The Most Powerfull Man in The World असा उल्लेख ज्या राष्ट्राध्यक्षांचा संपुर्ण जगभरात केला जातो त्या महासत्ता असलेल्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणूकीच्या शेवटच्या टप्यातील पडघम वाजत आहेत. गेली वर्षभर राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीची चाललेली प्रक्रिया अंतिम टप्यात म्हणजेच दोन तीन आठवड्यावरती येऊन ठेपली आहे. संपूर्ण जगाचे लक्ष ८ नोव्हेंबर २०१६ ला अमेरिकेचा ४६ वा राष्ट्राध्यक्ष कोण निवडला जाणार याकडे लागले आहे. डेमॉक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार हिलरी क्लिंटन आणि रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डॉनल्ड ट्रम्प यांच्यामध्ये हि राष्ट्राध्यक्षपदाची सरळ लढत होत आहे. हिलरी क्लिंटन या अत्यंत बुद्धिमान, आपल्यापुढे असलेल्या विषयाचा मुद्देसूद अभ्यास करणाऱ्या म्हणून आंतराष्ट्रीय राजकारणात ओळखल्या जातात. तर दुसऱ्या बाजुला डोंनाल्ड ट्रम्प हे आक्रमक स्वभावाचे आणि स्पष्ट वक्ते म्हणून आंतराष्ट्रीय राजकारणात ओळखले जातात. त्यांनी आक्रमकपणे केलेली अनेक विषयावरची वक्तव्ये हि वादग्रस्त आहेत. अमेरिकेच्या २०० वर्षाच्या इतिहासात प्रथमच एका महिलेला अमेरिकन पक्षाची राष्ट्राध्यक्षपदाची उमेदवारी हिलरी क्लिंटन यांना मिळाली आहे. सध्याच्या तरी मतदानाच्या आकडेवारीवरून त्या आघाडीवर असल्याचे आपणास पाहायला मिळतात. २००८ च्या जागतिक महामंदीचे परिणाम आर्थिक महासत्ता असलेल्या अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला सर्वप्रथम सहन करावे लागले होते. त्यानंतर संपूर्ण जगभर जागतिक महामंदी विस्तारली गेली. लोकसत्ताचे संपादक गिरीशजी कुबेर सर यांनी अमेरिकेत जाऊन अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीचे केलेले सडेतोड विश्लेषण "ओपन अमेरिका" या लेख मालिकेच्या माध्यमांतून लोकसत्ता मध्ये गेले महिनाभर प्रकाशित होत होते. जवळ जवळ त्यांनी लिहिलेले सर्वच लेख अमेरिकेच्या निवडणुकीविषयीची माहिती मिळण्यास उपयुक्त ठरले. दोन्ही उमेदवारांच्या अमेरिकन मीडियाने घेतलेल्या चर्चेच्या वादफेऱ्या, रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डॉनल्ड ट्रम्प यांची चर्चेत झालेली गोची, उपाध्यक्षपदासाठी उभे असलेले दोन्हीही नवखे उमेदवार, अमेरिका आणि भारत यांच्या तील निवडुकाविषयीचा मुद्देसूद तुलनात्मक आढावा इत्यादी विषयीचे लेख नक्कीच अप्रतिम असेच आहेत. खरंतर अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक हि अत्यंत किचकट आणि गुंतागुंतीची असते. जितके मतदार मतदान करतील तितकी मते असे साधे सरळ गणित नाही. प्रत्येक राज्याला स्वतःचे वजन असते. उदा--टेक्सास, न्यूयॉर्क, फ्लोरिडा. या राज्यांना स्वतःचे वजन आहे. जितके त्या राज्यातील लोकप्रतिनिधी तितके त्या राज्याल वजन. आपले उदाहरण द्यायचे झाले तर महाराष्ट्रातून ४८ खासदार निवडले जातात, म्हणून राष्ट्र्पतींच्या निवडणुकीत महाराष्ट्रातील लोकांच्या मताला वजन ४८... या पद्धतीमुळे उमेदवारही वजनदार राज्यांकडे जास्त लक्ष ठेवून असतात. आपल्याकडे जसे एकटा उत्तरप्रदेश देशाच्या राजकारणाची दिशा ठरवू शकतो, तसे इथे टेक्सास, न्यूयॉर्क, कॅलिफोर्नियासारखे वजनदार राज्य निवडणुकीत निर्णायक ठरू शकते. यासारखे अनेक मुद्दे हे "ओपन अमेरिका" या लेख
मालिकेच्या माध्यमातून समजले.
धन्यवाद..
श्री पोपटराव यमगर
बाळेवाडी, ता.- आटपाडी,
जि.: सांगली
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा