देशाच्या अर्थसंकल्पाविषयी ....

देशाच्या अर्थसंकल्पाविषयी ....
1 फेब्रुवारी अर्थातच उद्या आपल्या देशाचे अर्थमंत्री अरुण
जेटली हे पुढील २०17 - 18 या वर्षासाठी देशाच्या एकूण खर्च आणि उत्पन्नाचे
अंदाजपत्रक (अर्थसंकल्प) संसदेच्या लोकसभा या सभागृहात सादर करतील.
तत्पूर्वी उद्याच्या अर्थसंकल्पाविषयी अनेक चर्चा आपण पाहत आहोतच. आपल्याही
मनात अनेक प्रश्न पडू लागले असतील ते म्हणजे उद्याचा अर्थसंकल्प कशा
प्रकारचा असेल. कोणत्या क्षेत्रात जास्त गुंतवणुक केली जाईल..
सर्वसामान्यांसाठी कोणत्या नवीन योजनांचा अर्थसंकल्पात समावेश केला जाईल
??... उद्योग क्षेत्रातील नवीन बदलांना दिशा या अर्थसंकल्पातून भेटेल का??
शेती क्षेत्रात आशादायक चित्र उभारेल काय ?? नोटबंदीनंतर भारताच्या
विकासदारावर झालेला परिणाम भरून काढण्यासाठी अर्थमंत्री काय तरतूद करणार ??
नवीन जीएसटी करप्रणाली कधी पासून चालू होणार?? प्राप्तिकर सवलतीची
वार्षिक उत्पन्न मर्यादा वाढवली जाणार का?? या सर्वप्रश्नासह उद्या च्या
अंदाजपत्रकात काय स्वस्त झाले आणि काय महाग?? आपल्या अर्थव्यवस्थेत रुपया
येणार कसा आणि जाणार कसा?? यासारखे असंख्य प्रश्न आपल्या सर्वांच्या
मनात आहेत. आज उद्या आणि आणखी पुढील आठवडाभर अनेक माध्यमांमधून यासंबंधात
अनेक नामवंत अर्थतज्ञांच्या चर्चा , विविध लेख आपल्याला पाहायला वाचायला
मिळतील. आपल्या देशाचा अर्थसंकल्प समजून घेणं हे आपल्या सर्वांच्या
दृष्टीने खूप महत्वाचे आहे.
आपल्या देशाचा रेल्वे अर्थसंकल्प 26 फेब्रुवारीला आर्थिक
पाहणी अहवाल 27 फेब्रुवारीला आणि देशाचा अर्थसंकल्प हा दरवर्षी 28
फेब्रुवारी या दिवशी बरोबर 11 वाजता(1999 पूर्वी तो 5 वाजता सादर केला
जायचा) लोकसभेत सादर केला जात होता. त्यानंतर पुढील मार्च महिन्यात या
अर्थसंकल्पावर लोकसभेत चर्चा होऊन 1 एप्रिल पासून तो संपूर्ण देशाला लागू
व्हायचा. पण यावर्षी देशाच्या मागील वर्षीचा आर्थिक पाहणी अहवाल आज
लोकसभेत सादर केला जाईल . आणि अर्थसंकल्प हा 1 फेब्रुवारीला म्हणजेच
उद्या मांडला जाणार आहे. रेल्वे अर्थसंकल्प यावर्षी वेगळा मांडला जाणार
नाही. या सर्व घडामोडी, प्रश्नासह पुढील तीन दिवस वार्षिक अंदाजपत्रक आणि
त्यातील काही आर्थिक संकल्पना आपण सोप्या भाषेत आणि शब्दात समजून घेण्याचा
प्रयत्न करणार आहोत. अर्थसंकल्प संबंधित आपणही अनेक मुद्दे किंवा आपले मत
नक्कीच शेअर करा..
काही महत्वाच्या संकल्पना :-
1)स्थूल देशांतर्गत उत्पादन (GDP) :-
एका वर्षाच्या कालावधीत सर्व उत्पादन घटकांनी देशाच्या भौगोलिक सीमा
रेषेच्या आत उत्पादित केलेल्या अंतिम वस्तू आणि सेवा यांचे पैशातील मूल्य
म्हणजेच स्थूल देशांतर्गत उत्पादन होय.
2) स्थूल राष्ट्रीय उत्पादन (GNP) :-
देशातील नैसर्गिक साधन सामग्रीच्या साहाय्याने ज्या वस्तू आणि सेवांचे
उत्पादन केले जाते, त्याचे पैशातील एकूण मूल्य म्हणजे स्थूल राष्ट्रीय
उत्पादन होय.
3) निव्वळ राष्ट्रीय उत्पादन :- (NNP)
स्थूल राष्ट्रीय उत्पन्नातुन घसारा (उत्पादित वस्तू आणि यंत्रसामग्रीची होणारी झीज) वजा केली असता निव्वळ राष्ट्रीय उत्पादन मिळते.
4) दरडोई उत्पन्न(PCI ) :-
एका विशिष्ट कालखंडातील देशाचे सरासरी उत्पन्न म्हणजे दरडोई उत्पन्न होय.
देशाच्या एकूण राष्ट्रीय उत्पन्नाला देशाच्या एकूण लोकसंख्येने भागले असता
आपणास दरडोई उत्पन्न मिळते.
5) एकूण सार्वजनिक खर्च :-
देशाच्या विविध सार्वजनिक आर्थिक विकास प्रकल्पासाठी आणि सर्वसामान्य
नागरिकांच्या भवितव्यासाठी आखलेल्या कल्याणकारी योजनांसाठी केल्या
जाणाऱ्या खर्चाचा समावेश एकूण सार्वजनिक खर्चात केला जातो.
धन्यवाद..
✍श्री. पोपटराव यमगर
बाळेवाडी, ता. आटपाडी,
जि. सांगली.
7709935374
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा