त्या काळी तथाकथित उच्चवर्णीयांनी केलेला खुप मोठा अपमान त्रास हसत हसत सहन केला आहे. स्वामी विवेकानंदजीनाही शिखागोला जाण्यापुर्वी भारतात कर्मठ सनातन्यांचा खुप मोठा विरोध झाला होता. कारण काय तर हिंदु धर्मातील व्यक्तींनी समुद्रमंथन करुन परदेशात जायचे नसते, पण स्वामीजीं तो विरोध झुडकारुन शिखागोला गेले आणि हिंदु धर्मातील महान संस्कृतीचे गुणगान गायले. आज तेच कर्मठ  लोक छत्रपती शिवाजी राजे यांच्या प्रमाणे स्वामीजींना एका कट्टरतेच्या चौकटीत बंदिस्त करत आहेत. भारतातील हे थोर विचारांचे महापुरुष काय कोणत्या एका कट्टरतेच्या चौकटीत बसणारी व्यक्तीमत्वे होती का? यांनी भारतातील प्रत्येक माणसास प्रांत,भाषा,जात,धर्म यांच्या पलीकडे जाऊन विश्वबंधुत्वापासुन माणुसकीची शिकवण दिली. आज महापुरुषांच्या नावाने आपले राजकीय नेते वेगवेगळ्या रंगाची दुकाने उघडुन स्वतःची राजकीय पोळी भाजुन घेत आहेत.पण त्या महापुरुषांचे विचार मात्र आचरणात आणाताना दिसुन येत नाहीत. उलट स्वतःच्या स्वार्थासाठी समाजामध्ये जातीयवाद जोपासण्याचा प्रयत्न करत आहेत.आज भाषणामधे महाराष्ट्राला शाहु फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणायचे पण त्यांचे जातीअंताचे विचार कधीच अंमलात आणायचे नाहीत. उलट स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी नविन जातीव्यवस्था निर्माण व्हावी यासाठी छुप्या पद्धतीने राजकारण करायचे हे न समजायला जनता काय दुधखुळी नाही. आज महाराष्ट्रातील राजकारणामधे ह्या जातीचा हा नेता, त्या जातीचा तो नेता , बहुजनांचा नेता असे जे ठरवले जाते ते लोकशाहीमधे अभिप्रेत नाही आहे. सामान्य माणसांच्या, गोरगरीब जनतेच्या, समाजाच्या नावाने राजकारण करायचे आणि एकदा की मोठ्या पदावर किंवा पातळीवर गेले की पाठीमागच्या जनतेकडे पहायचेही नाही. म्हणजे सामान्य माणसांच्या, गोरगरीब जनतेच्या, समाजाच्या नावाने राजकारण करत श्रीमंत व्हायचे पुन्हा समाजाच्या महत्वाच्या मुद्याऐवजी पदासाठी वाट पाहत बसायचे हे आजच्या नविन नेत्याचं महत्वाचे वैशिष्ट्य झाले आहे. परंतु अशा बोलघेवड्या नेत्यांनीही एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे ती म्हणजे नेता कितीही उच्चपदावर गेला तरी त्याला जमिनीवर आणण्याची ताकद गोरगरीब व सर्वसामान्य जनतेला डाॅ. बाबासाहेबांनी राज्यघटनेच्या माध्यमातुन मिळवुन दिली आहे. जनता ही नेहमी सतर्क असते हे आपण अनेकवेळा भुतकाळामधे पाहिले आहे, वर्तमानकाळामधे पाहतोय आणि भविष्यकाळामधेही आपणास दिसेल याबद्दल माझ्या मनात तरी कोणतीच शंका नाही.
जय हिंद।।
🙏🏻🙏🏻📚📚🇨🇮🇨🇮
श्री. पोपट यमगर
बाळेवाडी, ता.- आटपाडी,
जि.-सांगली .
Email-: pgyamgar@gmail.com
🇨🇮विवेक प्रहार🇨🇮🌷
मित्रांनो परवा बीडच्या सातभाई कुटुंबातील वडिलांने मुलीचं लग्न करायला पैसे नव्हते म्हणून आत्महत्या केली. महाराष्ट्रतील तमाम गोरगरीब सर्वसामान्य बंधु भगिनीना माझी हात जोडुन नम्रतीची विनंती आहे की, जर आपला जावई 21 व्या शतकातही हुंडा मागत असेल तर त्या जावयाला हुंडा देण्यासाठी तुम्ही आत्महत्या कशाला करता?? आपली मुलगी अशा भिकारी जावयाला देऊ नका!! ,, कारण भारतासह महाराष्ट्रातही मुलींचे प्रमाण (1000-940) खुप कमी आहे. त्यामुळे मुलगी अविवाहीत राहील याची काळजी क...रु नका. आणि एक आपल्या मुलाचे मुलीचे लग्न अतिशय साध्या पद्धतीने करा. उगाचंच होणारा वायफट खर्च टाळा.
राजेंनी एक ही रुपया हुंडा न घेता राजाराम महाराजांचे लग्न अतिशय साध्या पद्धतीने लावुन दिले. त्यांच्याच महाराष्ट्रातील स्वतःला राजेंचे मावळे म्हणुन घेणारे आपण आज लग्नामधे लाखो रुपयांचा चुराडा करतोय.. हे महाराष्ट्राचं पर्यायानं आपलंही दुर्दैव म्हणावं लागेल.. याबाबत समाजाने छत्रपती शिवाजी महाराजांचाच आदर्श घ्यावा ही तमाम शिवाजी महाराज यांच्या मावळ्याना माझी नम्रतीची विनंती.
श्री. पोपट यमगर
बाळेवाडी, ता.- आटपाडी , जि. सांगली
7709935374
pgyamgar@gmail.com

शुक्रवार, ४ सप्टेंबर, २०१५

🌷विवेक प्रहार🌷

💥शिक्षक दिनी शिक्षकानांच  दीन करण्याचं राज्य सरकारच धोरण💥

             भारताचे माजी राष्ट्रपती डाॅ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमीत्त त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन। डाॅ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिन भारतामधे 'शिक्षक दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.  आदरणीय सर्व शिक्षक बंधु, भगिनीं तसेच आमच्या गुरुजनवर्गास शिक्षक दिनानिमीत्त हार्दिक शुभेच्छा. शिक्षकदिनाच्या उंबरट्यावर राज्यातील शिक्षकांनाच कसे  दीन ठरविले जात आहे याचा आढावा आपण या लेखात घेणार आहोत.
               राज्यात सत्तेवर आलेल्या  सरकारच्या शिक्षण विभागाने 28 ऑगस्ट 2015 रोजी शिक्षकांच्या संचमान्यतेचा नवा निर्णय(परिपत्रक) जाहीर केला आहे. नव्या निर्णयानुसार शाळेतील एकुण विद्यार्थ्यांच्या संख्येवर शिक्षकांची पदे मंजूर होणार आहेत. पहिली ते पाचवी 30 विद्यार्थ्यासाठी प्रत्येकी एक शिक्षक, सहावी ते आठवी 35 विद्यार्थ्यासाठी प्रत्येकी एक शिक्षक, नववी व दहावीच्या वर्गामधे दोन्ही मिळुन 40 पेक्षा जास्त विद्यार्थीसंख्या असेल तरच 3 शिक्षक असणार आहेत.  त्यानंतर  विद्यार्थीसंख्या 40 ने वाढल्यास  एका शिक्षकाचे पद मंजुर होणार आहे. या निर्णयाचे गंभीर परिणाम शिक्षकांच्यावर  होणार आहेत, याचे कारण म्हणजे राज्यात पहिलेच कित्येक अतिरिक्त शिक्षक आहेत. त्यांना सामावून घेण्याऐवजी या नव्या निर्णयाने जवळजवळ एक लाख शिक्षक अतिरिक्त होणार आहेत. एकतर गेली कित्येक वर्षे राज्यात नवी शिक्षक भरती नाही त्यामुळे हजारो डी.एड, बी एड पदवीधारक बेरोजगार आहेत त्यांना रोजगार देण्याऐवजी राज्य सरकार आहे त्यानांच अतिरिक्त करत आहे ही शिक्षक दिनी ज्ञानदानासारखे पवित्र कार्य करणारया शिक्षकांची आणि पर्यायाने समाजाचीही दुर्दैवी शोंकातिका आहे असे म्हणावे लागेल. 
           शाळेत कमीत कमी 90 पेक्षा जास्त विद्यार्थीसंख्या असेल तरच मुख्याध्यापक पद राहणार आहे. एकजरी विद्यार्थी कमी झाला तर शाळेस मुख्याध्यापक असणार नाही.   शाळेवर नियंत्रण ठेवण्यासाठी, शाळेच्या वर्षभर कामकाजाचे नियोजन करण्यासाठी एक प्रमुख व्यक्ती असावा. विद्यार्थीसंख्या 90 पेक्षा कमी झाली म्हणून शाळेवर मुख्याध्यापक राहणार नाही असे शिक्षण विभागास कसे काय वाटू शकते???   या निर्णयामुळे शाळेच्या नियोजनात गोंधळ होणार नाही का??? तसेच माध्यमिक शाळामधे शिक्षकांची नियुक्ती ही विद्यार्थ्यांच्या संख्येवरती आधारीत असल्याने विद्यार्थ्यांना शिकविण्यास प्रत्येक विषयासाठी तज्ञ शिक्षक मिळणार नाहीत. एका शिक्षकास तीन तीन विषय शिकवावे लागणार आहेत. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण ज्ञानासाठी प्रत्येक विषयासाठी तज्ञ शिक्षक असणं गरजेचं आहे.
        सरकारचे उपक्रम, कार्यक्रम यामुळे शिक्षकांचा  विद्यार्थ्यांना शिकविण्यापेक्षा शाळाबाह्य कामातच जास्त वेळ जातो ही वस्तुस्थिती आहे.  शिक्षणमंत्री विनोद तावडेसाहेब दररोज एक नविन घोषणा करत आहेत त्याऐवजी त्यांनी अभ्यासक्रमाचा दर्जा वाढवून विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर जास्त भर देणं गरजेचं आहे.  ज्ञानार्जनासारख्या पवित्र शिक्षण क्षेत्रामधे  ज्ञानदान करणारया आणि देशाची सक्षम भावी पिढी घडविणारया गरुजनांच्या आणि पर्यायाने भावी पिढीच्या (विद्यार्थ्यांच्या) भवितव्याकडे लक्ष देण्याची गरज आहे त्याकडे सरकारने लक्ष द्यावे हीच शिक्षक दिनी सदिच्छा.

श्री. पोपट यमगर
बाळेवाडी, ता.- आटपाडी, 
जि. - सांगली.
7709935374

शिक्षक दिनी शिक्षकानांच दीन करण्याचं राज्य सरकारच धोरण

बुधवार, १९ ऑगस्ट, २०१५

विवेक प्रहार

                महाराष्ट्र भूषण पुरस्कार दिल्यानंतर यावर्षी खुप स्वार्थी राजकारण झाले. प्रथम पाठिंबा द्यायचा नंतर विरोध(आतुन एक बाहेरुन पत्रकारांना एक) असे सोईस्कर निर्णय स्वतःस जाणते राजे म्हणवून घेणारयांनी घेतले. इतकी वर्षे सत्तेत होता आता जनतेनं सत्तेतून बाहेर हाकलले म्हणून महाराष्ट्रातल्या युवकांची माथी जातीय विष पाजून भडकावयाचे उद्योग आपण चालू केलेत. जनता काय एवढी दुधखुळी आहे का तुमचं हे षढयंत्र न समजायला???? महाराष्ट्रातील सूज्ञ जनतेला (खासकरुन युवकांना) तुमचे स्वार्थी राजकारण समजले आहे.   राजकीय भाषणात फक्त शाहु फुले आंबेडकरांचे नाव घ्यायचं पण  त्यांच्या विचाराप्रमाणे  वागायचं नाही.
               या सर्व पुरस्काराच्या विरोधातील गोंधळामुळे शाळेतील, विद्यालयातील,  महाविद्यालयातील, विद्यार्थ्यांनी कोणता संदेश घ्यायचा ???  तमच्या स्वार्थी राजकारणासाठी महाराष्ट्रातील या भावी पिढीवरती किती गंभीर परिणाम होत आहेत याची जनाची नाही किमान मनाची तरी लाज ठेवा.
               21 व्या शतकांत अजूनही आम्ही जाती पातीवरच भांडत बसतो हे खरंच महाराष्ट्रात 19 व्या व 20 शतकांत समाजसुधारणेचं कार्य करणारया समाजसुधारकांचं दुर्दैव म्हणाव लागेल...  छत्रपती शाहू महारज , महात्मा फुले , डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांना जातिनिर्मुलन करुन समता प्रस्थापित करायची होती त्यांना काय नवा जातियवाद निर्माण करायचा होता का??   सध्याच्या काळात जाती पातीवरुन होणारी फाटाफूट वाढवण्यापेक्षा कमी करणं गरजेचं आहे ते काम आपणासारखे  राष्ट्रीय चारित्र्याचे युवकच करु शकतात.

श्री. पोपट यमगर
(बाळेवाडी ता. आटपाडी, जि. सांगली)
7709935374

शुक्रवार, १४ ऑगस्ट, २०१५

🌷विवेक प्रहार🌷

आज भारताला स्वांतत्र्य मिळून 68 वर्ष झाली. भारताच्या स्वांतत्र्यासाठी अनेक स्वांतत्र्ययोद्धे झटले, झगडले, स्वतःच्या संसाराची राखरांगोळी करुन देशातील देशाच्या संसाराचा गाडा हाकला, भावी पिढयांचे आयुष्य सुखाचे समाधानाचे आनंदाचे व्हावे यासाठी इंग्रजांशी संघर्ष केला, कित्येक क्रांतीकारकांनी भारतमातेसाठी बलिदान दिले या सर्व भारतमातेच्या थोर सुपुत्रांना माझ्याकडुन स्वांतत्रदिनानिमीत्त प्रथमतः विनम्र अभिवादन।
       भारताला स्वांतत्र्य मिळाल्यानंतर पहिल्या पंधरा वर्षात भारताचे पंतप्रधान मा. पंडीत जवाहरलाल नेहरु यांनी आधुनिक भारताचा पाया शेती, उद्योग, व्यापार ,सेवा, परराष्ट्रीय संबध या सर्व क्षेत्रात भक्कम केला. पुढे त्यावरती देशाची इमारत बांधण्याचं काम पंतप्रधान लालबहादुर शास्त्री, पंतप्रधान  इंदिराजी गांधी, पंतप्रधान राजीवजी गांधी , पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी , पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी केले. आणि आता पंतप्रधान नरेंद्र मोदीजी भारताला प्रगतीच्या दिशेने घेऊन जाण्याचं कार्य करत आहेत. भारत अन्नधान्याच्या बाबतीत जगातील एक स्वयंपूर्ण देश आहे. 21 व्या माहिती आणि तंत्रज्ञानाच्या शतकात भारत जगाचं नेतृत्व करत आहे. हे चारच दिवसापूर्वी गुगलच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर निवड झालेल्या सुंदर पिचई यांच्या उदाहरणावरुन पुन्हा एकदा सिद्ध झाले. आपण उद्योग , क्रीडा, शिक्षण, विज्ञान या क्षेत्रातही गरुडभरारी घेत आहोत.  स्त्रीयांनीही त्यांना मिळणारया दुय्यम वागणूकीला व
फक्त चुल आणि मुल या मुलभुत चौकटीला बगल देऊन  अनेक क्षेत्रात केलेली प्रगती ही निश्चीतच उल्लेखनीय आहे. (उदा. पंतप्रधान इंदिरा गांधी, राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील,  माजी सनदी अधिकारी किरण बेदीजी, पेप्सीको कंपनीच्या सीईओ इंद्रा नुई, स्टेट बॅकेच्या मुख्य अरुधंती भट्टाचार्य इ.) याचाच अर्थ आपण विजयाच्या  (दिवंगत डाॅ. कलाम साहेबांनी पाहिलेल्या जागतिक महासत्तेच्या) दिशेने वाटचाल करत आहोत.)
        आपल्या भारताच्या समोर  अजुनही  काही समस्या आणि आव्हाने आ वासून पुढे आहेत. उदा. लोकसंख्या वाढ, दारिद्र्य, बेकारी, दहशतवाद, नक्षलवाद, दुष्काळ, भ्रष्टाचार, स्त्रियांवरचे अत्याचार इ. याबरोबर आपल्यातीलच काही अंतर्गत जातीय शक्ती तरुणांची माथी भडकावून जातींच्या भिंतीत अडकावून भारतात नवा जातीयवाद निर्माण करण्याचं कार्य करत आहेत. या सर्वच समस्या, आव्हानावरती उपाय काढण्याचं कार्य केंद्रामधे सकारात्मक दुरदृष्टीकोन असलेलं सरकार अखंड अविरतपणे करत आहे.   
आपणासही 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी या दोनच  दिवशी देशाची आठवण येऊ न देता दररोज अखंडपणे  एक भारतीय नागरिकाचं कर्तव्य आणि जबाबदारी म्हणुन छोट्या छोट्या गोष्टीमधून देशकार्य केलं पाहिजे. म्हणून भारतमातेच्या उज्वल भवितव्यासाठी आपण आपापल्या क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करावं हीच 69 व्या स्वातंत्र्य दिनी सदिच्छा। 
शेवटी एवढेच म्हणेन, 
"हेचि दान देगा देवा। भारतीयत्वाचा विसर न व्हावा॥"
 
श्री. पोपट यमगर 
(बाळेवाडी, ता. आटपाडी, जि. सांगली)
7709935374
जगाला उदाहरण घालुन देण्याचे जे आपले ध्येय आहे त्याच्या सिद्धीसाठी जे भगीरथ प्रयत्न आपणास करावे लागणार आहेत त्यासाठी तयार रहा..

बुधवार, २४ जून, २०१५

सगळे सारखेच

🌷🌷विवेक प्रहार 🌷🌷

भारतामधे गेल्या काही दिवसापासुन बोगस पदव्या घेतलेल्या राजकारण्यांची प्रकरणे दररोज बाहेर येत आहेत.  केंद्राच्या मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती ईराणी यांच्यापासुन ते दिल्लीतील आपचे मंत्री जितेंद्र तोमर,  महाराष्ट्रातील मंत्री बबनराव लोणीकर, माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ,  यांच्यासह नुकतेच वादात सापडलेले राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे या सर्व पक्षातील नेत्यांचा समावेश होताना दिसत आहे. कालांतराने ही यादी वाढतच जाईल याबद्दल माझ्या मनात तीळमात्र शंका नाही. 
              महाराष्ट्र राज्यात शिक्षण क्षेत्रात काय खेळखंडोबा चालवला आहे हे सर्वांना माहित आहेच अशातच महाराष्ट्राचे शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी घेतलेल्या बोगस पदवीचे प्रकरण पुढे आले आहे. तावडे यांच्यामते माझी इलेक्ट्रॉनिक्स ही  पदवी अनधिकृत विद्यापीठाची (ज्ञानेश्वर विद्यापीठ) आहे पण बोगस नाही. तावडेंचं म्हणणं खरं मानून आपण पुढे चर्चा करु.  पुण्यातील नव्या पेठेतील  एका इमारतीत हे ज्ञानेश्वर विद्यापीठ चालते. याला  विद्यापीठ म्हणण्यात येत असले तरी  हे एका संस्थेचे नाव असुन यास विद्यापीठाचा दर्जा नाही किंवा विद्यापीठ अनुदान आयोगाची मान्यता नाही. म्हणजे यास विद्यापीठच म्हणता येणार नाही म्हणजे तावडे हे अनधिकृत विद्यापीठातुन पदवी घेतलेले (अनियमीत) विद्यार्थी आहेत. 
           आज महाराष्ट्रात आणि देशात सध्या अशा अनधिकृत विद्यापीठांनी तर शिक्षणाचे बाजारीकरण करुन ठेवले आहे. विशेषतः राजकीय नेत्यांचा तर एक  मोठा व्यवसाय झालेला आहे. आज  शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रात अशा अनधिकृत विद्यापीठाकडुन लाखो रुपये घेऊन जशा बाजारात वस्तू विकल्या जातात तशा विद्यापीठात पदव्या विकल्या जात आहेत. त्यामुळे प्रामाणिक असणारे गरीब विद्यार्थी हुशार असुनही त्यांना योग्य संधी किंवा योग्य स्थान मिळत नाही. 
             सन्माननीय तावडेसाहेब तुमच्या भुमिका  विषयी माझ्या सारख्या उच्चशिक्षित विद्यार्थ्यांच्या  मनाला काय प्रश्न पडतात. ते म्हणजे : 
1) राज्याच्या शिक्षण मंत्र्यांनीच अनधिकृत विद्यापीठाकडुन पदवी घेतली असल्याने राज्यातील विद्यार्थ्यांनी  तुमच्याकडुन कोणता आदर्श घ्यायचा?
2) राज्यातील अशा अनधिकृत शाळांना किंवा बिगरमान्यताप्राप्त संस्थाना तुम्ही पोटतिडकीने विरोध का करता?!!
3) अनधिकृत शाळांना किंवा बिगरमान्यताप्राप्त संस्थाच्या बद्दल आपली भुमिका काय?
           म्हणून ज्ञान देणार्या किंवा देशाची भावी पिढी घडवणार्या शिक्षणासारख्या खात्याचा कारभार आपण घेताना अशा गोष्टींचा विचार करायला पाहिजे होता. तावडेंच्या निमीत्ताने वादळ होऊन शिक्षण क्षेत्रातील पवित्रतेला धोका पोहोचू नये हीच माफक अपेक्षा! 

श्री पोपट यमगर 
(बाळेवाडी ता. आटपाडी, 
जि. सांगली)
7709935374
 popatgyamgar.blogspot.com🌷
......................