✍✍विवेक प्रहार✍✍
आजचा लोकसत्ताचा अग्रलेख विचार करण्यास प्रवृत्त करणारा
अग्रलेख आहे. महाराष्ट्रात सध्या 18 वर्षाखालील मुलींचे लग्न लावून
देण्याचे प्रमाण वाढले आहे. अनेक ठिकाणी मुलगी 14, 15 वर्षाची झाली की
तिचे पालक लग्न लावुन देतात. लग्न लावुन दिल्यानंतर त्यांची प्रतिक्रिया
ही फार बोलकी असते ती म्हणजे झालो एकदाशी या कटकटीतुन मोकळा???? म्हणजे
मुलगी म्हणजे कटकट,, मुलगी म्हणजे डोक्यावरील कर्जाचं ओझं ही समाजाची धारणा
झाली आहे. परवाच मातृदीन साजरा झाला. अल्पवयीन वयात लग्न झाल्यामुळे
लवकरच मातृत्व येते त्यामुळे ज्या वयात स्वतःचे बालपण खेळण्या बागडण्यात
घालवायचे असते त्याच वयात स्वतःच्या मुलांची जबाबदारी खांद्यावर येऊन पडते.
हे चित्तथरारक दृश्य असल्याचं आपणास दिसुन येईल. लवकर लग्न झाल्यामुळे
स्त्रीला डीलीव्हरी होताना होणारा त्रास आणि त्यामुळे अनेक भगिनींचे होणारे
मृत्यु याचंही प्रमाण जास्त होत असल्याचं आपल्याला दिसुन येत आहे. लवकर लग्न करण्यामागची कारणंही लोकसत्तानं चांगल्या पद्धतीने स्पष्ट केली
आहेत. सर्वात महत्वाचं म्हणजे मुलीबद्दलची असुरक्षिततेची भावना।। आज आम्हो
कितीही महासत्तेच्या गप्पा मारत असलो तरी तुमच्या माझ्या भगिनीच्या मनात
सुरक्षिततेची भावना उतरवण्यास आपण कुठेतरी नक्कीच कमी पडतोय असं मला ठामपणे
वाटतं. ती सुरक्षिततेची भावना आपण आपल्या भगिनींच्या मनात जेव्हा उतरवु तो
नक्कीच सुदीन असेल असं मी समजतो.
धन्यवाद
(जागृत विचारातुन✍✍✍)
श्री. पोपटराव यमगर
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा