आज समाजाच्या मनावर, विचारावर माध्यमाचं(Media) वर्चस्व मोठ्या प्रमाणात वाढत आहे. मी वर्चस्व वाढत आहे असं म्हटले, याचं कारण म्हणजे एखादी बातमी दाखवताना त्या बातमीला इतक्या आक्राळ विक्राळ स्वरुपात दाखवली जाते कि त्या बातमीचा परिणाम हा समाजमनावरती खूप मोठ्या प्रमाणात पडला जातो किवां पडत आहे. एखादी घटना घडली रे घडली कि त्या घटनेची पूर्ण सत्यता न तपासता त्याची पहिली बातमी आपल्या चनेल वर येण्यासाठी किवा सनसनाटी ब्रेकिंग न्यूज देण्यासाठी खूप गडबड करून ती बातमी दाखवली जाते. काही वेळा एखादी नकारात्मक बातमी चानेलच्या TRP साठी इतक्या वेळा दाखवली जाते कि त्याचा नकारात्मक परिणाम समाजावर पडत असतो हे ना रिपोर्टरला समजते, ना संपादकाला…
आज आपण बातम्या चे चानेल लावले कि काय बातम्या असतात?? हाताच्या बोटावर मोजण्या इतक्या चांगल्या बातम्या असतात नाहीतर राजकारणातील दररोजची एकमेकावरील चिखलफेक (निवडणुकीतील आश्वासनावरून जनतेचे लक्ष हटविण्यासाठीच असेल कदाचित) ,त्यातही चघळून चघळून चोथा झालेल्या टीका, भ्रष्टाचाराच्या घोटाळ्याच्या बातम्या, राजकीय नेत्यांची चानेल च्या कार्यक्रमातील वाद्ग्रात वक्तव्य, गुंडगिरी, सेलिब्रेटीज च्या प्रकरणाचे रेपोर्ट, बलात्काराच्या बातम्या, फसवणुक दरोड्याच्या बातम्या त्यातच निम्याहून जास्त जाहिराती असतात. अर्थात त्या बातम्या चानेल वर येतात म्हणजे समाजामध्ये घडत आहेत हे खरंय पण त्याच त्याच बातम्या सारख्या सारख्या दाखवून एकप्रकारे समाजाच्या मनामध्ये नकारात्मक विचार पेरतात कि काय असं मला नेहमी वाटत राहतं. मला चानेलवरील दररोजच्या नवीन विषयावरील वरील विशेष चर्चा ऐकायला खूप आवडतात. मी घरी बातम्यांचा चानेल लावला कि लगेच माझ्या घरातून विरोधात्मक सूर येतो कारण सकाळपासून संध्याकाळ पर्यंत चालत राहणाऱ्या, त्याच त्याच चघळून चोथा झालेल्या बातम्या ऐकायला आणि पाहायला हि नकोश्या वाटतात.
माध्यमांना आपण लोकशाहीचा चौथा स्तंभ मानतो. लोकशाहीचा चौथा स्तंभाने जागरूकतेने समाजातील चांगल्या घटनावर लक्ष केंद्रित करणं करणं गरजेचं आहे. देशामधील सामान्य माणसांचे प्रश्न, समस्या, अडचणी या निपक्षपातीपणे सरकारच्या कानावर घालण्यासाठी माध्यमांचा खूप मोठ्या प्रमाणात वापर झाला पाहिजे. सरकारच्या विविध योजना सर्वांच्या पर्यंत माध्यमेच पोहचू शकतात. सरकार आणि जनता यांच्या मधील दुवा म्हणून माध्यमांनी कार्य केलं पाहिजे. २०१४ मधील निवडणुकातील माध्यमांची भूमिका ही खूप महत्वाची ठरली होती. सध्याच्या काळात सर्वच क्षेत्रात माध्यमांची भूमिका खूप महत्वाची ठरत आहे. अर्थात माध्यमांची भूमिका महत्वाची असली पाहिजे यात नक्कीच दुमत नाही पण ती सकारात्मक आणि चांगल्या समाजासाठी असावी शेवटी एवढीच माझ्या विचारी मनाची एक छोटीशी इच्छा…
धन्यवाद…
✍✍✍✍पोपट यमगर…
popatgyamgar.blogspot.com
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा