सरकारने हुंडाबंदी केली असल्यामुळे अनेकठिकाणी काही मधले दलाल "मानपान" या सोज्वळ आणि गोंडस शब्दाच्या नावाखाली हुंडा मागताना अनेकवेळा दिसतात...
मला एक समजत नाही भावी साथीदाराला तुम्ही अश्या पैशाच्या स्वरूपात विकत कसे काय घेतात??? बैलांच्या बाजारामध्ये जसे बैलांचे भाव दलालाकडून ठरवले जातात ना अगदी तसेच( या माणसातल्या बैलांचे) भाव लग्न या संस्थेमध्ये हुंड्याच्या स्वरूपात ठरवले जातात. अर्थात एकप्रकारे हा आर्थिक सौदाच ठरतो... असे सौदे करणारे अनेक दलाल असतात... त्या दलालानी मग त्या बैलाचा भाव करून किती पैशात बैल विकत घेतला हे दोन्ही बाजूने सांगायचे असा हा व्यवहार आहे..... आणि या सौद्यामध्ये बळी जाते ती एक मुलगीच....(असंही जिथे स्त्री भ्रूण हत्या केली जाते ... तिथे मग या मुलींच्या जीवाची चिंता तरी कशी असेल.....???? )
त्यामुळे माझ्या सुशिक्षित भगिनींना आणि मैत्रिणींना आणि त्यांच्या पालकाना एक माझा प्रश्न असेल कि तुम्ही तुमचा साथीदार असा बैलाच्या भावासारखा विकत घेणार आहात का???
कुठेतरी हे प्रश्न आम्ही आमच्याच मनाला विचारण्याची गरज आज निर्माण झाली आहे...
"तिलक नही, दहेज नही, शादी कोई व्यापार नही, खरीदा हुआ जीवनसाथी अब हमको स्वीकार नही.."
✍पोपट यमगर
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा